Malegoan : बाजारपेठा बहरल्या, बी-बियाणांसाठी नव्हे तर शेतीमाल अन् चाऱ्याचे नुकसान टाळण्यासाठी

पावसाळ्यात ताडपत्रीला अधिकची मागणी ही ठरलेलीच आहे. गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी बी-बियाणांपूर्वी या ताडपत्रीची खरेदी करण्यास पसंती दिली आहे. शेतीमालाचे आणि चाऱ्याचे संरक्षण झाले तरच शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे. सध्या कांद्याला दर नसल्यामुळे जागोजागी कांदा साठवणूक केलेला आहे. आता कुठे दरात सुधारणा होत असताना पावसाने कांदा नासण्याचा धोका आहे.

Malegoan : बाजारपेठा बहरल्या, बी-बियाणांसाठी नव्हे तर शेतीमाल अन् चाऱ्याचे नुकसान टाळण्यासाठी
मालेगाव मार्केटमध्ये पावसाचे आगमन झाल्याने ताडपत्रीच्या खेरदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 11, 2022 | 2:48 PM

मालेगाव : नाशिक जिल्ह्यातील मालेगावसह विसापूर आणि कळमण तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे. हंगामातील पहिलाच (Rain) पाऊस बरसला असला तरी या पावसाने शेतकऱ्यांना कामाला लावले आहे. पावसाच्या आगमनानंतर शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असले तरी दुसरी (Agricultural Goods) शेतीमालाचे आणि साठवणूक केलेल्या चाऱ्याचे संरक्षण महत्वाचे आहे. त्यामुळे (Kharif Season) खरिपातील बी-बियाणे खरेदीपूर्वी बाजारपेठेत शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे ती ताडपत्री विकत घेण्याासाठी. यामुळे चारापिकांचे तर संरक्षण केले जाणार आहे शिवाय चाळीतील कांद्याच्या सुरक्षतेतेसाठी या ताडपत्रीचा वापर केला जात आहे. शुक्रवारी झालेल्या पहिल्याच पावसामध्ये कांदा चाळीवरील पत्रे उडून गेल्याने तब्बल 700 क्विंटल कांद्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून शेतकरी कामाला लागला आहे.

पावसाला सुरवात होताच दरात वाढ

पावसाळ्यात ताडपत्रीला अधिकची मागणी ही ठरलेलीच आहे. गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी बी-बियाणांपूर्वी या ताडपत्रीची खरेदी करण्यास पसंती दिली आहे. शेतीमालाचे आणि चाऱ्याचे संरक्षण झाले तरच शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे. सध्या कांद्याला दर नसल्यामुळे जागोजागी कांदा साठवणूक केलेला आहे. आता कुठे दरात सुधारणा होत असताना पावसाने कांदा नासण्याचा धोका आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणू शेतकरी कामाला लागला आहे. दरवर्षीची मागणी असतानाही यंदा ताडपत्रीच्या दरात वाढ झाली आहे. असे असले खरेदीसाठी शेतकऱ्यांची एकच गर्दी होत आहे.

कांदा शेतातच पडून

उन्हाळी हंगामातील कांदा छाटणीनंतर शेतकरी हा खरीपपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त होता. शिवाय कांद्याला अपेक्षित दरही नव्हता. मात्र, दोन दिवसांपासून सुरु झालेला पाऊस आणि बाजारपेठेत कांदा दराचे बदलत असलेले चित्र पाहून कांदा संरक्षणासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु झाली आहे. आतापर्यंत कांदा हा फडातच पडून होता. मात्र, पावसामुळे कांद्याचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी आता ताडपत्रीचा आधार घेतला जात आहे.

हे सुद्धा वाचा

असे आहेत प्लस्टिक ताडपत्रीचे दर

पावसाला सुरवात होताच ताडपत्रीच्या मागणीत वाढ होते. सध्या मालेगावात शेतकऱ्यांची गर्दी ही केवळ प्लॅस्टिक खरेदीसाठी होत आहे . 140 ते 270 रुपयांपर्यंतच्या ताडपत्र्या बाजारात उपलब्ध आहेत तर एमएम वर ताडपत्री घेण्यास गेल्यावर 20 ते 40 रुपये मीटर असे दर सुरु आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यामध्ये 10 टक्के दरात वाढ झाली आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.