सोयाबीन शेती न करणारा नेपाळ चर्चेत, भारतात 2 लाख टन तेल निर्यात, नेमकं प्रकरण काय?

नेपाळनं जुलै 2020 ते एप्रिल 2021 मध्ये भारताला 2 लाख 15 हजार टन सोयाबीन तेलाची तर 3 हजार टन कच्च्या तेलाची निर्यात केली आहे. Nepal export Soybean Palm oil

सोयाबीन शेती न करणारा नेपाळ चर्चेत, भारतात 2 लाख टन तेल निर्यात, नेमकं प्रकरण काय?
खाद्यतेलावर स्टॉक मर्यादा नियम लागू, पण किमती कमी होण्यास लागेल वेळ
Follow us
| Updated on: Jun 07, 2021 | 4:16 PM

नवी दिल्ली: भारतात सध्या खाद्यतेलाच्या किमतींनी मोठा उच्चांक गाठला आहे. सोयाबीन सोयाबीन तेलाची किंमत मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. सध्या सोयाबीन तेलाची चर्चा नेपाळमुळे होत आहे. नेपाळ सध्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर सोयाबीन तेल आणि पाम तेलाची निर्यात करत आहे. मात्र नेपाळमध्ये सोयाबीनची शेती केली जात नाही मग नेपाळ भारताला सोयाबीन तेल कसं पाठवत आहे. (Nepal export Soybean and Palm oil to India but Indian traders facing many problems )

एका करारानुसार नेपाळ आणि बांगलादेश यासारख्या शेजारील देशांना भारत सरकारने काही वस्तू भारतीय बाजारात विकण्यास मंजुरी दिलेली आहे. दक्षिण आशियाई शुल्क मुक्त व्यापार क्षेत्र स्थापन करण्यात आले आहे. या कराराचा नेपाळद्वारे दुरुपयोग केला जात असल्याचं तज्ञांचे मत आहे.

भारतीय व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान

नेपाळ आणि बांगलादेश मधील व्यापारी मोठ्या प्रमाणावर सोयाबीन आणि पाम तेल बाहेरून आयात करून भारतात निर्यात करत आहेत. भारतीय व्यापाऱ्यांना यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. जे भारतीय व्यापारी सोयाबीन तेलाची आयात करतात त्यांना कोट्यवधी रुपयांचा तोटा होत आहे. याशिवाय भारत सरकारला देखील जवळपास 1200 कोटी रुपयांच्या महसुलाचे नुकसान होत आहे.

नेपाळ आणि बांग्लादेशकडून परदेशातून आयात

नेपाळ आणि बांगलादेशला त्यांच्या देशात बनवलेल्या वस्तू भारतीय बाजारात विनाशुल्क विकण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. मात्र, दोन्ही देशांकडून याचा गैरफायदा घेतला जात आहे. दोन्ही देश दुसऱ्या देशातून सोयाबीन तेल आणि पाम तेल आयात करुन भारतात निर्यात करत आहेत. परिणामी भारतीय व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. नेपाळ आणि बांगलादेश मलेशिया आणि इंडोनेशियातून पाम तेल तर सोयाबीन तेल ब्राझील आणि अर्जेंटिना या देशातून आयात करत आहेत.

भारतात पाम तेल आणि सोयाबीन तेलावर किती शुल्क?

भारतीय व्यापारी क्रूड पाम तेल ज्यावेळेस आयात करतो त्यावेळेस त्याला एका लिटर 32 रुपये कर द्यावा लागतो. सोयाबीन तेलावर त्याला 42 रुपये शुल्क द्यावं लागतं. मात्र, नेपाळमधून भारतात निर्यात केल्या जाणाऱ्या सोयाबीन तेलावर कोणताही कर लागत नाही. आकडेवारीनुसार नेपाळनं जुलै 2020 ते एप्रिल 2021 मध्ये भारताला 2 लाख 15 हजार टन सोयाबीन तेलाची तर 3 हजार टन कच्च्या तेलाची निर्यात केली आहे.

संबंधित बातम्या:

Weather Update: महाराष्ट्रात आजही पावसाची दमदार बॅटिंग? हवामान विभागानं काय सांगितलं?

PM Kisan: पीएम किसान सन्मान योजनेच्या 8 व्या हप्त्याची रक्कम मिळाली नाही? एक फोनवर 2 हजार मिळवा

(Nepal export Soybean and Palm oil to India but Indian traders facing many problems )

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.