AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Medicinal Plants: औषधी वनस्पतीमधून लाखोंचे उत्पन्न, पेरणीपासून कापणीपर्यंतची जाणून घ्या सर्वकाही

शतावरीच्या मुळांच्या वर पातळ साल असते. साल काढल्यावर पांढरे दुधाचे मूळ मिळते, जे सुकल्यावर त्याची पावडर होते. त्यासाठी उष्णता, दमट व 10.5 अंश सेल्सिअस तापमान असलेले व वार्षिक 250 सेंमी चे पर्जन्यमान असलेले हवामान शतावरी लागवडीसाठी योग्य मानले जाते. बियांपासून शतावरीची रोपे तयार केली जातात. शतावरीच्या लागवडीसाठी एकरी 5 किलो बियाणे लागते.

Medicinal Plants: औषधी वनस्पतीमधून लाखोंचे उत्पन्न, पेरणीपासून कापणीपर्यंतची जाणून घ्या सर्वकाही
शतावरी औषधी वनस्पती
Follow us
| Updated on: May 04, 2022 | 4:38 PM

मुंबई : उत्पादनात वाढ होणार असेल तर शेतकरी (Crop Change) पीक पध्दतीमध्ये बदल करण्यात कमी पडत नाही. एवढेच नाही तर पारंपरिक पीक पध्दतीला बाजूला सारुन आता (Medical Plant) औषधी वनस्पतीचीही लागवड वाढत आहे. उत्पादन मिळवण्यासाठी शेती पिकांचीच लागवड करावी असे काही नाही तर औषधी वनस्पतीमधूनही उद्देश साधता येतोच. कमी वेळेत अधिक नफा यामुळे आता औषधी वनस्पतीच्या लागवडीत वाढ होत आहे. शतवारी ही एक अशीच वनस्पती आहे ज्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या (Production Increase) उत्पादनात झपाट्याने वाढ होते. या औषधी वनस्पतीला देशातील विविध भागांमध्ये विविध नावांनी ओळखले जाते.एकदा का शतावरीची लागवड केली की, अनेक वर्ष उत्पादन हे मिळू शकते. याकरिता केवळ पिकाची काळजी घेणे गरजेचे आहे. या पध्दतीनुसार शेतकरी एकरी 4 लाख रुपये उत्पादन मिळू शकते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी शतावरी हा उत्तम पर्याय आहे.

शतावरीचे असे हे फायदे

शास्त्रज्ञांच्या मते शतावरी या वनस्पतीमध्ये ग्लुकोज भरपूर प्रमाणात असते. भारतात ही वनस्पती हिमालयीन प्रदेशांत आढळते. शतावरीची फुले पांढरी असून फळ गुच्छांमध्ये असते. याचा कंद क्लस्टर्समध्ये देखील असतो, जो औषधी औषधांमध्ये वापरला जातो. शतावरीची लागवड केल्यापासून 3 वर्षात ही वनस्पती पूर्णपणे विकसित होण्यास आणि कंद वापरण्या योग्य होते. बलुई चिंब माती ही तिच्या लागवडीसाठी सर्वात योग्य मानली जाते. शतावरी वनस्पतींना जास्त पाणी देण्याची आवश्यकता नसते. सुरुवातीला आठवड्यातून एकदा व महिन्यातून एकदा रोपांची वाढ झाल्यावर हलके पाणी द्यावे लागणार आहे.

पोषक वातावरण गरजेचे

शतावरीच्या मुळांच्या वर पातळ साल असते. साल काढल्यावर पांढरे दुधाचे मूळ मिळते, जे सुकल्यावर त्याची पावडर होते. त्यासाठी उष्णता, दमट व 10.5 अंश सेल्सिअस तापमान असलेले व वार्षिक 250 सेंमी चे पर्जन्यमान असलेले हवामान शतावरी लागवडीसाठी योग्य मानले जाते. बियांपासून शतावरीची रोपे तयार केली जातात. शतावरीच्या लागवडीसाठी एकरी 5 किलो बियाणे लागते. रोप लावल्यानंतर जेव्हा वनस्पती वाढीस सुरुवात होते, तेव्हा त्याच्या मुळांचे उत्खनन करावे. त्यानंतर ते स्वतंत्रपणे वाळवले जातात.

हे सुद्धा वाचा

उत्पादन खर्चाच्या चारपट उत्पन्न

शेतकऱ्यांना एकरी 350 क्विंटल गिलियड मुळे मिळतात, जी सुकल्यानंतर 35 क्विंटलपर्यंत शिल्लक राहतात. शतावरीच्या लागवडीत एकरी 80 हजार ते 1 लाख रुपये खर्च येतो, तर एकरी चार लाख रुपये नफा मिळतो.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी हा योग्य पर्याय निर्माण होत आहे. सध्या अनेक कंपन्या शेतकऱ्यांशी करार करून शतावरीची शेती करत आहेत. याचा फायदा शेतकऱ्यांना उत्पादन विक्रीसाठी बाजारपेठेचा शोध घ्यावा लागत नाही.

'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?.
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?.
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती.
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने.
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.
पहलगाम हल्ला कोणाच्या आदेशावरून? पाकिस्तानी पत्रकाराचा खळबळजनक दावा
पहलगाम हल्ला कोणाच्या आदेशावरून? पाकिस्तानी पत्रकाराचा खळबळजनक दावा.
परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे - मुख्यमंत्री फडणवीस
परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे - मुख्यमंत्री फडणवीस.