E-Pik Pahani : शिल्लक पीकपेरा नोंदणीचे आता काय होणार?

'ई-पीक पाहणी' च्या माध्यमातून शेतकऱ्यांनी स्वता:च पिकांची नोंद करुन पिकपेऱ्याचा अहवाल शासन दरबारी दाखल केला आहे. यंदाच्या खरीप हंगामात प्रथमच असा उपक्रम राबविण्यात आला होता. यामध्ये राज्यभरातील 58 लाख 39 हजार शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंद या माध्यमातून करुन शासन दरबारी पाठवली आहे.

E-Pik Pahani : शिल्लक पीकपेरा नोंदणीचे आता काय होणार?
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 28, 2021 | 11:15 AM

लातूर : ‘ई-पीक पाहणी’ च्या (E-Crop Inspection) माध्यमातून शेतकऱ्यांनी स्वता:च पिकांची नोंद करुन पिकपेऱ्याचा अहवाल शासन दरबारी दाखल केला आहे. यंदाच्या खरीप हंगामात प्रथमच असा उपक्रम राबविण्यात आला होता. यामध्ये (State Government) राज्यभरातील 58 लाख 39 हजार शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंद या माध्यमातून करुन शासन दरबारी पाठवली आहे. मात्र, ज्या भागातील नोंदी अद्यापही झाल्या नाहीत त्या नोंदी आता तलाठी नोंदविणार आहेत.

राज्य सराकारच्या या महत्वाच्या उपक्रमात मराठवाड्यात अव्वलस्थानी नांदेड जिल्हा राहिला आहे. ई-पीक पाहणीसह इतर पीक विमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभागही नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचाच अधिकचा राहिलेला आहे. सुरवातीच्या काळात पीक नोंदणीसाठी शेतकरी समोर आले नव्हते मात्र, जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी सबंध जिल्ह्यात जनजागृती अभियान राबवून शेतकऱ्यांचा सहभाग करुन घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांना तांत्रिक माहितीही झाली आता हा प्रश्न कायमचा मिटला असून आता ई-पंचनामा यासाठी देखील उपयोग होणार आहे.

आता तलाठ्यांवर जबाबदारी

या मोहिमेदरम्यान ज्या शेतकऱ्यांच्या पिकपेऱ्याची नोंदणी राहिलेली आहे. आता क्षेत्रावरील नोंदणी ही तलाठ्यांमार्फत केली जाणार आहे. एवढेच नाही तर या दरम्यान शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी कशी करायची याचेही मार्गदर्शन दिले जाणार आहे. कारण भविष्यात आता ई-पंचनामा देखील शेतकऱ्यांनाच करावा लागणार आहे. कृषी क्षेत्रात डिजीटल प्रणाली ही वाढत आहे. त्यामुळेच गुजरात सरकारने शेतकऱ्यांना मोबाईल खरेदीसाठी 1 हजार 500 रुपये देऊ केले आहेत.

मराठवाड्यात सर्वाधिक नोंदणी नांदेड जिल्ह्यात

‘ई-पीक पाहणी’ या प्रकल्पामध्ये सुरवातीच्या काळात शेतकऱ्यांचा सहभाग नव्हता. शिवाय अत्याधुनिक तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना माहिती नसल्याने पिकपेरा नोंदणी हा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनीच करावी अशी मागणी केली जात होती. मात्र, स्थानिक प्रशासनाने वेगवेगळे जनजागृती कार्यक्रम राबवून शेतकऱ्यांचा सहभाग वाढविला यामध्ये नांदेड जिल्हा आघाडीवर राहिलेला आहे. जिल्ह्यातील तब्बल 3 लाख 67 हजार 933 शेतकऱ्यांनी पिकांचा पेरा नोंदवलेला आहे. तर त्यापाठोपाठ लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता.

30 सप्टेंबरपर्यंत राबवला उपक्रम

15 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर या कालावधीत ई-पीक पाहणी हा उपक्रम सबंध राज्यात राबविण्यात आला होता. अगदी सुरवातीच्या काळात शेतकऱ्यांना याबद्दल अधिकची माहिती नसल्याने पिकपेरा नोंदणी ह्या कमी प्रमाणात झाल्या होत्या. मात्र, जनजागृती आणि एकाट मोबाईवरुन 20 शेतकऱ्यांच्या नोंदी शक्य असल्याने झपाट्याने पिकपेरा नोंदणीचा आकडा हा वाढला. दीड महिन्याच्या कालावधीत 58 लाख 39 हजार शेतकऱ्यांनी सहभाग घेतल्याने हा उपक्रम यशस्वी झाल्याचे महसूल विभागाचे म्हणने आहे. त्यामुळेच आता ई-पंचनामा देखील शेतकऱ्यांनाच करावा लागणार असल्याचे संकेत महसूल विभागाने दिले आहेत.

संबंधित बातम्या :

कापसाला नव्हे तर बोंडअळीला पोषक वातावरण, शेतकऱ्यांकडे आता एकच पर्याय

यशोगाथा : उसापेक्षा सोयाबीन बिजोत्पदनात अधिकचा गोडवा, कंधारच्या शेतकऱ्याने करुन दाखविले

भारत देशातील गहू स्वस्त अन् मस्तही, जागतिक बाजारपेठेतही घेतली जातेय दखल

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.