कांदा आणखी रडवणार? आवक घटल्यानं कांद्याचे भाव वधारले 

सद्यस्थितीला बाजारात जुने कांदे एका रुपया ते २० रूपये प्रती किलोने खपले जात आहेत. बाजारात कांद्याची आवक घटल्याने भाववाढीत ही तेजी आहे. पुढील एक दीड महिन्यात भाव कमी होतील, असे मतही व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे. 

कांदा आणखी रडवणार? आवक घटल्यानं कांद्याचे भाव वधारले 
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 12, 2021 | 12:13 PM

पुणे – गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दारात वाढ होत आहे. राज्यातील कांद्यासाठी महत्त्वाची बाजारपेठ मानल्या जाणाऱ्या चाकण बाजार पेठेत कांद्याचा भाव वधारला आहे. बाजारात कांद्याची आवक कमी झाल्यानं चाकण घाऊक बाजारात कांद्याला प्रति क्विंटल 2 हजार ते 3 हजार 200 रुपये एवढा भाव मिळाला आहे. तर किरकोळ विक्रीत कांदा 32 रुपये किलो दराने विकला जात आहे. त्यामुळे कांद्याचे हे दर  सर्व सामान्यांच्या डोळयात पाणी आणणार आहेत.

राज्यात ठिकठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळं कांद्याच्या लागवडी वाया गेल्या आहेत. अनेक ठिकाणी पावसाळ्यात साठवणूक करून ठेवललेले कांदे बाजारात आणले. पण त्याचवेळी नवीन कांदाही बाजारात आल्यानं जुन्या की कांद्याचा खप कमी होऊन नवीन कांद्याचा खप वाढला. सद्यस्थितीला बाजारात कांद्याचे भाव प्रति क्विंटल 4 हजार 500 रुपये इतका झाला आहे. तर गेल्याकाही महिन्यांपासून साठवण केलेल्या जुन्या कांद्याचे भाव घसरले असून कांद्याही खराब होऊ लागल्याचे दिसून आले आहे.

कांदा पावसात भिजल्यामुळं सकाळी खरेदी केलेलया ५० किलोच्या कांद्याच्या पिशवीतून २० किलोही चांगला कांदा मिळत नाही. साहजिक रिटेल बाजारात कांदा दुप्पट किंमतीने विकला जातो.सद्यस्थितीला बाजारात जुने कांदे एका रुपया ते २० रूपये प्रती किलोने खपले जात आहेत. बाजारात कांद्याची आवक घटल्याने भाववाढीत ही तेजी आहे. पुढील एक दीड महिन्यात भाव कमी होतील, असे मतही व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

भाव नसल्यानं कांदावर फिरवला रोटाव्हीटर दुसरीकडं धुळ्यातील साक्री तालुक्यातील आमखेल गावात सुभाष नांद्रे या शेतकऱ्याने 1 एकर पावसाळी कांदा लावला होता. पण मार्केटमध्ये पावसाळी कांद्याला भावच नाही त्या अनुषंगाने शेतात उभ्या असलेल्या कांद्यावर त्यांनी रोटाव्हीटर फिरवलयाची घटना समोर आली आहे.

मार्केटमध्ये कांदा न्यायचा जाला तर त्याला काढणी आणि वाहतुकीचा खर्च हा येत असतो. पण, गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच मार्केटमध्ये पावसाळी कांद्याचा लिलाव होत नव्हता. आता लिलाव होतो, पण आलेला व्यापारी हा 2 ते 6 रुपये किलो या दराने कांदा मागतो. मग त्यात काढणी आणि वाहतुकीचा देखील खर्च निघत नाही, अशी भावना शेतकऱ्यांने व्यक्त केली आहे.

हे ही वाचा: 

अतोनात खर्च करुन कांदा पिकवला, पण कवडीचाही भाव नाही, धुळ्यात उभ्या कांद्यावर शेतकऱ्याने रोटाव्हीटर फिरवला

लगता है मोहतरमा मलाणा क्रिम लेकर ज्यादा बोल रही है, कंगनाचा पद्मश्री काढून घ्या; नवाब मलिक आक्रमक

औरंगाबादः अजिंठा लेणीत खासगी वाहनांना परवानगी, एसटी बससेवा संपामुळे ठप्पच, आतापर्यंत 30 कर्मचारी निलंबित

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.