या जिल्ह्यात बेकायदेशीर बोगस खते आणि बोगस बियाणे याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष
मार्च आणि एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचे पंचनामे होऊन देखील अजूनही अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही, त्यामुळे आता झालेले आणि मागचे असे संयुक्त नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी अशी मागणी आता शेतकरी करीत आहे.

जितेंद्र बैसाणे, नंदुरबार : नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात ४ जून रोजी आलेल्या चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान (banana crop damage) झाले आहे. त्याचा सर्वाधिक फटका केळी पिकाला बसला आहे. जिल्ह्यात पाच हजार एकर क्षेत्रावरील नुकसान झाल्याचा अंदाज कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यात असून कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकांच्याद्वारे पंचनामे करण्यात येत आहेत. मार्च आणि एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचे (unseasonal rain) पंचनामे होऊन देखील अजूनही अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही, त्यामुळे आता झालेले आणि मागचे असे संयुक्त नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी अशी मागणी आता शेतकरी करीत आहे.
शेती सोबतच धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने लवकरात लवकर मदत द्यावी. तर जिल्ह्यातील पंचनाम्यांचे काम अंतिम टप्प्यात असून पंचनामे पूर्ण झाल्यावर पूर्ण नुकसानीचा अहवाल सादर होणार असल्याची माहिती कृषी आणि महसूल विभागाच्या वतीने देण्यात आली आहे अशी माहिती वनसिंग खर्डे सहाय्यक कृषी अधिकारी शहादा यांनी सांगितली.
नंदुरबार जिल्ह्यात बेकायदेशीर बोगस खते आणि बोगस बियाणे विक्री होत आहेत. परंतु कृषी विभाग या काळात दुर्लक्ष करत असून बोगस बियाणं खतं विक्री करणाऱ्यांवर कारवाई करत नसल्याने कृषी विभाग यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून एकदिवसीय धरणा आंदोलन केलं आहे. नंदुरबार जिल्ह्यात गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातून मोठ्या प्रमाणावर खत आणि बियाणे येत आहे, परंतु कृषी विभाग संबंधित कृषी सेवा केंद्र व विक्री होणारे लोकांवर कारवाई करताना दिसत नाही. यासाठी ठाकरे गटाने कृषी विभागाला तक्रार करून देखील दुर्लक्ष करत असल्याने आज ठाकरे गटाच्या वतीने नंदुरबार जिल्हा कृषी कार्यालयाच्याबाहेर बियाणं आणि खतांच्या बॅग घेऊन संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध आंदोलन केलं होतं.