Bullock Cart Race : न्यायालयाच्या निर्णयानंतर शौकिनांचा उत्साह शिघेला पण बाजारात मागणी नाही खिलार जोडीला
न्यायालयाने बैलगाडी शर्यतीला सशर्त परवानगी दिलेली आहे. त्यानंतर मात्र, बैलगाडी शर्यतीमधील शौकिनांचा उत्साह मोठ्या प्रमाणात वाढलेला होता. मात्र, जनावरांच्या आठवडी बाजारात याचे चित्र समोर आले नाही. बेल्हे येथील जनावरांचा आठवडी बाजार हा खिलार बैलांसाठी प्रसिध्द असतो.
पुणे : (high court) न्यायालयाने (Bullock cart competition) बैलगाडी शर्यतीला सशर्त परवानगी दिलेली आहे. त्यानंतर मात्र, बैलगाडी शर्यतीमधील शौकिनांचा उत्साह मोठ्या प्रमाणात वाढलेला होता. मात्र, जनावरांच्या आठवडी बाजारात याचे चित्र समोर आले नाही. बेल्हे येथील जनावरांचा आठवडी बाजार हा खिलार बैलांसाठी प्रसिध्द असतो. शिवाय आता बैलगाडी शर्यंत होणार त्यामुळे शेतकऱ्यांनी खिलार जोडी बाजारात आणली पण त्यांना मागणीच नसल्याचे चित्र पाहवयास मिळाले. त्यामुळे निर्णय तर झाला पण पूर्वीप्रमाणे जोमात बैलगाडी शर्यंतीच्या स्पर्धा पार पडणार का नाही हा देखील मोठा प्रश्न आहे.
राज्यभरातून खिलार बैलांच्या जोडी बेल्हे बाजारात
गेल्या अनेक दिवसांपासून जनावरांच्या आठवडी बाजारात कमालीचा शुकशुकाट होता. शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणचे बाजारही बंद होते. मात्र, न्यायालयाच्या एका निर्णयामुळे मोठा बदल होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. शिवाय निर्णयानंतर तसे वातावरणही झाले होते. म्हणूनच बेल्हे येथील बैल बाजारात संगमनेर, नाशिक, लासलगाव, बीड,कल्याण, नांदेड, उस्मानाबाद आदी जिल्ह्यातून शेतकरी व व्यापारी बैल खरेदी – विक्रीसाठी येत असतात. मात्र, कोर्टाच्या निर्णयाचा थेट परिणाम बाजारपेठेवर अद्यापपर्यंत तरी झाला नसल्याचेच चित्र आहे.
खिलार जोड 1 लाखापर्य़ंत
बेल्हेच्या बैल बाजारामध्ये गावठी, म्हैसुरी, खिल्लारी, पंढरपुरी बैलाची आवक जास्त असते. यामध्ये बैलगाडी शर्यंतीसाठी गावठी व खिलार बैलाना मागणी जास्त असते. खिलार खोंडाचे दर हे 55 ते 60 हजारापर्यंत होते. आता यामध्ये वाढ होईल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. पण मागणीच नसल्याने दर वाढीचा प्रश्नच नाही. त्यामुळे निर्णय झाल्यानंतरच्या पहिल्या बाजारात काहीसा परिणाम झाला असे नाही. खिलार बैलाला 55 ते 60 हजार रुपये किंमत मिळत आहे. त्यामुळे जरी लाखात व्यवहार होत असले तरी पाहिजे प्रमाणातच उलाढाल होत नसल्याचे चित्र होते.
आठवडी बाजारातील उलाढाल
बेल्हेच्या आठवडी बाजारात गावठी व खिलार बैलाना मागणी जास्त असते. यामधे खिल्लारी बैल वासरांना प्रत्येकी 50 ते 55 हजार ते 1 लाखापर्यंतची किंमत होत होती. त्यामुळे बैल बाजारात लाखाची उलाढाल झाली. खिलार व इतर जातीच्या 382 बैल वासरांची आवक झाली होती. तर त्यामधील 250 ते 275 च्या दरम्यान बैल वासराची फक्त खरेदी विक्री व्यवहार झाले. त्यामुळे बैलगाडी स्पर्धा सुरू झाल्याने खिलारी बैलाना सुगीचे दिवस येतील यात शंका नाही.