AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तरुण शेतकऱ्याला मारहाण, कांद्याचे भाव पाडले, व्यापाऱ्यावर कारवाईसाठी शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन

विक्री केलेल्या कांद्याचे पैसे तातडीनं मागणार्‍या शेतकऱ्याला व्यापाऱ्याकडून मारहाण झाल्याच्या निषेधार्थ कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत.

तरुण शेतकऱ्याला मारहाण, कांद्याचे भाव पाडले, व्यापाऱ्यावर कारवाईसाठी शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन
येवल्यात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
Follow us
| Updated on: Jun 23, 2021 | 3:58 PM

नाशिक: विक्री केलेल्या कांद्याचे पैसे तातडीनं मागणार्‍या शेतकऱ्याला व्यापाऱ्याकडून मारहाण झाल्याच्या निषेधार्थ कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं आक्रमक होत येवला बाजार समिती सचिव कार्यालयात धरणे आंदोलन केले. कांदा लिलाव सुरु होताच चतुर व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना झटका देण्यासाठी कमी दराने कांदा लिलाव सुरु केल्याने शेतकरी संतप्त झाले. संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या मुख्यालय बाहेर ठिय्या आंदोलन केले. (Nashik Yeola onion Producer farmer started protest for take action on trader who beat Akshay Gudaghe)

व्यापाऱ्यावर कारवाईची मागणी

येवला बाजार समितीच्या आवारात कांदा लिलावात विक्री केलेल्या कांद्याचे व्यापाऱ्याकडे पैसे मागणार्‍या ममदापूर येथील अक्षय गुडघे या शेतकऱ्याला व्यापारी व कामगाराकडून अरेरावी करत मारहाण झाली आहे. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने व्यापाऱ्यांच्या निषेधार्थ आक्रमक पवित्रा घेतला. शेतकऱ्यांनी बाजार समितीचे सचिव कैलास व्यापारे यांच्याकडे दोषी व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.

शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याचा परवाना रद्द करण्याची मागणी केली मात्र सचिवाकडून प्रतिसाद न मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकरी व महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी सचिव कार्यालयात धरणे आंदोलन सुरू केले. यानंतर कांदा लिलाव सुरु झाले आणि व्यापाऱ्यांनी कमी दराने कांदा लिलाव घेण्यास सुरुवात केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या मुख्यालया बाहेर अर्धा तासाहून अधिक वेळ शेकडो ठिय्या आंदोलन सुरू केले.

पोलिसांची धावपळ

शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केल्यानं बाजार समितीचे प्रशासक व पोलिसांची धावपळ उडाली. योग्य दराने कांद्याचे लिलाव करत संबंधित व्यापारी रविवारी पीडित शेतकऱ्याची माफी मागणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र, संबंधित व्यापाऱ्यांनी रविवारी माफी न मागितल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी बाजार समिती प्रशासन व पोलिसांना महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिला.

शेतकऱ्याला मारहाण झाली हा जो प्रकार घडला आहे या संदर्भात बाजार समितीच्या वतीने संबंधित कांदा व्यापाऱ्याला नोटीस देखील दिली आहे. त्यांचा खुलासा लवकरच येणार असून त्यासंदर्भात व्यापारी आणि शेतकऱ्याची चर्चा देखील घडवून आणली आहे. त्यामुळे हा वाद मिटला आहे, असं बाजार समिती सभापती वसंत पवार म्हणाले आहेत. संबंधित व्यापारी कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्याला मारहाण केली हा प्रकार चुकीचा असून यावर प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

संबंधत बातम्या:

विक्री केलेल्या कांद्याचे पैसे तातडीनं मागितले, व्यापाऱ्यांकडून तरुण शेतकऱ्याला बेदम मारहाण, संतप्त शेतकर्‍यांचा रस्ता रोको

PM Kisan Scheme: शेतकऱ्यांसाठी खुशखबर; केंद्र सरकार बँक खात्यावर ट्रान्सफर करणार 4000 रुपये

(Nashik Yeola onion Producer farmer started protest for take action on trader who beat Akshay Gudaghe)

भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा.
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी.
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला.....
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला...
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला....
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी...
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी....
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली.
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका.
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली.
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं..
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं...