दुष्काळात तेरावा : निसर्गाचा लहरीपणा अन् बोगस बियाणे, उत्पादनावरील खर्चानेच शेतकरी मेटाकूटीला
वातावरणातील बदलाचा परिणाम थेट पिकांच्या वाढीवर होत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे रब्बी हंगामातील उत्पादनाबद्दल शेतकरी चिंतेत असताना दुसरीकडे बोगस बियाणांचा मुद्दा देखील समोर येत आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील कृषी केंद्रातून वितरीत झालेले बियाणे हे बोगस असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होत आहे.
नांदेड : वातावरणातील बदलाचा परिणाम थेट पिकांच्या वाढीवर होत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे (Rabi Season) रब्बी हंगामातील उत्पादनाबद्दल शेतकरी चिंतेत असताना दुसरीकडे बोगस बियाणांचा मुद्दा देखील समोर येत आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील कृषी केंद्रातून वितरीत झालेले बियाणे हे बोगस असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होत आहे. शिवाय त्याचा प्रत्ययही (Farmer) शेतकऱ्याला आला असून ऐन घाटे लागण्याच्या अवस्थेच पीक वाळत आहे. त्यामुळे आता नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहे. आता पर्यंत वाढत्या किडीच्या प्रादुर्भावातून पिकाचे संरक्षण व्हावे याकरिता शेतकऱ्यांनी एकरी हजारो रुपये खर्च करुन जोपासना केली आहे. या नैसर्गिक संकटावर शेतकऱ्यांनी मात केली पण आता बियाणेच बोगस असल्याने उत्पादनाच्या आशा मावळल्या आहेत. पांधरा येथील दौलात बारापात्रे यांच्या 3 एकरातील हरभऱ्याचे अक्षरशः वाळवण झाले आहे. त्यामुळे आता कृषी विभागाकडून काय कारवाई होणार हे पहावे लागणार आहे.
हरभरा पिकाचे नुकसान
यंदा रब्बी हंगामात हरभरा पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. अधिकच्या पावसामुळे रब्बी हंगामातील पेरण्या महिनाभराने लांबणीवर पडलेल्या होत्या. त्यामुळे उत्पादन वाढीच्या अनुशंगाने शेतकऱ्यांनी हरभऱ्याचेच उत्पादन घ्यावे असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले होते. मात्र, बोगस बियाणांवरील कारवाईबाबत कृषी विभागाने ठोस कारवाई न केल्याने आता हे लोण तालुकास्तरावर पोहचलेले आहे. यातूनच किनवट तालुक्यातील पांधरा येथील शेतकरी बारापात्रे यांनी 3 एकरामध्ये पेरा केलेल्या हरभऱ्याचे जवळपास 80 टक्के नुकसान झाले आहे. बोगस बियाणामुळेच हे नुकसान झाल्याचा आरोप शेतकऱ्याने केला असून यासंबंधी जिल्हाधिकारी यांच्याकडेही लेखी तक्रार करुन कारवाईची मागणी केली आहे.
आतापर्यंतच्या खर्चाचे काय?
रब्बी हंगामातील पेरणी झाल्यापासून वातावरणातील बदलामुळे सर्वच पिकांवर किडीचा प्रादुर्भाव हा कायम आहे. त्यामुळे बारापात्रे यांनीही महागडी औषधे खरेदी करुन पीक जोपासण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, जमिनीत गाढलेले बियाणेच बोगस असल्याने हरभरा या पिकाची वाढ खुंटलेली आहे. त्यामुळे आतापर्यंत या पिकावर झालेला खर्च कोण देणार असा देखील प्रश्न त्यांनी लेखी तक्रारीमध्ये नमूद केला आहे.
कृषी कार्यालयाची महत्वाची भूमिका
शेतकरी दौलात बारापात्रे यांनी कृषी केंद्रावरील कारवाईबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली असली तरी कारवाईचे अधिकार हे कृषी विभागाकडे आहेत. कृषी विभागात बोगस बियाणे, रासायनिक खतांचा साठा याची निघराणी करण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक केलेली असते. त्यामुळे या बोगस बियाणांबाबत संबंधित कृषी सेवा केंद्रावर काय कारवाई होणार हे पहावे लागणार आहे.
संबंधित बातम्या :
Animal Bloating : कशामुळे फुगते जनावरांचे पोट? काय आहे उपाययोजना, वाचा सविस्तर
Corona Effect : कोरोना निर्बंधाचे परिणाम पोल्ट्री व्यवसयावर, मागणीतही घट