नोव्हेंबर वा डिसेंबरमध्ये ? नेमका केव्हा येणार पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणूकीपूर्वी गरीब शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पीएम किसान सन्मान योजनेची सुरुवात केली ...
नवी दिल्ली | 1 सप्टेंबर 2023 : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना गरीब आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी असून शेतकऱ्यांनी दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत त्यातून मिळते. या योजनेत चार महिन्यांच्या अंतराने दोन-दोन हजार रुपयांचे तीन हप्ते दिले जातात. शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत 14 हप्ते जमा झालेले आहेत. तसेच 15 व्या हप्त्यासाठी रजिस्ट्रेशनची प्रक्रीया सुरु झाली आहे. असे म्हटले जात आहे की नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा होऊ शकते असे म्हटले जात आहे.
रजिस्ट्रेशन करताना चुका नको
जर तुम्हाला पीएम किसान योजनेसाठी रजिस्ट्रेशन करायचे असेल तर तुम्ही लिहीलेल्या अर्जाच कोणतीही चूक असायला नको. शेतकऱ्यांचे लिंग, नाव, आधार क्रमांक किंवा पत्ता जरी चुकीचा लिहीला असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही. तसेच खाते क्रमांक चुकीचा लिहीला तरी हप्ता मिळताना अडचण होईल. त्यामुळे पीएम किसान योजनेसाठी रजिस्टर बनताना सावध रहायला हवे आहे.
आताही केवायसी करु शकता
जर शेतकऱ्यांना जर पुढील हप्ता हवा असेल तर त्यांना ई-केवायसीची प्रक्रीया पूर्ण करावी लागेल. जर तुम्ही अजूनही केवायसी केली नसेल तर तुम्ही तातडीने केवायसी प्रक्रीया पूर्ण करावी. शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळील सीएससी सेंटरवर जाऊन पीएम किसान पोर्टल pmkisan.gov.in वर जाऊन केवायसी करु शकतात. जर केवायसी केली नाही तर तुम्ही हप्त्यापासून वंचित राहू शकता.
शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये
पीएम किसान योजनेसंबंधी कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर किसान ईमेल आयडी pmkisan-ict@gov.in वर संपर्क करु शकता. पीएम किसान योजनेची हेल्पलाईन क्रमांक – 155261 किंवा 1800115526 ( Toll Free ) किंवा 011-23381092 वर कॉन्टेक्ट करु शकता.