Solapur : आता सार्वजनिक जागांवरही फळबाग लागवडीचे उद्दीष्ट, सोलापूर जिल्हा परिषदेचा काय आहे उपक्रम?

केवळ शेतकऱ्यांनीच फळबागेतून उत्पन्न घ्यावे असे नाही तर सार्वजनिक ठिकाणी जिथे जागा उपलब्ध आहे त्या क्षेत्रात फळबाग लागवड केली जाणार आहे. यामध्ये गायरान, गावठाण, शासकिय, निमशासकीय जमिन, सामूहिक जमिन, शैक्षणिक संस्थांची जमिनावर हा उपक्रम राबवला जाणार आहे. याबाबत स्थानिक पातळीवर सूचना देण्यात आल्या असून आता लागवड झाली तर पुढे पावसाळ्यात ही फळझाडे टिकून राहणार आहेत.

Solapur : आता सार्वजनिक जागांवरही फळबाग लागवडीचे उद्दीष्ट, सोलापूर जिल्हा परिषदेचा काय आहे उपक्रम?
Follow us
| Updated on: May 04, 2022 | 9:37 AM

सोलापूर : उत्पादन वाढीसाठी केवळ शेतकरीच प्रयत्नशील आहेत असे नाही तर (Government) शासकिय स्तरावरही वेगवेगळे उपक्रम राबवून उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न केले जातात. सोलापूर (Solapur Zilha Parshad) जिल्हा परिषद व पंचायत समितीला 60 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सार्वजनिक जागांवर फळबाग लागवड करण्याची मोहिमच जिल्हा परिषदेने हाती घेतली आहे. यामुळे आर्थिक उत्पन्न तर वाढणार आहे पण (Orchard) फळरोपांच्या लागवडीने परिसर हा वृक्षाच्छादित होणार आहे. यासाठी ग्रामपंचायतींचा सहभाग महत्वाचा आहे. फळबागामुळे उत्पादनात तर वाढ होणार आहेच शिवाय वृक्षलागवडीचे उद्दीष्टही साध्य होणार आहे. 1 मे पासून या उपक्रमाला सुरवात करण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले आहे.

या भागात होणार फळबाग लागवड

केवळ शेतकऱ्यांनीच फळबागेतून उत्पन्न घ्यावे असे नाही तर सार्वजनिक ठिकाणी जिथे जागा उपलब्ध आहे त्या क्षेत्रात फळबाग लागवड केली जाणार आहे. यामध्ये गायरान, गावठाण, शासकिय, निमशासकीय जमिन, सामूहिक जमिन, शैक्षणिक संस्थांची जमिनावर हा उपक्रम राबवला जाणार आहे. याबाबत स्थानिक पातळीवर सूचना देण्यात आल्या असून आता लागवड झाली तर पुढे पावसाळ्यात ही फळझाडे टिकून राहणार आहेत. एवढेच नाही तर वैयक्तिक पातळीवर आणि शेती बांधावरही फळबाग लागवडीच्या सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

स्थानिक प्रजातींना प्राधान्य

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत माथा ते पायथा या अंतर्गत हा उपक्रम राबवला जात आहे. यामध्ये स्थानिक पातळीवर ज्या फळांसाठी पोषक वातावरण आहे त्याच फळांची लागवड केली जाणार आहे. यामध्ये चिंच, आवळा, बोर, डाळिंब याची लागवड केली जाणार आहे. संवर्धनाच्या अनुशंगाने तालुका निहाय अंमलबजावणीचा अहवाल हा सादर करावा लागणार आहे. यामध्ये हलगर्जीपणा चालणार नसल्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

ग्रामपंचायती बनवणार अंदाजपत्रक

शिवारात गायरान कीती ? किती क्षेत्रावर फळबागेची लागवड होऊ शकते या अनुशंगाने अंजाजपत्रक तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये स्थळ निश्चिती करुन त्या क्षेत्रावर कोणते फळरोपाची लागवड करायची यासंदर्भातील अहवाल हा सादर करावा लागणार आहे. त्यामुळे उत्पादनात तर वाढ होणारच आहे पण वृक्ष वाढणार हे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाचे आहे.

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.