शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! यंदाचा पावसाळा शेतकऱ्यांच्या डोळ्यांमधील अश्रू पुसणार, चारही महिने बरसणार

गेल्या वर्षाप्रमाणे यावर्षीदेखील जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस (Monsoon rain 2021) पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! यंदाचा पावसाळा शेतकऱ्यांच्या डोळ्यांमधील अश्रू पुसणार, चारही महिने बरसणार
पाऊस
Follow us
| Updated on: Mar 26, 2021 | 7:16 PM

मुंबई : गेल्या वर्षाप्रमाणे यावर्षीदेखील जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस (Monsoon rain 2021) पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला तर शेतकऱ्यांसह देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील याचा फायदा होईल. कारण भारताची दोन तृतीयांश जनता ही शेतीवर अवलंबून आहे.

ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाचा अंदाज

ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाने यावर्षी सर्वसामान्य पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस (Monsoon rain 2021) पडेल, असा अंदाज वर्तवण्यात येतोय. ऑस्ट्रेलियाचं हवामान खातं हे त्याच्या अचूक अंदाजासाठी जास्त प्रसिद्ध आहे. दरम्यान, भारतीय विभागाकडून अद्याप हवामान विभागाबाबत कोणताही अंदाज वर्तवण्यात आलेला नाही. कदाचित एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. याशिवाय एक्यूवेकर या वेदर कंपनीनेनदेखील भारतात यावर्षी दुष्काळ पडणार नाही, असा अंदाज वर्तवला आहे.

शेतकऱ्यांचा पाण्याचा खर्च वाचेल

भारतात अनेक ठिकाणी मे महिन्याच्या सुरुवातीला पेरणीला सुरुवात केली जाते. यावर्षी जर मान्सुन पूर्व काळात चांगला पाऊस पडला तर शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. याशिवाय शेतकऱ्यांना त्यांचं शेत तयार करण्यासाठीही चांगली मदत होईल. याशिवाय त्यांना पाण्यासाठी लागणारा खर्चही वाचेल.

योग्य वेळी पेरणी झाली तर चांगले पीकं उगवण्याची आणि त्यापासून चांगलं उत्पन्न मिळण्याची शक्यता वाढते. जर खरंच तसं झालं तर शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळेल. अनेक भागात सध्या शेतकरी त्यांच्या शेतीला पेरणीसाठी तयार करत आहेत. दरम्यान, मान्सून यावर्षी धोका देणार नाही, अशी वैज्ञानिकांनादेखील आशा आहे.

अर्थव्यवस्था सुधारण्यासही मदत होईल

पाऊस कमी-जास्त पडला तर त्याचा थेट परिणाम खेड्या गावात राहणाऱ्या नागरिकांवर पडतो. त्यामुळे पाऊस चांगला किंवा सामान्य स्वरुपाचा पडला तर शेतकऱ्यांना दिलासा मिळतो. कारण पावसाळ्यात पीकांना जास्त पाण्याची आवश्यकता असते. पावसाच्या पाण्यातून ती गरज भरुन निघते. पीकांना चांगलं पाणी मिळाल्याने उत्पन्न देखील चांगलं येतं. त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा तर होतोच याशिवाय देशाची आर्थिक व्यवस्थाही सुधारते.

पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला.
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्..
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्...