Sugarcane : शरद पवारांनंतर अतिरिक्त उसाला घेऊन मंत्री नितीन गडकरी यांचे मोठे विधान, शेतकऱ्यांना सल्लाही..!

यंदा ऊस उत्पादनात वाढ झाली असली तरी अतिरिक्त उसाचा प्रश्न हा कायम आहे. आता वाढत्या उसाच्या क्षेत्राबाबत चिंता व्यक्त होत आहे. आठ दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ऊस हे आळशी शेतकऱ्यांचे पीक असल्याचे विधान केले होते. त्यानंतर अनेकांनी त्यावर नाराजीही व्यक्त केली होती. वाढत्या ऊस क्षेत्रावर त्यांनी इतर पिकांचा पर्यायही सांगितला होता. तर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या अतिरिक्त उसाबाबत विधान केले आहे.

Sugarcane : शरद पवारांनंतर अतिरिक्त उसाला घेऊन मंत्री नितीन गडकरी यांचे मोठे विधान, शेतकऱ्यांना सल्लाही..!
वाढत्या ऊस क्षेत्रावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चिंता व्यक्त केली आहे.Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 2:43 PM

सोलापूर : यंदा (Sugarcane Area) ऊस उत्पादनात वाढ झाली असली तरी अतिरिक्त उसाचा प्रश्न हा कायम आहे. आता वाढत्या उसाच्या क्षेत्राबाबत चिंता व्यक्त होत आहे. आठ दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ऊस हे आळशी शेतकऱ्यांचे पीक असल्याचे विधान केले होते. त्यानंतर अनेकांनी त्यावर नाराजीही व्यक्त केली होती. वाढत्या ऊस क्षेत्रावर त्यांनी इतर (Crop Change) पिकांचा पर्यायही सांगितला होता. तर आता (Central Minister) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या अतिरिक्त उसाबाबत विधान केले आहे. ऊसाचे क्षेत्र असेच वाढत गेले तर ऊस उत्पादकांना आत्महत्या करण्याची वेळ येईल. ऊस हे शाश्वत पीक असले तरी शेतकऱ्यांनी इतर पिकांचाही आधार घेणे गरजेचे आहे. तसेच उसाच्या सायरपपासून इथेनॉल निर्मिती केल्याशिवाय शेतकऱ्यांकडे आता पर्यायच उरणार नसल्याचेही ते म्हणाले.

बबनराव तुमच्या चेहऱ्यावर हसू पण…

यंदा साखरेचे सर्वाधिक उत्पादन हे भारत देशामध्ये झाले आहे. देशांतर्गत दर कमी असले तरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेची मागणी असल्याने भारतामधील साखरेला अधिकची मागणी आहे. हे केवळ ब्राझिलचे उत्पादन घटल्यामुळे झाले आहे. त्यामुळे विक्रमी गाळपामुळे आ. बबनराव शिंदे यांच्या चेहऱ्यावर हसू असले तरी ते तात्पुरते आहे. ऊसाचे वाढचे क्षेत्र हे धोक्याचेच राहणार आहे. असेच उत्पादन वाढत गेले तर ऊस उत्पादकांना देखील आत्महत्या करण्याची वेळ येईल असे नितीन गडकरी यांनी सुनावले आहे. एकाच पिकाच्या मागे न जात पीक पध्दतीमध्ये बदल करुन उत्पादन वाढविता येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

आ. शिंदे यांच्या कारखान्याचे 22 लाख टन उसाचे गाळप

देशात सर्वाधिक उसाचे गाळप करणारा साखर कारखाना म्हणून माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना ओळखला जातो. यंदाही या कारखान्याचे 22 लाख टनाचे गाळप झाल्याचे आ. बबनराव शिंदे यांनी सांगितले. पण 22 लाख टन उसाचे गाळप झाले असले तरी केवळ ब्राझिलचे साखर कारखाने सुरु नसल्यामुळे साखरेला दर आहे अन्यथा 22 रुपयेही दर मिळाला नसता असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

उसापासून इथेनॉल हा एकच पर्याय

उसाचे गाळप करुन साखरेचे उत्पादन यावरच साखर कारखान्यांचा भर आहे. पण उसावर प्रक्रिया करुन इथेनॉलची निर्मिती केली तर अधिकचा फायदा होणार आहे. त्यामुळे मागणीनुसार उत्पादनात बदल करण्याची ही चांगली संधी असून प्रत्येक कारखान्याने इथेनॉल निर्मितीवर भर देण्याचा सल्ला गडकरी यांनी दिला आहे. मात्र, अतिरिक्त उसाची केवळ चिंता आहे. पुढच्या वर्षी यापेक्षा बिकट अवस्था असेल असेही भाकीत त्यांनी वर्तविले.

संबंधित बातम्या :

Special News : बीडच्या जाधव बंधूची ‘फिनिक्स भरारी’, आता थेट ‘कृषिभूषण’ पुरस्काराची मोहर

Turmeric Crop: अवकाळीनंतरही हळदीला चढला ‘पिवळा’ रंग, प्रतिकूल परस्थितीमध्ये उत्पादन वाढले दराचे काय?

Chickpea Crop : हमीभाव केंद्रावर हरभरा विक्रीचा मार्ग मोकळा, पणन मंडळाने ‘असा’ कोणता निर्णय घेतला?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.