भौगोलिक मानांकनात महाराष्ट्र अव्वलस्थानी, मानांकन वापरकर्तासाठी कसा करायचा अर्ज ?

बाजारपेठेत भौगोलिक मानांकन मिळालेल्या बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होते. महाराष्ट्रातील 20 हून अधिक फळांना तसेच भाजीपाल्याला देखील हे मानांकन मिळालेले आहे. मात्र, याकरिता कसा अर्ज केला जातो याची माहिती अनेक शेतकऱ्यांना नसते. परिणामी बाजारपेठ तर उपलब्ध होत नसल्याने फायदा घेता येत नाही. त्यामुळे मानांकनाचा वापरकर्तासाठी अर्ज कसा करायचा याची माहिती आपण घेणार आहोत...

भौगोलिक मानांकनात महाराष्ट्र अव्वलस्थानी, मानांकन वापरकर्तासाठी कसा करायचा अर्ज ?
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 15, 2021 | 12:21 PM

लातूर : शेतीमालाच्या निर्यातीला (Export of agricultural produce) चालना देण्यासाठी वैशिष्टपूर्ण गुणधर्म असलेल्या पीकांना (geographical rating) भौगोलिक मानांकनाचा दर्जा दिला जात असतो. याकरिता कृषी विकास योजनेची मदत घेतली जाते तर नोंदणी ही चेन्नई येथील कार्यालयात केली जाते. या मानांकनामुळे पीकाचे वेगळेपण समोर येतो. बाजारपेठेत भौगोलिक मानांकन मिळालेल्या बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होते. महाराष्ट्रातील 20 हून अधिक फळांना तसेच भाजीपाल्याला देखील हे मानांकन मिळालेले आहे. मात्र, याकरिता कसा अर्ज केला जातो याची माहिती अनेक शेतकऱ्यांना नसते. परिणामी बाजारपेठ तर उपलब्ध होत नसल्याने फायदा घेता येत नाही. त्यामुळे मानांकनाचा वापरकर्तासाठी अर्ज कसा करायचा याची माहिती आपण घेणार आहोत…

वातावरणानुसार पीक पध्दती हे भारतीय शेतीचे वैशिष्ट आहे. असे असतानाही आतापर्यंत महाराष्ट्र राज्याला अधिकचे मानांकन मिळालेले आहे. यामध्ये 20 हून अधिक फळांचा समावेश आहे तर भाजीपाल्याचाही समावेश आहे.

मानांकान अधिकृत वापरकर्ता बनण्याची काय आहे प्रक्रिया

भौगोलिक मानांकनाच्या वापरकर्ता होण्यासाठी चेन्नई येथील मानांकन कार्यालयात नोंद करावी लागते. ही नोंदणी जानेवारी ते मार्च दरम्यान सुरु असती. याकरिता शेतकऱ्यांना केवळ 10 रुपयांचा खर्च आहे. आता या मानांकनासाठी अधिकच्या शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा म्हणून जिल्हानिहाय लक्षांक देण्यात आलेले आहे. यातील वापरकर्ता शेतकरी व्हायचे असल्यास कृषी विभागाकडे केवळ 10 रुपयांमध्ये नोंदणी होणार आहे. मात्र, खासगी संस्थाकडून तीन हजार रुपये आकारले जातात.

त्यामुळे शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयात संपर्क साधला तरी या मोहिमेत सहभाग घेता येणार आहे. भौगालिक मानांकनानंतर 90 पिकांकरीता देशात आतापर्यंत 3000 शेतकऱ्यांनी अधिकृत वापरकर्ता म्हणून नोंदणी केलेली आहे. महाराष्ट्रात आता पर्यंत 20 फळं आणि भाजीपाला पिकांना मानांकन असून वापरकर्ता शेतकरी म्हणून 2735 जणांची नोंदणी करण्यात आलेली आहे.

काय होतो फायदा ?

भौगोलिक सूचकांक मानांकन ही भारत सरकारतर्फे, उत्पादनांना त्याच्या दर्जानुसार व गुणवत्तेनुसार मानांकन देण्यासाठी राबविण्यात येणारी एक व्यवस्था आहे.हे मानांकन केंद्र सरकारच्या ‘औद्योगिक धोरण व प्रोत्साहन’ विभागातर्फे जारी करण्यात येते. हे मानांकन एक प्रकारचे चिन्ह आहे जे, त्या उत्पादनाच्या मूळ भौगोलिक स्थानाकडे निर्देश करते. स्थानिक अथवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दरांवर त्याचा सकारात्मक परिणाम होते.याने त्या उत्पादनाची वेगळी ओळख निर्माण होते.

नोंदणीची मोहिम राज्यभर राबवली जाणार

राज्यातील 20 फळांना आणि भाजीपाल्याला भौगोलिक मानांकन हे मिळालेले आहे. त्यामुळे बाजारपेठ उपलब्ध होत आहे. भौगोलिक क्षेत्रानुसार हे मानांकन प्रदान केले जाते. मात्र, त्या भागातील शेतकऱ्यांना या मानांकनाचे वापरकर्ता करण्यासाठी राज्यसरकारने पाऊल उचलले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा सहभाग तर वाढेलच पण अधिकचा फायदाही होणार आहे.  (Maharashtra tops geographical ratings What is the process of becoming a user?)

संबंधित बातम्या ;

पुढील तीन दिवस पावसाचे, काढणी झालेल्या पीकांची सुरक्षा महत्वाची

तुर उत्पादन वाढीचा अनोखा ‘फंडा’, काय आहे कृषितज्ञांचा शेतकऱ्यांना सल्ला ?

…तर सोयाबीनलाही मिळेल चांगला दर, विक्रीपूर्वी करा ‘ही प्रक्रिया’, शेतकऱ्यांना कृषीतज्ञांचा सल्ला

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.