Sugarcane Sludge : 46 साखर कारखान्यांचा धुराडी बंद, पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांची मराठवाड्यातील शेतकऱ्यांना खुली ऑफर..!

यंदाचा गाळप हंगाम सुरु होऊन 6 महिन्याचा कालावधी संपला तरी राज्यात तब्बल 80 लाख टन उसाचे गाळप हे शिल्लक आहे. उसाच्या वाढत्या क्षेत्रामुळे यंदा ही परस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये सर्वाधिक ऊस हा मराठवाड्यात शिल्लक आहे. सध्या राज्यातील 46 साखर कारखान्यांनी आटोपते घेतले असून साखर आयुक्तांच्या परवानगीने कारखाने बंद केले आहेत.

Sugarcane Sludge : 46 साखर कारखान्यांचा धुराडी बंद, पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांची मराठवाड्यातील शेतकऱ्यांना खुली ऑफर..!
साखऱ कारखाना
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 10:45 AM

पुणे : यंदाचा गाळप हंगाम सुरु होऊन 6 महिन्याचा कालावधी संपला तरी (Maharashtra) राज्यात तब्बल 80 लाख टन (Sugarcane Sludge) उसाचे गाळप हे शिल्लक आहे. उसाच्या वाढत्या क्षेत्रामुळे यंदा ही परस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये सर्वाधिक ऊस हा (Marathwada) मराठवाड्यात शिल्लक आहे. सध्या राज्यातील 46 साखर कारखान्यांनी आटोपते घेतले असून साखर आयुक्तांच्या परवानगीने कारखाने बंद केले आहेत. मराठवाड्यातील उसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शेतकऱ्यांनी साखर कारखान्यापर्यंत ऊस घेऊन यावा गाळप करुन दिला जाईल अशी भूमिका काही कारखान्यांनी घेतली आहे. मात्र, मुळात उसतोड कामगार आणि तोडीचा प्रश्न असल्याने हे शक्य होणार नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पावसाळा सुरु होण्यापूर्वी तरी हा प्रश्न मार्गी लागणार की नाही अशी परस्थिती झाली आहे.

राज्यात 1 हजा 220 लाख टन उसाचे गाळप

ऑक्टोंबर महिन्यापासून यंदाचा गळीत हंगाम सुरु झाला होता. हंगामाच्या सुरवातीपासून क्षमतेपेक्षा अधिकचे गाळप हे साखर कारखान्यांनी केलेले आहे. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी गाळपात घेतलेली आघाडी ही कायम ठेवली होती. त्यामुळे या विभागातील गाळप पूर्ण झाले असून 46 साखर कारखान्यांची धुराडी देखील बंद झाली आहे. वाढते क्षेत्र अन् अधिकचा उतारा यामुळे 1 हजार 220 लाख टन उसाचे गाळप करुन महाराष्ट्र साखर उत्पादनामध्ये देशात अव्वल स्थानी आहे.

उसतोड मजूर अन् वाहतूकीचा प्रश्न कायम

पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये यंदा अधिकची तोड ही हार्वेस्टरच्या माध्यमातून करण्यात आली आहे. मात्र, मराठवाड्यातील क्षेत्र त्या तुलनेचे नाही. त्यामुळे या भागात उसतोड कामगारांकडूनच अधिकची तोड झाली आहे. आता हंगामाच्या अंतिम टप्प्यात उसतोड कामगारांनीही परतीची वाट धरलेली आहे. त्यामुळे तोडणीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील हार्वेस्टर मागविले जात आहेत. ऊस गाळपासाठी सर्वात मोठी समस्या म्हणजे उसतोड कामगार हे फडात येण्यासाठीच तयार नाहीत. शिवाय तोडणी झालेला ऊस कारखान्यावर घेऊन जाणेही जिकिरीचे झाले आहे.

198 पैकी 46 साखर कारखाने बंद

राज्यातील 198 साखर कारखान्यापैकी आतापर्यंत 46 साखर कारखान्यांने यंदाच्या हंगामातील गाळप पूर्ण करुन कारखाने हे बंद केले आहेत. महाराष्ट्र ऊस गाळपात आणि साखर उत्पादनातही राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. 46 साखर कारखाने बंद झाले असली तरी या भागातील हार्वेस्टर मराठवाड्यात आणून अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लावला जाणार आहे.

संबंधित बातम्या :

Beed : उसाच्या शेतामध्ये गांजाचे आंतरपिक, उसापेक्षा गांजाच वाढल्याने फुटले भिंग

Milk Production: दुधाचे दर वाढले अन् उत्पादन घटले, वाढत्या उन्हाचा नेमका परिणाम काय?

Goat rearing : जातिवंत शेळ्यांसाठी कृत्रिम रेतन, देशातील पहिलाच प्रयोग महाराष्ट्रात

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.