AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अहमदनगर जिल्ह्यात पावसाची दडी, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट, बळीराजा अडचणीत

अहमदनगर जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावतंय. जिल्ह्यात जवळपास 60% खरीपाची पेरणी झाली असून येत्या काही दिवसात जर पाऊस पडला नाही तर शेतकरी आर्थिक संकटात सापडणार आहेत. (problem of drought due to lack of Monsoon Rain)

अहमदनगर जिल्ह्यात पावसाची दडी, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट, बळीराजा अडचणीत
अहमदनगर जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावतंय.
Follow us
| Updated on: Jul 04, 2021 | 1:43 PM

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावतंय. जिल्ह्यात जवळपास 60% खरीपाची पेरणी झाली असून येत्या काही दिवसात जर पाऊस पडला नाही तर शेतकरी आर्थिक संकटात सापडणार आहेत. (Nagar District Farmer facing problem of drought due to lack of Monsoon Rain)

पावसाअभावी पिकं संकटात

अहमदनगर जिल्ह्यात साधारण 2 लाख 61 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी झालीय. सुरूवातीला अनेक तालुक्यात पेरणीयोग्य पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेतात खरीप पिकांची पेरणी केली आहे. मात्र गेल्या आठ दिवसापासून पावसाने दडी मारल्याने ही पिकं आता संकटात सापडली आहेत.

पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

नगर जिल्ह्यात सर्वात जास्त बाजरी आणि उडीद यांचा पेरा झालाय. त्याखालोखाल तुर, मुग, मका, वाटाणा आणि भाताची पेरणी झालीय. अजूनही अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली नाहीय. तर ज्यांनी पेरणी केली आहे त्यांची पिके वाचवण्यासाठी धडपड सुरू आहे.

शेतकरी संकटात

अनेक शेतकरी तर लाखो रूपये खर्च करून पिकाला स्प्रिंकलरने पाणी देताना दिसत आहेत. राहाता तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा आहे. शेतकरी वरुणराजाच्या आगमनाकडे डोळे लावून बसलाय पण वरुणराजा काही दर्शन देईना.. जर येत्या काही दिवसांत वरुणराजाने दर्शन दिलं नाही तर शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडणार आहे.

रुसलेल्या वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी अकोल्यात शेतकऱ्यांचं साकडं

अकोला जिल्हासह वाडेगाव परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने अनेक जण ‘मुसळधार पाऊस बरसू दे आणि शेतकऱ्याचं रान हिरवंगार होऊ दे’, अशी प्रार्थना परमेश्वराकडे करत आहेत. तर काहींनी धोंडी धोंडी पाणी दे म्हणत वरुणराजाला साकडं घालत आहेत.

पावसाची दडी, पिकांची शेवटची घटका

गेल्या अनेक वर्षापासून अवेळी आणि अपुऱ्या पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांला नापिकीला सामोरे जावे लागत असल्याने शेतकरी कमालीचा धास्तावला आहे. आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांनी यावर्षी तरी बऱ्यापैकी पाऊस होईल या आशेने बी-बियायाणे व खताची जुळवाजुळव केली. पावसानेही थोड्या प्रमाणात हजेरी लावल्याने शेतकरी पेरते झाले होते. मात्र पेरणी केलेली पिके बऱ्यापैकी अंकुरले असतानाच गेल्या काही दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने पिके शेवटची घटका मोजतांना दिसत आहेत.

(Nagar District Farmer facing problem of drought due to lack of Monsoon Rain)

हे ही वाचा :

मराठवाडा दुष्काळाच्या छायेत, लाखो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट

रुसलेल्या वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी ‘धोंडी धोंडी पाणी दे…’ म्हणत शेतकऱ्यांचं साकडं….!

वैभवी देशमुखला 85.33 टक्के; वडिलांच्या आठवणीने अश्रु अनावर
वैभवी देशमुखला 85.33 टक्के; वडिलांच्या आठवणीने अश्रु अनावर.
भारतानं पाकचं पाणी रोखल, खळखळून वाहणाऱ्या 'चिनाब'ची अवस्था नाल्यासारखी
भारतानं पाकचं पाणी रोखल, खळखळून वाहणाऱ्या 'चिनाब'ची अवस्था नाल्यासारखी.
2 आणि 5 वर्षांची मुलं पाकिस्तानात, आई भारतात; अटारी सीमेवर ताटातुट
2 आणि 5 वर्षांची मुलं पाकिस्तानात, आई भारतात; अटारी सीमेवर ताटातुट.
काँग्रेस फोडा, खाली करा... ते आपल्याकडे.. भाजपच्या बड्या नेत्याचा आदेश
काँग्रेस फोडा, खाली करा... ते आपल्याकडे.. भाजपच्या बड्या नेत्याचा आदेश.
युद्धाची चाहूल? पीओकेमध्ये पळापळ, रेशनची साठवणूक, मदरशे बंद
युद्धाची चाहूल? पीओकेमध्ये पळापळ, रेशनची साठवणूक, मदरशे बंद.
भारतीय सुरक्षा संस्थांकडून अ‍ॅक्टिव्ह दहशतवादी समोर, मुख्य लीडर कोण?
भारतीय सुरक्षा संस्थांकडून अ‍ॅक्टिव्ह दहशतवादी समोर, मुख्य लीडर कोण?.
आज बारावीचा निकाल; निकालापूर्वी वडिलांच्या आठवणीने वैभवी भावुक
आज बारावीचा निकाल; निकालापूर्वी वडिलांच्या आठवणीने वैभवी भावुक.
यंदाही कोकणचे विद्यार्थी अव्वल; सर्वाधिक 96.74 टक्के निकाल
यंदाही कोकणचे विद्यार्थी अव्वल; सर्वाधिक 96.74 टक्के निकाल.
बारावीचा रिझल्ट लागला, राज्याचा निकाल किती टक्के? यंदा बाजी कोणाची?
बारावीचा रिझल्ट लागला, राज्याचा निकाल किती टक्के? यंदा बाजी कोणाची?.
भारताची पाऊलं अफगाणिस्ताननं ओळखली? माजी राष्ट्रपती म्हणाले, असं वाटतंय
भारताची पाऊलं अफगाणिस्ताननं ओळखली? माजी राष्ट्रपती म्हणाले, असं वाटतंय.