शेतकऱ्यांना आता महावितरणचा ‘शॅाक’, कृषीपंपासाठी वेगळा नियम, ऐन रब्बीच्या तोंडावर निर्णय

आाता नवेच संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. आतापर्यंत शेतीसाठी 10 तास वीजपुरवठा केला जात होता. मात्र, ऐन रब्बीच्या तोंडावरच यामध्ये बदल करण्यात आला असून आता केवळ 8 तास वीजपुरवठा राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ होणार आहे.

शेतकऱ्यांना आता महावितरणचा 'शॅाक', कृषीपंपासाठी वेगळा नियम, ऐन रब्बीच्या तोंडावर निर्णय
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 02, 2021 | 2:21 PM

लातूर : नैसर्गिक संकटाचा सामना करताना शेतकऱ्यांची दमछाक सुरु आहे. पावसामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. बाजारपेठेत शेतीमालाला योग्य दर नाही अशा अवस्थेत देखील रब्बी हंगामाच्या पेरणीला सुरवात झाली आहे. असे असताना आाता नवेच संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. आतापर्यंत शेतीसाठी 10 तास वीजपुरवठा केला जात होता. मात्र, ऐन रब्बीच्या तोंडावरच यामध्ये बदल करण्यात आला असून आता केवळ 8 तास वीजपुरवठा राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ होणार आहे.

रब्बी पिकांची जोपासना करण्यासाठी यंदा शेतकऱ्यांकडे मुबलक प्रमाणात पाणीसाठा आहे. त्यामुळे उत्पादन वाढेल अशी आशा आहे मात्र, आता महावितरण कंपनीने हा नविन निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ होणार आहे.

महावितरणचा निर्णय दरवर्षीची अडचण

यंदाच नाही तर दरवर्षी रब्बी हंगामाला सुरवात झाली की, महावितणकडून हा निर्णय घेतला जातो. सिंगल फेज योजनेमुळे गावातील विद्युत पुरवठा हा सुरळीत होतो पण कृषीपंपाचा पुरवठा हा दोन तासांनी कमी करण्यात आला आहे. त्यामुळे पाणीसाठा असतानाही अडचणी निर्माण होणार आहेत. यंदा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने रब्बीच्या क्षेत्रातही वाढ होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवलेला आहे. त्यामुळे साहजिकच क्षेत्र वाढले तर कृषीपंपाचा वापर हा करावा लागणार आहे.

दिवसभरात मिळणार 8 तासच लाईट

खरीप हंगामात वीजेची आवश्यकता भासत नाही. पावसामुळे पिकांनाही पाणी मिळते मात्र, रब्बी हंगामातील पिकांची जोपासना ही साठवूकीच्या पाण्यावरच करावी लागते. यातच सध्या वाढत्या ऊनामुळे पेरणी करण्यापूर्वी आणि पेरल्यानंतरही पाणी द्यावे लागणार आहे. आतापर्यंत 10 तास वीजपुरवठा केला जात होता. मात्र, 1 नोव्हेंबरपासून नियमात बदल करुन शेतीसाठी 8 तासच विद्युतपुरवठा राहणार आहे.

यामुळे घेण्यात आला निर्णय

महावितरणच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कमी वेळेत अधिकचे भरणे कसे होईल याचे नियोजन करावे लागणार आहे. काळाच्या ओघात सिंचनासाठी आता स्प्रिक्लर, ठिबकचा वापर वाढलेला आहे. मात्र, शेतकरी अत्याधुनिक पध्दतीचा अवलंब करीत असला तरी विज ही गरजेची आहेच. पण कोळसा टंचाईचे कारण पुढे करीत ही वीज कपात करण्यात आली आहे. शिवाय 8 तासही सुरळीत पुरवठा होत नसल्याने यंदा महाविरणच्या निर्णयामुळे रब्बीच्या उत्पादनात घट होऊ नये म्हणजे झालं. (MsEDCL reduces power supply of agricultural pumps during rabi season)

संबंधित बातम्या :

अनियमितता टाळण्यासाठी पीएम किसान योजनेत अणखीन बदल, अन्यथा मिळणार नाहीत पैसे

सोयाबीनचा दर स्थिर पण विक्री करायची कुठे ? शेतकऱ्यांकडे आहेत हे पर्याय

किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांची दिवाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात, संघर्ष दिंडीनंतर आता महामुक्काम

काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.