उन्हाळी हंगामातील नव्या प्रयोगातून निघेल का खरिपातील भरपाई? सर्वकाही पोषक असताना भीती कशाची
सध्या सोयाबीनचे दर हे 6 ते 6 हजार 500 रुपयांवर स्थिरावलेले आहेत. असे असले तरी खरीप हंगामात उत्पादनात मोठी घट झाल्याने ते नुकसान भरुन निघणारच नाही. मात्र, यंदा मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी हेच नुकसान भरुन काढण्याचा निर्धार केला आहे. आता खरिपात झालेले नुकसान भरुन कसे निघेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल पण शेतकरी ही किमया साधणार आहे तो उन्हाळी हंगामातून.
लातूर : सध्या सोयाबीनचे दर हे 6 ते 6 हजार 500 रुपयांवर स्थिरावलेले आहेत. असे असले तरी खरीप हंगामात उत्पादनात मोठी घट झाल्याने ते नुकसान भरुन निघणारच नाही. मात्र, यंदा (Marathwada) मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी हेच नुकसान भरुन काढण्याचा निर्धार केला आहे. आता खरिपात झालेले नुकसान भरुन कसे निघेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल पण शेतकरी ही किमया साधणार आहे तो (Summer Season) उन्हाळी हंगामातून. हो, उन्हाळी हंगामात सोयाबीन हा प्रयोग शेतकऱ्यांसाठी नवखा असला तरी पोषक वातावरण आणि उपलब्ध पाणीसाठ्याच्या जोरावर हे शक्य होणार आहे. त्यामुळे यंदा उन्हाळी हंगामात विक्रमी क्षेत्रावर (Soybean) सोयाबीनचा पेरा हा सुरुच आहे. वाफसा नसलेल्या क्षेत्रावर अद्यापही पेरण्या होणे बाकी आहे पण शेतकऱ्यांचा कल हा सोयाबीनवरच आहे. जमिनीची मशागत, पेरणी पाण्याचे नियोजन या गोष्टी असल्या तरी निसर्गाच्या लहरीपणाची धास्ती शेतकऱ्यांमध्ये कायम आहे. कारण खरिपाप्रमाणेच रब्बी हंगामातही बदलत्या वातावरणाचा धोका हा कायम राहिलेला आहे.
काय आहे कृषी विद्यापीठाचा सल्ला?
सोयाबीन या पिकाची गणना नागदी पीक म्हणून केली जाते. खरिपातील सोयाबीनचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले होते. मात्र दर चांगला असल्याने अद्यापही सोयाबीनचे पीक घेण्याकडेच शेतकऱ्यांचा कल आहे. शिवाय यंदा चांगला पाऊस झाल्याने पाण्याची देखील उपलब्धता आहे. त्यामुळे अतिवृष्टीत घटलेले सोयाबीनचे उत्पादन उन्हाळी सोयाबीनच्या माध्यमातून भरून काढणे शक्य आहे. जरी सोयाबीन पेरणी 15 तारखेपर्यंत करण्यास सांगितले असले तरी काही शेतकरी 25 जानेवारीपर्यंत पेरणी करू शकतात. नियमित सोयाबीनबरोबरच आगामी खरिपात बियाणाचा तुटवडा भासू नये म्हणून याच उन्हाळी हंगामात बिजोत्पादनाचाही प्रयोग केला जात आहे.
खरिपातील साठवणूक, उन्हाळी हंगामात विक्रमी पेरा
खरीप हंगामात उत्पादनात घट झाली असली तरी त्याची भरपाई ही दरातून का होईना यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत. अपेक्षित दराच्या प्रतिक्षेत अजूनही सोयाबीनची साठवणूक शेतकऱ्यांनी केली. शेतकऱ्यांच्या या भूमिकेमुळेच उशिरा का होईना चांगला मिळाला आहे. 4 हजार 500 रुपयांवर असलेले सोयाबीन आज 6 हजार 300 वर गेले आहे. उत्पादनात मोठी घट झाल्याने भविष्यातही मागणी राहणारच असल्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी tv9 मराठी शी बोलताना सांगितले आहे. निसर्गाचा लहरीपणा झाला नाही तर उन्हाळी हंगामातील सोयाबीन साधेल असा विश्वास शेतकरी व्यक्त करीत आहेत.
संबंधित बातम्या :
Latur Market: सोयाबीनचे दर अन् आवकही स्थिरच, शेतकऱ्यांचे लक्ष खरिपातील अंतिम पिकावर