पीकविमा योजना : 6 वर्षात 36 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना लाभ, यंदा योजनेत काय बदल?

पंतप्रधान पीकविमा योजनेचा लाभ देशभरातील 36 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना झालेला आहे. केंद्र सरकारची ही सर्वात मोठी योजना असून योजनेला 6 वर्ष पूर्ण झाली आहेत. या दरम्यानच्या काळात केंद्र सरकारला 1 लाख कोंटींहून अधिकचा खर्च आला आहे. पण शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान होऊनही झळ पोहचू नये हा उद्देश सरकारचा कायम राहिलेला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे असो की वन्य प्राण्यांमुळे पिकांचे नुकसान अशा प्रसंगी या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना झालेला आहेच.

पीकविमा योजना : 6 वर्षात 36 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना लाभ, यंदा योजनेत काय बदल?
देशातील 36 कोटीहून शेतकऱ्यांना पीकविमा योजनेचा लाभ मिळत आहे.
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 1:05 PM

मुंबई : पंतप्रधान (Crop Insurance Scheme) पीकविमा योजनेचा लाभ देशभरातील 36 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना झालेला आहे. केंद्र सरकारची ही सर्वात मोठी योजना असून योजनेला 6 वर्ष पूर्ण झाली आहेत. या दरम्यानच्या काळात (Central Government) केंद्र सरकारला 1 लाख कोंटींहून अधिकचा खर्च आला आहे. पण शेतकऱ्यांना (Crop Damage) पिकांचे नुकसान होऊनही झळ पोहचू नये हा उद्देश सरकारचा कायम राहिलेला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे असो की वन्य प्राण्यांमुळे पिकांचे नुकसान अशा प्रसंगी या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना झालेला आहेच. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्याचे अधिकचे नुकसान होऊ नये म्हणून ही योजना विशेषत: अत्यल्प भूधारक तसेच भूधारक शेतकऱ्यांना याचा फायदा व्हावा यामुळे राबवण्यात येत आहे. यंदा योजनेत अधिक नियमितता येण्यासाठी तसेच शेतकऱ्यांनाही ही योजना काय आहे याची माहीती करुन देण्यासाठी ‘मेरी पॉलिसी, मेरे हाथ’ हा उपक्रम राबवून आता विमा कंपनीचे प्रतिनीधी हे थेट शेतकऱ्यांच्या दारी जाऊन पीक विमा रक्कम भरुन घेणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही.

यंदाच्या अर्थसंकल्पात 15 हजार 500 कोटींची तरतूद

यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पीक विम्यासाठी 15 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. एकूणच यंदाच्या अर्थसंकल्पात राष्ट्रीय कृषी विकास योजनेची तरतूद चांगली झाली आहे. यामुळे देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत तर होईलच, पण त्याचबरोबर कृषी क्षेत्रातही नवी सुरुवात करता येईल.

केंद्राकडून 1 लाख कोटींची भरपाई

नैसर्गिक आपत्तीमधून शेतकऱ्यांचे नुकसान कमी होईल या अनुशंगानेच प्रयत्न करण्यात आले आहेत. या संदर्भात गेल्या सहा वर्षांत पंतप्रधान पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून देण्यात येणारी नुकसान भरपाई रक्कम ही 1 लाख कोटीहून अधिक आहे. तर देशभरातील शेतकऱ्यांनी प्रीमियमपोटी केवळ 21 हजार कोटी रुपये दिले आहेत, मात्र त्यांना नुकसान भरपाई म्हणून एक लाख कोंटीहून अधिक रक्कम मिळाली.

हवामान बदलाने नुकसान झाल्यासही मदत

आता दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान होत आहे. यंदाच्या खरिपात तर पावसामुळे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठी मदत करण्यात आली. शिवाय, खराब हवामानामुळे पिकांची पेरणी झाली नाही पण योजनेत सहभाग आहे अशा शेतकऱ्यांना देखील विमा रकमेच्या 25 टक्क्यांपर्यंत रक्कम थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्याची तरतूद केंद्र सरकारच्या योजनेत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना हवामानाशी संबंधित जोखमीची भीती वाटणार नाही.

असा भरला जातो प्रीमीयम..

हंगाम रब्बी असो की खरीप पेरणी झाली की, पीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांकडून किमान प्रीमियम भरून घेतला जातो. त्यासाठी सर्वप्रथम पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच https://pmfby.gov.in/ जावे लागणार आहे. येथे तुम्हाला इन्शुरन्स प्रीमियम कॅलक्युलेशन नावाच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला तुमच्या पिकाबद्दल काही माहिती विचारली जाते. उदा. कापणीची वेळ कोणती, राज्य कोणते, योजनेचे नाव काय? जिल्हा इत्यादी. यानंतर तुम्हाला सुरक्षित पर्याय निवडावा लागेल आणि आता तुमच्यासमोर तुमचा प्रीमियम आणि क्लेमची रक्कम दोन्ही पर्याय असतील यामाध्यमातून प्रमीयम अदा करावा लागणार आहे.

संबंधित बातम्या :

Rabi Season : हरभऱ्याचे क्षेत्र वाढले, आवकही वाढली दराचे काय? पीक कापणी मात्र जोमात

शेतकऱ्यांना मिळतोय जोडव्यवसयाचा ‘आधार’, गायीच्या दूधदरात अखेर वाढ?

Coconut Farming : काय सांगता? मराठवाड्यातही नारळाच्या बागा, कृषी तज्ञांनी दिला शेतकऱ्यांना कानमंत्र..!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.