Orchard : प्रतिकूल परस्थितीमध्येही आंबा लागवडीलाच प्राधान्य, योजनेचा लाभ घेऊन पीक पध्दतीमध्ये बदल
यंदाच नाही तर गेल्या 4 वर्षापासून वातावरणातील बदलामुळे फळबागा ह्या धोक्यात आहेत. चालू हंगामात आंब्याचे केवळ 10 टक्के उत्पादान शेतकऱ्यांच्या पदरी पडले आहे. असे असताना पुन्हा शेतकरी हे फळबाग लागवडीमध्ये आंब्यालाच प्राधान्य देत आहेत. माहे एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यानच्या काळात फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा लाभ घेता येतो.
पुणे : यंदाच नाही तर गेल्या 4 वर्षापासून (Climate Change) वातावरणातील बदलामुळे (Orchard) फळबागा ह्या धोक्यात आहेत. चालू हंगामात आंब्याचे केवळ 10 टक्के उत्पादान शेतकऱ्यांच्या पदरी पडले आहे. असे असताना पुन्हा शेतकरी हे फळबाग लागवडीमध्ये (Mango) आंब्यालाच प्राधान्य देत आहेत. माहे एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यानच्या काळात फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा लाभ घेता येतो. त्याअनुंशाने शेतकऱ्यांनी आंबा लागवडीवर भर दिला आहे. राज्यात आतापर्यंत 42 हजार 350 हेक्टरापैकी 20 हजार 249 हेक्टर क्षेत्रावर आंब्याची लागवड केली गेली आहे तर 4 हजार 700 हेक्टरावर संत्रा लागवड झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.
फळबाग क्षेत्र वाढवण्यासाठी कृषी विभागाचा पुढाकार
फळबागाचे क्षेत्र वाढवण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने नियोजन केल आहे. शिवाय फळबाग लागवडीला शेतकरीही प्राधान्य देत आहेत. गेल्या 38 हजार हेक्टरावर फळलागवड आणि यंदा मार्चपर्यंत 60 हजार 50 हेक्टरावर लागवडीचे नियोजन करण्यात आले होते. आतापर्यंत 42 हजार 350 हेक्टरावर लागवड झाली आहे. निसर्गाचा लहरीपणा असला तरी फळबागेतूनच उत्पादनाची हमी शेतकऱ्यांना वाटत असल्याने फळबाग क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे.
अनुदान लाभासाठी 1 लाखाहून अधिक शेतकऱ्यांचे अर्ज
फळबाग लागवडीसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून अनुदान दिले जाते. अनुदान पदरी पडावे म्हणून तब्बल 1 लाख 8 हजार 273 शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे अर्ज केले आहेत. शिवाय फळबागांचा प्रयोग हा कोरडवाहू क्षेत्रावरच अधिक करण्यात आला आहे. पाण्याची सोय आणि तंत्रशुध्द पध्दतीने उत्पादन वाढवण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे. यामध्ये अहमदनगर, सोलापूर, सातारा हे जिल्हे आघाडीवर आहेत. शिवाय सीताफळाला डावलून शेतकऱ्यांचा भर हा आंब्यावरच आहे.
असे आहे योजनेतील अनुदानाचे स्वरुप
*महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड करणारे लाभार्थी हे बहुतांशी जॉबकार्डधारक असतात. त्यामुळे त्यांनी केलेल्या फळबाग लागवडीचे संवर्धन ही त्यांची जबाबदारी राहते. *वृक्षनिहाय मंजूर मापदंडानूसार दुसऱ्या व तिसऱ्या वर्षातील जिवंत झाडांच्या टक्केवारी प्रमाणे कामे करण्याची जबाबदारी लाभार्थ्यांची राहिल. *दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी वृक्ष फळपिकांच्या बाबतीत 75 टक्के झाडे जिवंत ठेवतील अशाच लाभार्थ्यांनाच दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाचे अनुदान दिले जाते. मजुरी दरात सुधारणा करुन आता रु.201 इतके मजुरी दर लागु करण्यात आला असुन त्यानुसार फळपिकनिहाय सुधारित खर्चाचे मापदंड तयार करण्यात येत आहेत.
संबंधित बातम्या :
Latur Market : सोयाबीनचे स्थिरच, हरभऱ्याच्या दरवाढीमागे कारण काय? शेतकऱ्यांची सावध भूमिका