काय सांगता ? शेतीकामासाठी नाईट शिफ्ट अन् मजूरांना ओव्हरटाईमही देऊन, कशामुळे आली ही वेळ?
कांदा पीक दराच्या बाबतीत जसे लहरीपणाचे आहे अगदी त्याप्रमाणेच त्याची जोपासनाही. नाशिक जिल्ह्यात तर हे पीक उत्पान्नाच्या दृष्टीने हुकमीच मानले जाते. आता कांदा लागवडीचा जोर वाढलेला आहे. त्यामुळे मजूरांची टंचाई भासत आहे. शिवाय कांदा लागवड वेळेत होण्यासाठी शेतकरी प्रयत्न करीत आहेत. यासाठी रात्रीचा दिवस करण्याची शेतकऱ्यांची तयारी असून प्रत्यक्षात तसे केले जात आहे.
नाशिक : कांदा पीक दराच्या बाबतीत जसे लहरीपणाचे आहे अगदी त्याप्रमाणेच त्याची जोपासनाही. नाशिक जिल्ह्यात तर हे पीक उत्पान्नाच्या दृष्टीने हुकमीच मानले जाते. आता कांदा लागवडीचा जोर वाढलेला आहे. त्यामुळे मजूरांची टंचाई भासत आहे. शिवाय (Onion cultivation) कांदा लागवड वेळेत होण्यासाठी (Farmer) शेतकरी प्रयत्न करीत आहेत. यासाठी रात्रीचा दिवस करण्याची शेतकऱ्यांची तयारी असून प्रत्यक्षात तसे केले जात आहे. (Nashik) जिल्ह्यातील कसमादेना परिसरात मजुरांनी इतरत्र जाऊ नये म्हणून रात्रीतून कांदा लागवड केली जात आहे. एवढेच नाही तर याकरिता त्यांना अधिकचे पैसेही दिले जात आहे. सध्या लागवड करताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात तर कांद्याने पाणी आणले आहे पण वाढत्या क्षेत्रामुळे दराचे काय होणार हे पहावे लागणार आहे.
कांदा लागवडीस अशी आहे मजुरी
यंदा मजुरीचे दरही पूर्वीच्या तुलनेत वाढल्याने उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. एका मजुराचा दिवसाचा दर हा पूर्वी १५० ते २०० रुपयांपर्यंत होता. आता मात्र महिला व पुरुष मजुराला जवळपास सारखेच दर झाले असून, २५० ते ३०० रुपयांपर्यंत दर द्यावा लागत आहे. असे असताना आता रात्र पाळीस येणाऱ्या मजुरांना यापेक्षा अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. एकीकडे खतांचे, बियाण्यांचे, कीटकनाशकांचे भाव वाढल्याने शेतीच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यात मजुरांचाही खर्च वाढल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. मोठ्या कष्टाने पिकविलेल्या शेती मालाला चांगला भाव मिळेल याचीही शाश्वतीही राहिलेली नाही.
शेतकऱ्यांना बुरे मजुरांना अच्छे दिन
रब्बी हंगामातील कांदा लागवडीचे काम सध्या सर्वत्रच जोमात सुरु आहे. पण नाशिक जिल्ह्यात यंदा पोषक वातावरणामुळे क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे वेळेत लागवड व्हावी यासाठी शेतकरी प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहे तर दुसरीकडे अधिकची मजुरी आणि सर्व सोयी सुविधा ह्या मजुरांना पुरवाव्या लागत आहेत. मजुरांनी नियमित लागवडीसाठी यावे म्हणून दिवसरात्र केवळ मजुरांचीच सेवा करावी लागत आहे. त्यामुळे लागवडीच्या दरम्यान तर शेतकऱ्यांना बुरे आणि मजुरांना अच्छे दिन अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
वाढत्या मजुरीमुळे छोट्या शेतकऱ्यांची अडचण
शेतमजुरांची टंचाई आणि मजुरीत झालेली वाढ हा तर कायमचाच प्रश्न आहे. मजुरांच्या आठ-आठ दिवस केलेल्या प्रतीक्षेमुळे शेताची कामे वेळेत होत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे रात्रीच्या वेळी शेतीची कामे करावी लागत आहेत. पुढील काळात शेतीला आधुनिक अवजारे व यांत्रिकीकरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता, शेतकऱ्यांना इतर पिकांचा पर्याय शोधावा लागेल. यामध्ये मात्र, छोट्या शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे.