आता पीक नुकसानीपुर्वीच निघणार तोडगा, ‘ड्रोन’ शेतीचा पहिला मान कोकणातील शेतकऱ्यांना
सलग तीन वर्षांपासून कोकणातील शेतकऱ्यांना कोणत्या ना कोणत्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे उत्पादनात घट तर होत आहेच शिवाय फळबागाच्या क्षेत्रावरही याचा परिणाम होत आहे. त्यामुळे आता अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, कीडीचा प्रादुर्भाव यावर त्वरीत तोडगा काढण्यासाठी तसेच शेती पिकाचा आराखडा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आता ड्रोनचा वापर केला जाणार आहे.
रत्नागिरी : सलग तीन वर्षांपासून (Kokan Farmer) कोकणातील शेतकऱ्यांना कोणत्या ना कोणत्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे उत्पादनात घट तर होत आहेच शिवाय फळबागाच्या क्षेत्रावरही याचा परिणाम होत आहे. त्यामुळे आता (Untimely Rain) अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, कीडीचा प्रादुर्भाव यावर त्वरीत तोडगा काढण्यासाठी तसेच शेती पिकाचा आराखडा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आता ड्रोनचा वापर केला जाणार आहे. कोकणातील परस्थिती पाहता या अत्याधुनिक पध्दती वापरण्याचा पहिला मान येथील शेतकऱ्यांना मिळणार आहे. जानेवारी महिन्यापासून प्रत्यक्ष शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे या अत्याधुनिक प्रणालीचा काय उपयोग होणार आणि वापरताना काय काळजी घ्यावी लागणार याचे धडे प्रशिक्षणात दिले जाणार आहेत.
वेळेत होणार कीडीचे व्यवस्थापन
ड्रोनच्या माध्यमातून कमी खर्चात आणि कमी वेळेत कीडीवर नियंत्रण मिळवता येणार आहे. खरिपातील पीक पाहणी, कीड-रोगाचा बंदोबस्त तसेच किडीचे व्यवस्थापन सहज होणार आहे. कोकणात फळबागाचे क्षेत्र अधिक आहे. पावसानंतर कोणत्या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे व त्याचे नियंत्रण करायचे कसे हे लागलीच निदर्शनास येणार आहे. त्यामुळे ही अत्याधुनिक प्रणाली हंगामातील पिकांबरोबर फळबागांच्या संरक्षणासाठी महत्वाची ठरणार आहे. यातील सुविधांमुळे कोणत्या पिकावर कोणच्या कीडीचा प्रादुर्भाव झाला आहे हे देखील लक्षात येणार आहे. त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांना ही प्रणाली उपयोगाची ठरणार आहे.
या दोन ठिकाणी होणार प्रशिक्षण
ड्रोनच्या माध्यमातून फवारणी किंवा अन्य काही बाबी करायच्या म्हटल्यावर शेतकऱ्यांना आवश्यकता आहे ती योग्य प्रशिक्षणाची. त्यामुळेच जानेवारी महिन्यात रत्नागिरी तालुक्यातील भाट्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील कृषी केंद्रामध्ये शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण कसे द्यायचे यासाठी शिवाय तंत्राची माहिती देण्यासाठी केंद्राची उपलब्धता असणार आहे. आता शेतीसाठी ड्रोन किती महत्वाचे आहे याची देखील माहिती प्रशिक्षणा दरम्यान देण्यात येणार आहे.
काय आहेत कृषी मंत्रालयाचे निर्देश?
ड्रोनच्या माध्यमातून किटनाशकांवर औषध फवारणी करण्याची मोठी क्षमता आहे. असे असले तरी यामध्ये पिकांचे संगोपन आणि काही दुष्परिणाम होणार नाहीत त्याअनुशंगाने कृषी मंत्रालय हे काळजी घेत आहे. यामध्ये पिक फवारणी क्षेत्र, फ्लाय क्लिअरन्स, वजनाची मर्यादा, नोंदणी, सुरक्षा विमा तसेच हंगामी परस्थितीचा उल्लेख याचा समावेश नियमावली तयार करताना करण्यात आला आहे. एवढेच नाही तर ड्रोन उडवण्यापूर्वी आणि खाली उतरवतानाही काय काळजी घ्यावयची याची नियमावली ठरवून देण्यात आली आहे.