अवकाळीनंतर ‘असे’ करा फळबागांचे व्यवस्थापन, काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?

निसर्गाच्या लहरीपणातून अखेर फळबागांचीही सुटका झाली नाही. यापूर्वी खरीप हंगामातील पिकांचे नुकसान अतिवृष्टीने झाले होते तर अधिक काळ पाऊस लांबल्याने रब्बीच्या पेरण्याही उशीरा झालेल्या आहेत. आता यानंतर वातावरणातील बदलाचा सर्वाधिक फटका फळबागांना बसत आहे.

अवकाळीनंतर 'असे' करा फळबागांचे व्यवस्थापन, काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 02, 2021 | 10:31 AM

लातूर : निसर्गाच्या लहरीपणातून अखेर फळबागांचीही सुटका झाली नाही. यापूर्वी खरीप हंगामातील पिकांचे नुकसान अतिवृष्टीने झाले होते तर अधिक काळ पाऊस लांबल्याने रब्बीच्या पेरण्याही उशीरा झालेल्या आहेत. आता यानंतर (Untimely rains) वातावरणातील बदलाचा सर्वाधिक फटका ( damage to orchards) फळबागांना बसत आहे. ऐन पिक पदरात पडण्याच्या दरम्यानच राज्यातच अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे सर्वाधिक नुकसान हे आंबा आणि द्राक्षे बागांचे होत आहे. त्यामुळे या बागांचे व्यवस्थापन झाले तरच शेतकऱ्यांना उत्पादन हाती लागणार आहे.

द्राक्ष बागांवर काय झाला आहे परिणाम

द्राक्ष बागा ह्या तोडणीच्या अवस्थेत आहेत. सध्या फुलोरा आणि मणी सेटिंग नंतरची स्थिती आहे. सध्या ढगाळ वातावरण आणि पावसामुळे आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. तर द्राक्षांवर फळकूज, मणीगळ, डाऊनी व भुरा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे उत्पादनात घट होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

द्राक्ष बागांचे असे करा व्यवस्थापन

सध्याच्या वाढलेल्या आर्द्रतेमुळे भुरी व केवडा या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. बागेत मोकळी कॅनोपी असणे आवश्यक आहे. त्यामुळे सूक्ष्म वातावरण निर्माण होणार नाही. सर्वसामान्य दाट कॅनॉपीमधे रोगकारक घटकांची वेगाने वाढ होते व त्याचा प्रसार घडापर्यंत होतो. हे टाळणासाठी प्रत्येक काडी सुटसुटीत राहील याकडे लक्ष गरजेचे आहे. बागेमध्ये काड्या तारेवर बांधून घ्याव्यात. काडीवर निघालेल्या बगलफुटीसुद्धा काढून घ्याव्या लागणार आहेत. त्याचबरोबर काडीच्या तळातील 3 ते 4 पाने काढून दोन फांद्या दरम्यान योग्य अंतर ठेवले तर वेलीमध्ये योग्य हवा खेळती राहणार आहे. त्यामुळे फवारणी पूर्ण कॅनॉपीमध्ये होईल सूर्यप्रकाश प्रत्येक भागाला मिळाल्यामुळे रोगांच्या प्रसारास आळा घालता येईल पानाच्या पृष्ठभागावर बुरशीनाशक, धूळ किंवा स्टिकरचा लेप तयार होऊ देऊ नये. शिवाय द्राक्षाची पाने निरोगी व रोगमुक्त ठेवावी लागणार आहेत.

आंबा मोहरावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव

पावसामुळे आंब्यावर कीड, रोगराईचा प्रादुर्भाव वाढत आहे. पावसानंतर वातावरण ढगाळ राहिल्यास आंब्याच्या पालवी मोहोरावर तपकिरी तुडतुड्याचा प्रादुर्भाव वाढी शकतो. त्यामुळे पावसाने उघडीप दिली की योग्य व्यवस्थापन केले तर फळ पदरात पडणार आहे.

दोन रोगांपासून असे करा आंब्याचे संरक्षण

वातावरणातील बदलामुळे आंब्यावर भुरी आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. याकरिता बुरशीनाशकांचा वापर करणे हे अनिवार्य आहे. यामध्ये एक्झाकएमेझॅाल किंवा 80 टक्के सल्फर मिसळल्यास भुरा रोगापासून आंब्याचे संरक्षण होणार आहे. भुरी आणि करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी बुरशीनाशकांचा वापर महत्वाचा राहणार आहे. त्यामुळे पावसाने उघडीप दिली की, शेतकऱ्यांनी याची फवारणी करणे गरजेचे असल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

ब्बीचा पेरा झाला आता आंतरमशागतीचे महत्व जाणून घ्या..!

ठिबक सिंचनाचा वाढता वापर अन् घ्यावयाची काळजी, शेतकऱ्यांचे नियोजनही महत्वाचे

Farmer Suicide : सन 2020 मध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात, काय आहेत कारणे?

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.