आशिया खंडातील अग्रेसर लासलगाव बाजार समिती तब्बल 7 दिवस बंद, कोट्यवधींची उलाढाल ठप्प, शेतकरी चिंतेत

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा व धान्य लिलावाचे कामकाज 7 बंद राहणार आहेत. Nashik Lasalgaon APMC closed

आशिया खंडातील अग्रेसर लासलगाव बाजार समिती तब्बल 7 दिवस बंद, कोट्यवधींची उलाढाल ठप्प, शेतकरी चिंतेत
लासलगांव बाजार समिती
Follow us
| Updated on: Mar 29, 2021 | 12:10 PM

नाशिक: आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना मार्चमधील अखेरचे दिवस, होळी, धुलिवंदन असे सण आणि साप्ताहिक सुट्ट्या आहेत. आशिया खंडातील अग्रेसर असलेली कांद्याची बाजारपेठ लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा व धान्य लिलावाचे कामकाज 7 बंद राहणार आहेत. बाजार समिती 7 बंद असल्याने कोट्यवधींची उलाढाल ठप्प होणार आहे. लासलगाव बाजार समिती सलग 7 दिवस बंद राहिल्यानं शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. (Nashik Lasalgaon APMC closed for seven days farmers facing problems)

कोरोनाचा कांदा उत्पादकांना फटका

मार्च महिन्यातील अखेरचे दिवस असूनही लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याची आवक अद्यापही मोठ्या प्रमाणात होत आहे. नवीन उन्हाळ कांद्याची आवक दाखल झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे कांद्याच्या बाजारभावात घसरण होत आहे. कांद्याचे बाजार भाव एक हजार रुपयांच्या आत आले असून सर्वसाधारण 800 ते 900 रुपये कांद्याला बाजार भाव मिळत आहे.

तोट्यात विक्री

कांदा उत्पादक शेतकरी आपला कांदा तोट्यात विक्री करत आहे. कोरोनाचं संकट त्यात पडलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सात दिवस मार्च एंडिंग, सण आणि साप्ताहिक सुट्ट्या निमित्त बँकेतून पैसे मिळणार नसल्याने लासलगाव बाजार समितीसह नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा व धान्यचे लिलावाचे कामकाज बंद राहणार आहे. यामुळे लासलगाव बाजार समिती आवारात शुकशुकाट दिसत आहे. सलग 7 दिवस बाजारसमिती बंद राहिल्यानं कोट्यवधींची उलाढाल ठप्प होणार असल्यानं कांदा उत्पादकांच्या अडचणीत वाढ होणार.

मनमाड बाजार समिती एका आठवड्यात साठी बंद

धार्मिक सन, विविध सुट्ट्या आणि मार्च एन्डमुळे मनमाड येथील बाजार समिती 7 दिवस बंद राहणार आहे. बाजार समिती बंद असल्याने कांदा ,मका सह शेतमालाचा लिलाव बंद राहणार आहे. येथील लिलाव बंद राहणार असल्याने करोडो रुपयांची उलाढाल ठप्प होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावत घसरण सुरू असताना बाजार समिती 7 दिवस बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

संबंधित बातम्या:

Onion Price Today : कांदा सर्वसामान्यांना रडवणार, लासलगावात कांदा 45 रुपयांवर पोहोचला

कांद्यांनं पन्नाशी ओलांडली, सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार?

(Nashik Lasalgaon APMC closed for seven days farmers facing problems)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.