जगभर बंदी असलेल्या कीटकनाशकांचं काय होणार? केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर म्हणाले…
27 कीटकनाशकांपैकी बहुतांश कीटकनाशकं भारतीय शेतकरी मोठ्या प्रमाणावर वापरात. ban on 27 imminent pesticides
नवी दिल्ली: केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी जगभरात बंदी असलेल्या 27 कीटकनाशकांवर बंदी घालण्याबाबत विचालेल्या प्रश्नावर उत्तर दिलं आहे. नरेंद्र तोमर यांनी त्यासंदर्भात एक प्रस्ताव तयार करण्यात आला आहे त्यावर त्यासंबंधी लोकांकडून त्यांचं मत मागवलं असून काही जणांकडून त्यावर आक्षेप घेण्यात आले आहेत, तर काही जणांनी बदल सुचवलेत, अशी माहिती दिली. काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता. जानेवारी 2021 मध्ये यावर विचार करण्यासाठी एक तज्ञ समिती बनवल्याची माहिती देखील तोमर यांनी दिली. (Narendra Tomar answer about question regarding ban on 27 imminent pesticides)
केंद्रीय कृषी मंत्रालयानं लॉकडाऊन सुरु असताना 14 मे 2020 ला एक अधिसूचना जारी केली होती. त्यामध्ये कीटकनाशकं जी मनुष्य आणि प्राण्यांसाठी धोकादायक आहेत त्यांच्या वापरावर बंदी घालण्याबाबत प्रस्ताव ठेवण्यात आला होता. 27 कीटकनाशकांपैकी बहुतांश कीटकनाशकं भारतीय शेतकरी मोठ्या प्रमाणावर वापरात.कीटकनाशक बनवणाऱ्या उद्योगानं याचा विरोध केला होता.
शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा पडण्याचा दावा
पेस्टीसाईडस मॅन्युफॅक्चरर्स अँड फॉर्मयुलेटर्स असोसिएशन ऑफ इंडियान ने सरकारनं 27 कीटकनाशकांवर बंदी घातल्यास त्याचा फटका शेतकऱ्यांना बसेल, असं सांगतिल. 12 हजार कोटी रुपयांची बाजारपेठ चीनच्या हातात जाऊ शकते असा दावा देखील करण्यात आला. परिणामी यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा वाढेल कारण जी कीटकनाशक 350 ते 450 प्रति लीटर मिळतात, त्याची किंमत 1200 ते 2000 हजार रुपये होईल, असा दावा करण्यात आला.
विशेषज्ञ समिती काय करणार?
27 कीटकनाशकांची सुरक्षितता, त्यातील विषाचं प्रमाण, प्रभाव किती पडतो याचा अभ्यास, सध्याची स्थिती, वैज्ञानिकांचा आक्षेप, सुरक्षित पर्याय ,शेतकऱ्यांचं हित या गोष्टींचा अभ्यास तज्ञ समिती करणार आहे. काँग्रेस खासदर शशी थरुर यांनी केंद्र सरकारला याबाबतप्रश्न विचारला होता. जगभरात बंदी असलेल्या 27 कीटकनाशकांच्या वापरावर बंदी घालण्याबाबत काय सरकारचं काय धोरण आहे, असा सवाल थरुर यांनी सरकारला केला होता.
या कीटकनाशकांवर बंदी?
डियूरॉन, मालाथियॉन, अॅसफेट, मिथोमिल, मोनोक्रोटोफॉस,अल्ट्राजाईन, बेनफराकारब, बुटाक्लोर, कॅप्टन, कारबेडेंजिम, कार्बोफ्यूरान, क्लोरप्यरिफॉस, थीओडीकर्ब, थायोफनेट मिथाइल, 2.4-डी, डेल्टामेथ्रीन, डिकोफॉल, डिमेथोट, डाइनोकैप, मैनकोजेब, ऑक्सीफ्लोरीन, पेंडिमेथलिन, क्यूनलफॉस, सलफोसूलफूरोन, थीरम, जीनेब आणि जीरम या कीटकनाशकांचा त्यामध्ये समावेश आहे.
… तर तू असंच केलं असतं का?, वीरेंद्र सेहवागचा विराट कोहलीवर गंभीर आरोप, मॅच जिंकूनही वीरु भडकला!https://t.co/GZsDp3HR3b#VirendraSehwag #ViratKohli #INDvsENG
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 24, 2021
संबंधित बातम्या:
रासायनिक खतावरील सबसिडी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार? केंद्र सरकार म्हणालं…
रत्नागिरी हापूस आंबा आता थेट इंग्लड आणि कतारला जाणार, सातशे डझन आंब्याच्या निर्यातीची तयारी
(Narendra Tomar answer about question regarding ban on 27 imminent pesticides)