‘लक्षात असू द्या’ कोऱ्या कागदावर सह्या म्हणजे फसवणूक, आ. माधवराव पाटलांकडून विमा कंपन्यांच्या कारभाराची पोलखोल

पंचनाम्यादरम्यान पिक विमा कंपनीचे प्रतिनीधी हे किती टक्के नुकसान झाले याबाबत शेतकऱ्यांना काही माहिती सांगत नाहीत तर बांधावरून पंचनामा करुन कोऱ्या कागदावर शेतकऱ्यांची सही घेतात. याचा अर्थ हा पंचनामा आम्हाला मंजूर असून यापोटी जी रक्कम मिळणार याच्याशी सहमती दर्शवितो. त्यामुळे नुकसानीची टक्केवारी माहिती झाल्याशिवाय कोणत्याही कागदावर सह्या न करण्याचा सल्ला (Nanded) हिमायत नगरचे आ. माधवराव पाटील यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. शिवाय विमा कंपनीचा कारभार कशा पध्दतीने चालतो हे सांगताना त्यांची जीभही घसरली.

'लक्षात असू द्या' कोऱ्या कागदावर सह्या म्हणजे फसवणूक, आ. माधवराव पाटलांकडून विमा कंपन्यांच्या कारभाराची पोलखोल
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 04, 2021 | 10:50 AM

नांदेड : पीक विमा कंपनीचे प्रतिनीधी हे नुकसान झालेल्या पीकांचा पंचनामा करीत आहेत. पण मदत करण्याची त्यांची मानसिकता नाही. त्यामुळे पंचनामा (Panchnama) झाला म्हणजे मदत मिळणारच असे नाही. पंचनाम्या दरम्यान पिक विमा कंपनीचे प्रतिनीधी हे किती टक्के नुकसान झाले याबाबत शेतकऱ्यांना काही माहिती सांगत नाहीत तर बांधावरून पंचनामा करुन कोऱ्या कागदावर शेतकऱ्यांची सही घेतात. याचा अर्थ हा पंचनामा आम्हाला मंजूर असून यापोटी जी रक्कम मिळणार याच्याशी सहमती दर्शवितो. त्यामुळे नुकसानीची टक्केवारी माहिती झाल्याशिवाय कोणत्याही कागदावर सह्या न करण्याचा सल्ला (Nanded) हिमायत नगरचे आ. माधवराव पाटील यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. शिवाय विमा कंपनीचा कारभार कशा पध्दतीने चालतो हे सांगताना त्यांची जीभही घसरली.

मध्यंतरी पावसाने खरीपातील पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसा झाले आहे. त्यामुळे गत आठवड्यापासून लोकप्रतिनीधीसह विमा कंपनीचे प्रतिनिधी हे पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचत आहेत. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन देखील त्याची भरपाई ही मिळावी अशी मानसिकता ही विमा कंपनीची नाही. त्यामुळे पंचनामा केल्याचे दाखवत हे विमा प्रतिनीधी शेतकऱ्यांना नुकसानीसंदर्भात योग्य ती माहीती देत नाहीत.

शिवाय कोऱ्या कागदावर शेतकऱ्याची स्वाक्षरी घेऊन केलेल्या पंचनाम्याला शेतकऱ्याची सहमती असल्याचे सांगतात. यामुळे मदती जाहीर करण्याच्या दरम्यान, प्रत्यक्षात झालेले नुकसान हे अधिकचे असते पण कोऱ्या कागदावर सही केल्याने विमा कंपनी मनमानी कारभार करून कमीचे नुकसान दाखवते. यावेळी आ. पाटील यांनी सांगितले की, गेल्या अनेक दिवसांपासून असाच प्रकार घडत असून अधिकचे नुकसान असूनही प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कमी नुकसानभरपाऊ मिळत आहे.

अन् आमदारांची जीभ घसरली…

विमा कंपन्यांचा अजब कारभार आहे. भरलेल्या विमा रकमेपोटी शेतकऱ्यांना कधीच वेळेवर पैसे मिळालेले नाहीत. विमा कंपन्यांच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त करीत असताना आ. माधवराव पाटील यांचा जीभेवरील ताबा सुटला आणि हरामखोर म्हणत विमा कंपन्यांचा कारभार कसा चालतो हे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

गतवर्षीच्या नुकसान भरपाईची शेतकऱ्यांना अद्यापही प्रतिक्षाच

गतवर्षीही परतीच्या पावसामुळे हदगाव परिसरातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. सोयाबीन, उडीद हे पाण्यात होते. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडला होता. मात्र, विमा कंपन्यांचा मनमाही कारभारचा सामना शेतकऱ्यांना अद्यापही करावा लागत आहे. वर्ष पूर्ण झाले तरी शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे यंदा तर ही चूक विमा कंपनीकडून झाली तर भर रस्त्यावरच हिशोब घेतला जाणार असल्याचा इशारा आ. माधवराव पाटील यांनी दिला आहे.

विमा कंपनी प्रतिनीधी बांधावरच

शेतामध्ये पावसाचे पाणी अजूनही साचलेले आहे. त्या पाण्यात जाऊन शेतकऱ्यांनी पंचनामे व्हावेत याकरिता दावे केले. मात्र, विमा कंपनीचे प्रतिनीधी नियमानुसार नुकसानीची टक्केवारी ठरवत नाहीत. बांधावरुनच अंदाजे नुकसान ठरवत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.

पंचनाम्याची कशी असते प्रक्रीया

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची तक्रार सर्वप्रथम शेतकऱ्यांना द्यावी लागते. नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी विभागातील कृषी सहायक, मंडळ अधिकारी हे शेतकऱ्यांच्या बांधावर येतात. शेतकऱ्याच्या पिकाच्या नोंदीनुसार पंचनामे केले जातात. तर प्रत्येक एकरावरची पाहणी न करता नुकसान झालेल्या पिकाचे निकष हे त्या गटाकरीता लागू केले जातात. (Mla advises farmers on governance of crop insurance companies, don’t let them be cheated: A. Madhavrao Patil)

संबंधित बातम्या :

…म्हणून उडदाच्या दरात वाढ, शेतकऱ्यांनो मालाची काळजी घ्या अन् योग्य दर मिळवा

छत्तीसगडच्या शेतकऱ्याने नापीक जमिनीत आणली हिरवळ, आज 500 लोकांना रोजगार

‘गोऱ्हा नाही कालवडच होणार’, गाईचं गर्भाशयच ट्रान्सप्लांट करण्याचा गडकरींचा मंत्र, महाराष्ट्रासह देश बदलणार, काम सुरु

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.