Rain Forecast | बहावा पिवळसर फुलांनी लगडला, दमदार पाऊस पडण्याचे संकेत
बहावा मोठया प्रमाणात बहरला की पाऊस दमदार होतो, असे मानले जाते. गोल्डन शॉवर ट्री म्हणून देखील या झाडाला ओळखले जाते. (Nanded Golden Shower Heavy rain )
नांदेड : चैत्र महिन्यात बहरणारा बहावा यंदा पिवळसर फुलांनी लगडून गेलाय. रखरखत्या उन्हात बहरलेल्या या बहाव्याचे सौंदर्य हे डोळ्यांना सुखावणारे असेच आहे. त्यामुळे यंदा दमदार पाऊस पडण्याचे संकेत मिळत आहेत. सध्या घामाच्या धारांनी त्रस्त महाराष्ट्रासाठी गुड न्यूजच मानली जाते. (Nanded Golden Shower Tree Bahava hints at Heavy rain in Maharashtra)
बहावा मोठया प्रमाणात बहरला की पाऊस दमदार होतो, असे मानले जाते. गोल्डन शॉवर ट्री म्हणून देखील या झाडाला ओळखले जाते. त्याला जितक्या प्रमाणात फुले लागतात, तितक्याच प्रमाणात पाऊस होतो, अशी ग्रामीण भागात धारणा आहे. यंदा बहावा मोठ्या प्रमाणात फुलल्याने दमदार पाऊस होईल, असेच संकेत मिळत आहेत.
हवामान खात्याचा अंदाज काय?
यंदा मान्सून 1 जून रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या मान्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण पोषक आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्याच आठवड्यात केरळात मान्सून दाखल होईल. तर 10 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होईल. त्यानंतर 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र व्यापून टाकेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 15 मे आणि 31 मे रोजी पावसाचा अधिकृत अंदाज वर्तवला जात आहे. गेल्या दोन वर्षात अरबी समुद्रातील वादळामुळे महाराष्ट्रात मान्सून लांबणीवर पडला होता. मात्र यंदा अशी कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे केरळात जर मान्सून वेळेवर दाखल झाला तर महाराष्ट्रातही वेळेवर दाखल होण्याचा अंदाज आहे.
स्कायमेटचा अंदाज काय?
स्कायमेटच्या मान्सूनच्या अंदाजानुसार जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर चार महिन्यांत सरासरीच्या बीबीएम .6 मिमीच्या तुलनेत 2021 मध्ये 103 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये 5 टक्के कमी किंवा अधिक असू शकते. पावसाळ्याच्या प्रादेशिक कामगिरीवर स्कायमेटचा अंदाज आहे की उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील काही भागांत संपूर्ण हंगामात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
यंदाच्या वर्षी देशातील अधिक भागांत सामान्य मान्सून म्हणजेच 96 ते 104 टक्क्याच्या दरम्यानचा पाऊस पडेल. यावर्षी पाऊसकाळ चांगला रहाणार असून मान्सून सामान्य असेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. 98 टक्के पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. येत्या मे महिन्यात मॉन्सूनबद्दलचा दुसरा अंदाज जाहीर केला जाईल.
संबंधित बातम्या :
Monsoon | मान्सून 1 जून रोजी केरळात, हवामान विभागाचा अंदाज, राज्यात कुठे-कधी पाऊस?
कसा असेल यावर्षीचा मान्सून, पाऊसकाळ? स्कायमेटचा हा अंदाज वाचा
ऐन कोरोना काळात गूड न्यूज! यावर्षी चांंगला पाऊसकाळ, सामान्य मान्सूनचा हवामान विभागाचा पहिला अंदाज
(Nanded Golden Shower Tree Bahava hints at Heavy rain in Maharashtra)