कांदा चाळीचे महत्व कळाले, साठवणूक केलेल्या उन्हाळ कांद्याचे दर वधारले

पावसाचा परिणाम तसा खरीपातील पिकांवर झाला तसा तो खरीप कांद्यावरही झाला आहे. अतिवृष्टी झालेल्या भागातील कांद्याचे रोगराईमुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे उन्हाळी कांद्याचाच पर्याय समोर असून आता या कांद्याचे दर वाढत आहेत.

कांदा चाळीचे महत्व कळाले, साठवणूक केलेल्या उन्हाळ कांद्याचे दर वधारले
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 05, 2021 | 11:30 AM

नाशिक : शेती मालाच्या उत्पादनाबरोबरच बाजारपेठ आणि त्याची साठवणूक ही देखील तेवढीच महत्वाची आहे. कारण योग्य दर नसल्यास त्याची साठणूक केली तर फायदेशीर ठरते. अगदी त्याप्रमाणेच कांदा चाळीत ज्या शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक केली होती त्यांच्या बाबतीत पाहवयास मिळत आहे. पावसाचा परिणाम तसा खरीपातील पिकांवर झाला तसा तो खरीप कांद्यावरही झाला आहे. अतिवृष्टी झालेल्या भागातील कांद्याचे रोगराईमुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे उन्हाळी कांद्याचाच पर्याय समोर असून आता या कांद्याचे दर वाढत आहेत.

गेल्या दोन वर्षापासून निसर्गाच्या अवकृपेमुळे कांदा उत्पादक हे संकटात आहेत. गतवर्षीही अवकाळी, गारपिटीमुळे अणखीन अडचणीत वाढल्या. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कांदा उत्पादन घेऊन शेतकऱ्यांनी चांगल्या कांद्याची साठवणूक केली. मात्र, भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी साठवणूकीवरच भरच दिला. दुष्काळात तेरावा याप्रमाणेच वातावरणातील बदलांमुळे कांद्याची सड होऊ लागली होती.

त्यामुळे कांद्याची विक्री करावी तर दर कमी आणि साठवणूक करावी तर नुकसान. अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये मात्र, आता दरामध्ये सुधारणा होत आहे. मराठवाडा, विदर्भ या भागात पावसामुळे खरीप कांद्याचे नुकसान झाले आहे तर राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यातील कांदा पीक अडचणीत सापडले. त्यामुळे गेल्या 8 दिवसांपासून कांद्याच्या मागणीत वाढ होऊन दरात सुधारणा होत आहे.

आवक घटली अन् दर वाढले

दरवर्षी 15 ऑगस्टनंतर खरीप कांद्याची आवक होत असते. या हंगामात दिवसाकाठी 1 हजार वाहनांतून कांदा बाजारात दाखल होत असतो. यंदा मात्र, ही आवक 25 टक्क्यांवर आलेली आहे. मराठवाड्याप्रमाणेच गुजरात आणि राज्यस्थान येथील कांद्याला देखील बुरशीजन्य रोग आणि पावसाचा फटका हा बसलेला आहे. त्यामुळे कांद्यासाठी प्रसिध्द असलेल्या नाशिक बाजारात कांद्याची आवक ही घटलेली असून आता उन्हाळी साठवलेल्या कांद्याला महत्व प्राप्त होत आहे. गतमहिन्याच्या तुलनेत क्विंटलमागे 400 ते 500 रुपयांची वाढ झालेली आहे. मागणी व पुरवठा हे समीकरण व्यस्त झाल्याने सध्या नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा या भागांतील कांद्याला अधिकचे महत्व प्राप्त झाले आहे.

पुढील दोन महिने कांदा उत्पादकांना ‘अच्छे दिन’

कांद्याच्या मागणी आणि होणाऱ्या पुरवठ्यात तफावत निर्माण झाली आहे. त्यामुळे साठवून ठेवलेल्या कांद्याला अधिकचे महत्व प्राप्त झाले आहे. यातच बाजारात नव्याने कांदा दाखल होईल अशी सध्याची परस्थिती नाही. कारण अतिवृष्टीमुळे कांद्याचे नुकसान तर झालेच आहे. शिवाय पावसाने उघडीप दिल्यानंतर आता बुरशीजन्य रोगराई होत आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

नाशिक जिल्ह्यातील बाजारामधील सरसरी दर स्थिती

बाजार समिती                               सप्टेंबर      ऑक्टोबर

पिंपळगाव बसवंत                          1680        2601 लासलगाव                                     1771          2450 सटाणा                                           1650        2550 चांदवड                                          1632        2400 मनमाड                                          1525        2400 उमराणे                                          1550        2550

यामुळे साठवणुकीच्या कांद्याला आले महत्व

राज्यात तर कांद्यावर बुरशीजन्य रोगराईचा प्रादुर्भाव झालेला आहेच शिवाय राज्यस्थान येथेही कांद्यावर किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. गुजरातमध्येही पावसामुळे कांद्याचे नुकसान झाले आहेच. तर राज्यातील सर्वच भागातील कांद्याची आवक ही लांबणीवर पडणार आहे. पावसामुळे ही परस्थिती राहणार आहे. आंध्रप्रदेशातील कर्नुल तेलंगणामधील गडवाल, वानापट्टी या भागात देखील कांद्याचे मोठे उत्पादन घेतले जाते. यंदा मात्र येथेही उत्पादनात घट होणार आहे. (Nashik Market: Onion prices rise, onion prices rise in stored onions)

संबंधित बातम्या :

प्रधानमंत्री कुसुम योजना : सौर प्रकल्प उभारणीसाठी निविदा भरण्याची आज शेवटची मुदत

पीक नुकसान तुमचे, जबाबदारीही तुमचीच ; शासनाच्या निर्णयामुळे शेतकरी हवालदिल

कारखाने सुरु करण्यासाठी ‘रेड झोन’ मधील साखर कारखान्यांची अनोखी शक्कल

'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.