भारतीय कांद्याला पाकिस्तानची टक्कर, आयात निर्यात धोरण नसल्याचा शेतकरी व्यापाऱ्यांना फटका, अमेरिकेसह जपानही भारताच्या विरोधात

भारत सरकारनं कांदा निर्यातीवर बंदी आणल्यानंतर अमेरिका आणि जपाननं आपल्याविरोधात भूमिका घेत जागतिक व्यापार संघटनेत तक्रार केली आहे. दोन्ही देशांनी कांदा निर्यातीवर कोणतीही पूर्वसूचना न देता बंदी आणल्यामुळे आयात करणाऱ्या देशांसाठी समस्या निर्माण होत असल्याचा आरोप केला आहे.

भारतीय कांद्याला पाकिस्तानची टक्कर, आयात निर्यात धोरण नसल्याचा शेतकरी व्यापाऱ्यांना फटका, अमेरिकेसह जपानही भारताच्या विरोधात
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Jul 10, 2021 | 10:45 AM

नवी दिल्ली: भारत सरकारनं कांदा निर्यातीवर बंदी आणल्यानंतर अमेरिका आणि जपाननं आपल्याविरोधात भूमिका घेत जागतिक व्यापार संघटनेत तक्रार केली आहे. दोन्ही देशांनी कांदा निर्यातीवर कोणतीही पूर्वसूचना न देता बंदी आणल्यामुळे आयात करणाऱ्या देशांसाठी समस्या निर्माण होत असल्याचा आरोप केला आहे. परिणामी महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र सरकारनं अशा प्रकारचे निर्णय घेण्यापूर्वी कांदा आयात आणि निर्यातीसंदर्भात व्यापक धोरण बनवण्याची मागणी केली आहे. तर, दुसरीकडे पाकिस्तान आखाती देशांमध्ये भारतीय कांद्याला टक्कर देण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आखाती देशात पाकिस्तान कांदा विक्री वाढवत आहे. ( Onion latest news America and Japan went to WTO on onion export ban of India and Pakistan also expand onion trade in gulf countries )

निर्यात धोरणाची गरज

महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघाचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी बिझनेस लाईनशी बोलातना भारत कांद्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा उत्पदाक देश आहे. मात्र, आपल्या देशाकडं कांद्याच्या निर्याती आणि आयातीविषयी ठोस धोरण नाही. कांदा निर्यातीवर केंद्र सरकार बंदी घालत त्यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावं लागतं. आता जागतिक व्यापार संघटनेत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं ठोस निर्यात आणि आयात धोरण तयार करण्याची गरज असल्याचं भारत दिघोळे यांनी म्हटलं आहे.

परकीय चलन मिळवण्याचं महत्त्वाचं साधन

कांद्याची निर्यात केंद्र सरकारला परकीय चलन मिळवून देण्यासाठीचं एक महत्वाचं माध्यम आहे. केंद्र सरकारनं कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी यांना आंतरराष्ट्रीय बाजारात भारताची पकड कायम ठेवण्यासाठी मदत करण्याची गरज आहे. दिघोळे यांनी अमेरिका आणि जपान यांनी उपस्थित केलेला मुद्दा योग्य असल्याचं म्हटलं आहे. भारतानं कांदा निर्यातीसाठी एक कोटा निश्चित करावा जेणेकरून कांदा आणि लसूण याची निर्यात करण्यासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये स्पष्टता येईल, असं दिघोळे म्हणाले.

कोरोना संसर्ग आणि कांदा निर्यातीवरील 4 महिन्यांची बंदी यामुळे कांद्याची निर्यातीमध्ये घट झाली आहे. भारताची कांदा निर्यात एकूण 9 टक्के कमी झाली आहे. 2020-21 मध्ये भारताची कांदा निर्यात 2107 कोटी रुपयांची झाली.

भारताला पाकिस्तानचं आव्हान

लासलगांवातील व्यापारी नितीन जैन यांनी देशासाठी कांदा निर्यात धोरण शेतकरी आणि व्यापारी यांना दिलासादायक ठरेल.सध्या आयात आणि निर्यातीसंदर्भात धोरण नसल्यामुळे शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना फटका बसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कांदा लोकप्रिय असून त्याला पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या काही वर्षांपासून आखाती देशात भारतीय कांद्याची जागा पाकिस्ताननं घ्यायला सुरुवात केली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. यंदा मार्च महिन्यात झालेल्या जागतिक व्यापार संघटनेच्या बैठकीत सदस्य देशातील प्रतिनिधींनी डाळींची आयात, गहू बांडार, कमी काळासाठीचं पीक कर्ज, दूध भूकटी निर्यातीसाठी अनुदान, कांदा निर्यातीवरील बंदी यासंदर्भात भारताविषयी प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

इतर बातम्या

ठरलं, गोकुळकडून दूध खरेदी दरवाढ जाहीर, दूध विक्री दरात 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय

ईडीकडून जरंडेश्वर कारखाना सील, 22 हजार हेक्टरवरील ऊसाचं काय करायचं? शेतकऱ्यांचा मोर्चा

(Onion latest news America and Japan went to WTO on onion export ban of India and Pakistan also expand onion trade in gulf countries)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.