‘गोऱ्हा नाही कालवडच होणार’, गाईचं गर्भाशयच ट्रान्सप्लांट करण्याचा गडकरींचा मंत्र, महाराष्ट्रासह देश बदलणार, काम सुरु

नितीन गडकरी यांनी साखर कारखान्यात इथेनॉल निर्मिती आणि दूध उत्पादनावर भर दिला. दुधाचं उत्पादन वाढवण्यासाठी गडकरी यांनी भारत सरकार करत असलेल्या एका संशोधनाची माहितीही दिली. त्यात गाईचं गर्भाशय ट्रान्सप्लांट करण्याबाबत नाविन्यपूर्ण माहिती गडकरी यांनी दिली आहे.

'गोऱ्हा नाही कालवडच होणार', गाईचं गर्भाशयच ट्रान्सप्लांट करण्याचा गडकरींचा मंत्र, महाराष्ट्रासह देश बदलणार, काम सुरु
नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री
Follow us
| Updated on: Oct 02, 2021 | 3:03 PM

अहमदनगर : केंद्रीय रस्त्ये वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत अहमदनगरमध्ये आज 3 हजार 28 कोटी महामार्गाचे भूमीपूजन तर 1 हजार 46 कोटीच्या विकासकामांचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी साखर कारखान्यात इथेनॉल निर्मिती आणि दूध उत्पादनावर भर दिला. दुधाचं उत्पादन वाढवण्यासाठी गडकरी यांनी भारत सरकार करत असलेल्या एका संशोधनाची माहितीही दिली. त्यात गाईचं गर्भाशय ट्रान्सप्लांट करण्याबाबत नाविन्यपूर्ण माहिती गडकरी यांनी दिली आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. (New technology to increase milk production in Maharashtra and India)

दूध उत्पादन वाढीचा गडकरींचा मंत्र!

दुधाच्या बाबतीतही मोठी प्रगती आणि विकास पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांनी केला. माझ्याकडे मदत डेअरची मिटिंग होती. महाराष्ट्रेचे दूग्धविकास मंत्री सुनील केदार, मदर डेअरीचे चेअरमन आणि भारत सरकारचे सगळे अधिकारीही होते. मी त्यांना प्रश्न विचारला की आमच्याकडे मदर डेअरी रोज तीन लाख लीटर दूध गोळा करते. मी त्यांच्या मागे लागलो की तुम्ही रोज किमान 10 लाख लीटर दूध गोळा केलं पाहिजे. त्यावेळी मी सुनील केदार आणि अधिकाऱ्यांसमोर त्यांना एक प्रश्न विचारला की, एकट्या पुणे किंवा कोल्हापूर जिल्ह्यात जेवढं दुधाचं उत्पादन होतं तेवढं विदर्भात होत नाही, याची आम्हाला लाज आणि शरम वाटते.

2 लीटरची गाय थेट 25 लीटरवर येणार!

आता भारत सरकारने नवीन टेक्नॉलॉजी आणली आहे. ती आणण्याच्या मागे मी ही सातत्याने पाठपुरावा करतो आणि अनायासे पवार साहेबही याठिकाणी उपस्थित आहेत. ती म्हणजे आपल्याकडील गीर जातीची गाय 1952 साली ब्राझीलमध्ये गेली होती. त्याचा जो सांड होता त्याचं नाव होतं टोरँडो. त्याचं सिमेन आता आपण भारतात आणलं. मधल्या काळात आलल्याला माहिती आहे की आपण ह्युस्टन आणि जर्सीचं इंजेक्ट केलं. आपल्याकडे ज्या देशी जाती आहेत. त्यात आपण जर चांगल्या प्रकारचं सिमेन वापरलं. दोन लीटरच्या गाईला जर आपण हे सिमेन वापरलं तर त्यातून कमीत कमी 25 लीटरची कालवड तयार होते. महाराष्ट्रात मी सुनील केदार यांना विनंती केली होती आणि त्यांनी योजनाही काढली आहे. 100 रुपयामध्ये त्यांनी सबसिडी दिली आहे आणि आता हे सिमेन उपलब्ध करुन दिलं आहे.

गायीचं गर्भाशय ट्रान्सप्लांट करण्याचं तंत्रज्ञान

यात अजून मोठं संशोधन होत आहे आणि भारत सरकारही त्यात पुढाकार घेत आहे. ते संशोधन हे आहे की आपल्या गायीचं जे पोट किंवा गर्भ आहे तो ट्रान्सप्लांट करता येईल. भारत सरकारच्या मदतीनं मी आपल्या नागपुरात व्हेटर्नरी विद्यापीठ आहे, तिथे एक मोठी प्रयोगशाळा निर्माण केली आहे. तिथे आम्ही गाईचं पूर्ण लिव्हर ट्रान्सप्लांट करायचं. ते केल्यानंतर त्या गाईला चांगल्या सांडाचं सिमेन दिलं तर 25 – 30 लीटर दूध देणारी कालवड तयार होते. जसं बेटी बचाओ अभियान आहे. तसं आता तंत्रज्ञान बदललं आहे. त्यामुळे 99.99 टक्के कालवडच होते, गोऱ्हा होत नाही. पश्चिम महाराष्ट्रात चितळेंनी आता हे सुरु केलं आहे. महाराष्ट्र सरकारनंही पुढाकार घेतला, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे.

इतर बातम्या :

उद्धव ठाकरेंची शिर्डीत नवं शहर वसवण्याची घोषणा, गडकरी म्हणतात, उत्तम निर्णय!

सोलापूर-नगर-नाशिक-सुरत ग्रीनफिल्ड हायवे होणार, 50 हजार कोटी रुपयांच्या रस्त्याची गडकरींची घोषणा

New technology to increase milk production in Maharashtra and India

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.