AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Untimely Rain: कोकणातही अवकाळीची अवकृपा, वादळी वाऱ्यामुळे आंबा गळती तर काजू बागांचे नुकसान

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पुन्हा (Untimely Rain) अवकाळीचा फटका रब्बी हंगामातील पिकांना आणि फळबागांना बसत आहे. नाशिक जिल्ह्यात कांदा आणि द्राक्षबागांचे नुकसान झाल्यानंतर आता अवकाळीने कोकणाकडे कूच केलेली आहे. या भागात रब्बी हंगामाचे नाही पण (Mango) आंबा आणि काजूच्या बागांना धोका निर्माण झालेला आहे. सकाळपासून उकाडा आणि दुपारुन हवेत गारवा निर्माण होऊन वादळी वाऱ्यासह सुरु झालेल्या पावसामुळे आंबागळ तर काजू बागांची पडझड सुरु झाली आहे.

Untimely Rain: कोकणातही अवकाळीची अवकृपा, वादळी वाऱ्यामुळे आंबा गळती तर काजू बागांचे नुकसान
राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 4:57 PM

सिंधुदुर्ग: गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पुन्हा (Untimely Rain) अवकाळीचा फटका रब्बी हंगामातील पिकांना आणि फळबागांना बसत आहे. नाशिक जिल्ह्यात कांदा आणि द्राक्षबागांचे नुकसान झाल्यानंतर आता अवकाळीने (Kokan) कोकणाकडे कूच केलेली आहे. या भागात रब्बी हंगामाचे नाही पण (Mango) आंबा आणि काजूच्या बागांना धोका निर्माण झालेला आहे. सकाळपासून उकाडा आणि दुपारुन हवेत गारवा निर्माण होऊन वादळी वाऱ्यासह सुरु झालेल्या पावसामुळे आंबागळ तर काजू बागांची पडझड सुरु झाली आहे. हंगामाच्या सुरवातीपासून आंबा बागांवर अवकाळीची अवकृपा राहिली असून अंतिम टप्प्यातही कायम आहे. आता होत असलेले नुकसान न भरुन निघणारे आहे. यापुर्वीच वातावरणातील बदलाचा परिणाम उत्पादनावर झालेला आहे. असे असतानाच बुधवारी सायंकाळी सुरु झालेल्या पावसाने शेतकऱ्यांपुढे अजून कोणते संकट मांडून ठेवले हाच सवाल प्रत्येकाच्या मनात आहे.

अर्धा तासाच्या पावसाने पाणी-पाणी

सिंधुदुर्ग शहरासह परिसरात बुधवारी दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली होती. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे वातावरणात बदल होऊन विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. अवघ्या अर्ध्यातासाच्या या पावसामुळे रस्त्यावर पाणी-पाणी झाले तर दुसरीकडे वाऱ्यामुळे आंबा गळतीचा धोका कायम आहे. आता कुठे आंबा पीक पदरात पडेल असे चित्र होते होते पण अगदी अंतिम टप्प्यात झालेल्या या पावसामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे.

द्राक्ष उत्पादकांना सर्वाधिक फटका

निसर्गाचा लहरीपणा आणि द्राक्ष उत्पादकांनी त्याच्याशी केलेले दोन हात. आतापर्यंत शेतकऱ्यांनी सावरण्याचा प्रयत्न केला पण द्राक्षतोड होत असतानाही निसर्गाने द्राक्ष उत्पादकांवर कृपादृष्टी दाखवलेली नाही. अखेर नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी हताश झाला आहे. यापुर्वी अवकाळी आणि ढगाळ वातावरणामुळे रोगराईचा प्रादुर्भाव नंतर वाढत्या थंडीतून बचाव व्हावा म्हणून रात्रीचा दिवस करुन द्राक्ष बागांमध्ये शेकोट्या हे सर्व करुन आता कुठे तोड सुरु असताना होत असलेल्या पावसामुळे द्राक्षांचे न भरुन निघणारे नुकसान होत आहे. एकीकडे दर्जा खालावला म्हणून अपेक्षित दर नाही हे कमी म्हणून की काय आता होत असलेल्या पावसामुळे द्राक्ष विक्री होते की नाही याची धास्ती शेतकऱ्यांमध्ये आहे.

संबंधित बातम्या :

Latur Market : शेतीमालाची आवक वाढली, हमीभाव केंद्रापेक्षा खुल्या बाजारातच हरभऱ्याची विक्री

पुनर्वसनातील राखीव जमिनीचे सोडा हक्काच्या शेतजमिनीवरही पीक घेणे मुश्किल, नांदेडचे शेतकरी रब्बीला मुकले

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी : योजनेचा लाभ घ्या अन् कृषीपंपाचे वीजबिल कोरे करा, आता उरले 22 दिवस

'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत.
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'.
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली.
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्....
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.