कांद्यांनं पन्नाशी ओलांडली, सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार?

कांदा 50 ते 60 रुपये किलो रुपयांनी विकला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना कांदा रडवणार असल्याचं दिसतंय. Onion rates hike

कांद्यांनं पन्नाशी ओलांडली, सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार?
Onion Rate cheaper
Follow us
| Updated on: Feb 11, 2021 | 12:59 PM

नवी मुंबई: राज्यातील प्रमुख बाजार समिती म्हणून नवी मुंबई बाजार समितीची ओळख आहे. नवी मुंबई बाजारसमितीच्या कांदा बटाटा मार्केटमध्ये 23400 गोणी कांद्यांची आवक झालीय. सध्या कांद्याचे दर वाढत असून मागील आठवड्यापेक्षा कांद्याचे दरात 10 रुपयांनी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात कांदा चाळीस रुपये प्रति किलो आहे. तर, किरकोळ बाजारावर नियंत्रण नसल्याने कांदा 50 ते 60 रुपये किलो रुपयांनी विकला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना कांदा रडवणार असल्याचं दिसतंय. (Onion rates hike in Maharashtra APMC Markets)

अवकाळी अतिवृष्टीमुळे पुणे आणि नाशिक परिसरातील कांदा शेतकरी चिंतेत

राज्यातील नाशिक आणि पुणे या दोन जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादन घेतलं जातं. पण, सप्टेंबर आक्टोंबर महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळं शेतीचं मोठं नुकसान झालं. पुणे आणि नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तर, या परिसरात थंडी वाढल्याने कांदा पिके चांगली असल्याचे सांगण्यात येत आहे.

किरकोळ बाजारात कांदा पन्नाशीच्या वर

नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा बटाटा मार्केट मध्ये जवळपास 23400 गोणी कांद्याची आवक झाली आहे. तर मागील आठवड्यापेक्षा कांद्याच्या दरात 10 रुपयांची वाढ झाली आहे. घाऊक बाजारात कांदा 40 रुपये प्रति किलोने विकला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळतोय. तर, किरकोळ बाजारावर नियंत्रण नसल्याने कांदा 50 ते 60 रुपये दराने विकला जात आहे.

नवीन कांदा पूर्ण क्षमतेने सुरु होई पर्यंत कांद्याचे दर चढेच राहणार

नवीन कांदा बाजारात येण्यास सुरुवात झाली असून पूर्ण क्षमतेने कांदा सुरु होईपर्यंत कांद्याचे दर चढे राहणार आहेत. कांदा व्यापारी सुरेश शिंदे यांनी ही माहिती दिली.

राज्यभर कांद्याची आवक घसरली

अवकाळी पावसाचा फटका कांदा उत्पादनाला बसला असून राज्यभर कांद्याची आवक घसरू लागली आहे. मुंबईतही आवक कमी होत असून दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई बाजार समितीमध्ये कांदा 38 ते 42 रुपये किलो दराने विकला जात असून किरकोळ मार्केटमध्ये कांद्याने पन्नाशी ओलांडली आहे. राज्यात वर्षभरापासून कांदा दरामध्ये वारंवार चढउतार होऊ लागले आहेत. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. यामुळे मागणीच्या तुलनेत आवक कमी होऊ लागली आहे. राज्यात बहुतांश सर्वच बाजारपेठांमध्ये आवक कमी होत आहे.

संबंधित बातम्या:

वांगी आणि टोमॅटो एकाच झाडाला लागलेलं पाहिलंय का? अजब संशोधनाची सर्वत्र चर्चा

अकोल्याच्या शेतकऱ्याची काळ्या गव्हाची लागवड, बाजारपेठेत जास्त भाव, चांगल्या उत्पन्नाची आशा

(Onion rates hike in Maharashtra APMC markets)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.