‘ई-पीक पाहणी’त मराठवाड्यात नांदेड अव्वलस्थानी, जनजागृतीचा परिणाम

महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी अधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा म्हणून बांधावर जाऊन जनजागृती केली होती. त्यामुळेच नांदेड जिल्ह्यात 3 लाख 52 हजार 691 शेतकऱ्यांच्या नोंदी झालेल्या आहेत. शिवाय उर्वरीत दोन दिवसांमध्ये अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे अवाहन जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी केले आहे.

'ई-पीक पाहणी'त मराठवाड्यात नांदेड अव्वलस्थानी, जनजागृतीचा परिणाम
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 13, 2021 | 4:59 PM

लातूर : ‘ई-पीक पाहणी’च्या माध्यमातून पीकांची नोंदणी करण्यास केवळ दोन दिवसाचा कालावधी राहिलेला आहे. त्यामुळे जिल्हानिहाय आकडेवारी ही आता समोर येत आहे. या मोहिमेच्या सुरवातीपासूनच वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती केलेल्या नांदेड जिल्ह्यानेच मराठवाड्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे. पीक पेरा नोंदणीची सुरवात ही 15 ऑगस्टपासून झाली होती. तेव्हापासून महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी अधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा म्हणून बांधावर जाऊन जनजागृती केली होती. त्यामुळेच नांदेड जिल्ह्यात 3 लाख 52 हजार 691 शेतकऱ्यांच्या नोंदी झालेल्या आहेत. शिवाय उर्वरीत दोन दिवसांमध्ये अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे अवाहन जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी केले आहे.

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत 19 लाख 62 हजार 64 पेरा नोंदणी झाली आहे. नांदेड जिल्ह्यात तीन लाख 52 हजार 691 नोंदी झाल्या आहेत. या नोंदणी मराठवाड्यात सर्वाधिक आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर लातूर व तिसऱ्या स्थानी उस्मानाबाद जिल्हा आहे.

जनजागृतीचा परिणाम

या मोहिमेच्या सुरवातीला शेतकरी याकडे दुर्लक्ष करीत होते तर ही जबाबदारी शेतकऱ्यांची असल्याचे सांगत महसूल विभागाचे अधिकारी कानडोळा करीत होते. त्यामुळे सुरवातीला नांदेड जिल्ह्यात कमी नोंदी झाल्या होत्या. ही बाब जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी गावागावत जाऊन या अॅपची माहिती शेतकऱ्यांना सांगण्याचे आदेश दिले होते. तर गावस्तरावर ज्यांना अत्याधुनिक प्रणालीची माहिती आहे अशा युवकांची नेमणूक केली होती. त्यामुळे नोंदणी ही वाढलेली आहे. वेगवेगळ्या उपक्रमामुळे नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक पीक पेऱ्याच्या नोंदी झाल्या आहेत.

ई-पीक पाहणी’चे असे आहेत फायदे

1) ‘ई-पीक पाहणी’ या अॅपमुळे शेतकऱ्यांच्या पीक पेरणीची अचूक नोंद होणार आहे. यामुळे ना शेतकऱ्याचे नुकसान होणार आहे ना सरकारची फसवणूक. 2) या अॅपरील नोंदीमुळे राज्यात, देशात एखाद्या पिकाचा पेरा किती झाला आहे याची अचूक आकडेवारी एका क्लिकर उपलब्ध होणार आहे. 3) पिकाच्या अचूक आकडेवारीमुळे उत्पादनाबद्दल अंदाज बांधता येतो. यावरुन भविष्यात बी-बियाणे लागणारे खत हे पण उपलब्ध करुन देता येणार आहे. शेतावरील गटावर झालेल्या पीक नोंदीचा फायदा हा देशात कीती क्षेत्रावर कीती ऊत्पन्न झाले हे सांगण्यासाठी देखील होणार आहे. 4) पिकाच्या छायाचित्रामुळे किती अक्षांश: आणि किती रेखाअंशावर कोणत्या पिकाचा पेरा झाला आहे हे समजले जाणार आहे. 5) एका मोबाईलहून 20 शेतकऱ्यांच्या नोंदी करता येणार आहेत. प्रत्येक शेतकऱ्याकडे मोबाईल नसतो त्यामुळेच अशा प्रकारची सोय करण्यात आली आहे.

मराठवाड्यातील नोंदी

नांदेड 3,52, 691 लातूर – 3,03,070 उस्मानाबाद – 2,56,038, जालना – 2,40,612, बीड – 2,35,082, औरंगाबाद – 2,16,778, हिंगोली – 1,87,163, परभणी – 1,40,630 (nanded-ranks-first-in-marathwada-in-e-crop-inspection-initiative-benefits-from-awareness)

संबंधित बातम्या :

‘झिरो बजेट शेती’ ही महाराष्ट्रातील संकल्पना, आता पुन्हा नैसर्गिक शेतीची गरज

सोयाबीन दराचा परिणाम बाजारपेठेवर ; आवकही घटली

शेवटचे दोन दिवस, 90 लाख शेतकऱ्यांनी केली ‘ई-पिक पाहणी’च्या माध्यमातून नोंदणी

सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’.
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं.
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर.
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?.
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?.