पंतप्रधान ठिबक सिंचन योजनेत नवी घोषणा, कुणाला मिळणार लाभ, काय आहेत फायदे ? जाणून घ्या

पंतप्रधान ठिबक सिंचन योजना ही सन 2015 मध्येच सुरु करण्यात आली आहे. मात्र, यामध्ये महत्वाचे बदल करण्यात आले असून आता 2025-26 पर्यंत या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ घेता येणार आहे. म्हणजेच यामध्ये 2 वर्षांची वाढ करण्यात आली आहे. पाण्याचा अपव्यय टाळता यावा व योग्य वापर करुन शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये म्हणून ही योजना सुरु करण्यात आली होती.

पंतप्रधान ठिबक सिंचन योजनेत नवी घोषणा, कुणाला मिळणार लाभ, काय आहेत फायदे ? जाणून घ्या
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 15, 2021 | 4:20 PM

मुंबई : पंतप्रधान ठिबक सिंचन योजना ही सन 2015 मध्येच सुरु करण्यात आली आहे. मात्र, यामध्ये महत्वाचे बदल करण्यात आले असून आता 2025-26 पर्यंत या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ घेता येणार आहे. म्हणजेच यामध्ये 2 वर्षांची वाढ करण्यात आली आहे. पाण्याचा अपव्यय टाळता यावा व योग्य वापर करुन शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये म्हणून ही योजना सुरु करण्यात आली होती. शिवाय केंद्र सरकारने या योजनेकरिता 50 हजार कोटींची तरतूदही केली आहे. सिंचनासाठी जर स्प्रिंकलरचा वापर केला तर 80 ते 90 टक्के अनुदान सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार आहे. शिवाय स्प्रिंकलरमुळे शेतजमिनीचे नुकसान तर होणार नाहीच शिवाय कमी उंचीच्या पिकांसाठी हे प्रभावी आहे.

आता सरकारने काय निर्णय घेतला आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान कृषी सिंचन योजने वाढीव मुदत देण्यात आली आहे. आता ही योजना 2025-26 पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणार आहे.

योजनेचा कोण लाभ घेऊ शकते

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे शेतजमिन असणे आवश्यक आहे. शेतकरी वैयक्तिक तर लाभ घेऊ शकतोच शिवाय शेती गट, संस्था, सहकारी संस्था, कॉर्पोरेट कंपन्या, शेती उत्पादक कंपन्यांच्या गटांचे सदस्य आणि इतर पात्र संस्थांचे सदस्य यांनाही लाभ घेता येणार आहे. पंतप्रधान ठिबक सिंचन योजना 2021 चा हा अशा शेतकऱ्यांनाही होणार आहे जे गेल्या सात वर्षांपासून भाडेपट्टी करारांतर्गत शेतजमिन करीत आहेत. कंत्राटी पध्दतीने शेती करणाऱ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज

सर्वप्रथम इच्छूकाला महाडीबीटी ऑनलाइन पोर्टल ओपन करायचे आहे. यामध्ये मुखपृष्ठावर अर्ज करा असा टॅग दिसेल त्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर सिंचन साधने सुविधा यावर क्लिक करुन समोरील बाबी निवडा हा पर्याय ओपन करायचा आहे. यामध्ये जिल्हा तालुका गाव आणि वैयक्तिक माहिती भरायची आहे. ही माहिती भरून झाल्यानंतर मुख्य घटक मध्ये सिंचन साधने आणि सुविधा हा घटक निवडायचा आहे.

*यानंतर दिलेली माहिती पूर्ण भरायचे आहे. ज्या पिकासाठी आपल्याला ठिबक सिंचन पाहिजे आहे त्याची माहिती देते भरावी लागणार आहे. यानंतर पूर्वसंमती शिवाय मी योजनेचा लाभ घेणार नाही अशी नोंद करावी लागणार आहे. यानंतर भरलेली माहिती सेव्ह करायचे आहे. यानंतर मुख्य मेनू वर जाऊन ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. मेनू वर आल्यानंतर सर्वात प्रथम ‘अर्ज सादर करा’ यावर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला तालुका हे ऑप्शन दिसेल शिवाय तुम्ही ज्यासाठी अर्ज केला आहे त्या योजनेचे नाव देखील येते समोर येईल.

यानंतर प्राथमिक प्रधान्य क्रमांक देऊन अटी-शर्ती त्या मान्य असल्याचे नमूद करावे लागणार आहे. यानंतर आपल्याला अर्ज सादर करावा लागणार आहे. पूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर 23 रुपये 60 पैसे आपल्या अकाउंट मधून भरावे लागणार आहेत याची प्रक्रिया ही ऑनलाइन करता येणार आहे.

संबंधित बातम्या :

आता शेतकऱ्यांची चिंता वाढली, सर्वकाही पोषक असतानाही सोयाबीनचे दर…

दुग्धोत्पादन वाढीसाठी देशी गायींवर कृत्रिम गर्भधारणा, राज्यात संकरीत गायींची संख्या वाढली

पोषक वातावरण असतानाही ऊस लागवड रखडली, काय आहेत कारणे?

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.