ही कोंबडी म्हणजे सोन्याचं अंडं देणारीच जणू, हिच्या पुढे कडकनाथही फेल; एका अंड्याची किंमत ऐकाल तर…
असील कोंबडीचं तोंड लांब आणि लाटण्याच्या आकाराचं असतं. भरपूर पंख, घनदाट डोळे आणि लांब मान हे या कोंबडीचं वैशिष्ट्ये आहे. या कोंबडीचे पाय सरळ आणि मजबूत असतात.
नवी दिल्ली : आपण सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबडीबद्दल लहानपणापासून ऐकत आलो आहोत. पण अशी कोंबडी आपल्याला कधी पाहायलाच मिळाली नाही. अशा कोंबड्या केवळ कहाणीतच अस्तित्वात असतात हेही आपल्याला माहीत आहे. पण अशीही एक कोंबडी आहे. जिची तुलना तुम्ही सोन्याचं अंडं देणाऱ्या कोंबडीशी करू शकता. कारण ही कोंबडी अत्यंत दुर्मिळ आहे. तिच्यासमोर कडकनाथ कोंबडीही फेल आहे. इतकच काय या कोंबडीचं एक अंडं घेणं तुमच्या खिशालाही परवडणारं नाही. म्हणून तर ही कोंबडी सोन्याचं अंडं देणाऱ्या कोंबडीपेक्षा काही कमी नाहीये.
या कोंबडी आणि कोंबड्यांचं नाव असील असं आहे. असील कोंबड्या म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. या कोंबड्या इतर कोंबड्यांसारखे रोज अंडी देत नाहीत. वर्षातून केवळ 60 ते 70 अंडीच या कोंबड्या देतात. पण या कोंबडीच्या अंड्याची किंमत खूप जास्त आहे. असील कोंबडीचं एक अंडं 100 रुपयांना मिळतं. या कोंबडीचं अंडं खाणं डोळ्यांसाठी खूप चांगलं असतं असं सांगितलं जातं.
कशी असते ही कोंबडी
असील कोंबडीचं तोंड लांब आणि लाटण्याच्या आकाराचं असतं. भरपूर पंख, घनदाट डोळे आणि लांब मान हे या कोंबडीचं वैशिष्ट्ये आहे. या कोंबडीचे पाय सरळ आणि मजबूत असतात. या जातीचे कोंबडे 4 ते 5 किलो आणि कोंबड्या 3 ते 4 किलोच्या असतात. कोकराल कोंबड्यांचं वजन साडे तीन ते साडेचार किलो असते. तर पुलैट्स कोंबड्यांचं वजन अडीच ते साडे तीन किलो असते. हे कोंबडे झुंजीच्या स्पर्धेसाठीच मोठ्या प्रमाणात वापरले जातात.
कोणत्या राज्यात असतात या कोंबड्या
असील जातीच्या या कोंबड्या दक्षिण पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि आंध्रप्रदेशात आढळून येतात. या कोंबड्यांच्या सर्व जातींमध्ये रेजा (हलका लाल), टीकर (भुऱ्या रंगाच्या), चित्ता (काळ्या आणि सफेद सिल्व्हर रंगाच्या), कागर (काळ्या रंगाच्या) न्यूरी 89 (पांढऱ्या), यारकिन (काळ्या आणि लाल) पिवळ्या (सोनेरी लाल) कोंबड्या सर्वाधिक प्रसिद्ध आहेत.