कांदा बिजोत्पातदन पध्दती, उत्पादन वाढविण्यासाठी महत्वाची प्रक्रिया

रब्बी किंवा खरीप हंगामात एकदा का होईना कांद्याला प्रमाणात जरी दर मिळाला तरी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे. सध्या कांद्याचे रोप लागवड आणि बियाणांची पेरणी या दोन्ही पध्दतीने कांद्याचे उत्पादन घेतले जाते. पण यासाठी आवश्यक आहे ती बीजोत्पादन प्रक्रिया. कांदा लागवडीपूर्वीची ही बीजोत्पादन प्रक्रिया नेमकी असते कशी याची माहिती आपण आज घेणार आहोत.

कांदा बिजोत्पातदन पध्दती, उत्पादन वाढविण्यासाठी महत्वाची प्रक्रिया
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 19, 2021 | 7:49 PM

लातूर : कांदा हे नगदी पिक आहे. मात्र, दराच्या बाबतीत तेवढेच बेभरवश्याचे. असे असले तरी काळाच्या ओघाच कांदा क्षेत्रामध्ये वाढ होत आहे. कारण रब्बी किंवा खरीप हंगामात एकदा का होईना कांद्याला प्रमाणात जरी दर मिळाला तरी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे. सध्या कांद्याचे रोप लागवड आणि बियाणांची पेरणी या दोन्ही पध्दतीने कांद्याचे उत्पादन घेतले जाते. पण यासाठी आवश्यक आहे ती बीजोत्पादन प्रक्रिया. कांदा लागवडीपूर्वीची ही बिजोत्पादन प्रक्रिया नेमकी असते कशी याची माहिती आपण आज घेणार आहोत.

जर योग्य पध्दतीने बीजोत्पादन न करता लागवड करण्यात आली तर आकार, रंग आणि कांदा तयार होण्याचा काळ यात एकसारखेपणा राहत नाही. परिणामी जोड कांदे व फुटीर कांद्याचे प्रमाण वाढते. त्यामुळेच बीजोत्पादन प्रक्रिया ही महत्वाची आहे.

बिजोत्पादनाच्या दोन पद्धती

* रोपे लावून कांदे न काढता तसेच शेतात ठेऊन त्यांना फुले येऊ दिली जातात. या पद्धतीमध्ये खर्च कमी होतो, परंतु उत्पादनही कमी येते. कांदा जमिनीतून काढला जात नाही, त्यामुळे त्याची योग्य निवड करता येत नाही. त्यामुळे दर्जाहीन कांद्याचे प्रमाण वाढत जाते त्याचबरोबर रोगाचे व तणांचे प्रमाण वाढते. या पद्धतीमध्ये केवळ खरीप जातीचेच बी तयार करता येऊ शकते. अनेक अडचणी व त्रुटीमुळे ही पद्धत फारशी वापरली जात नाही.

* तर दुसऱ्या या पद्धतीत एका हंगामातील कांदा काढून तो साठवून, निवड करून दुसऱ्या हंगामात लावून बीजोत्पादन केले जाते. या पद्धतीमध्ये बियांचे उत्पादन जास्त येते, कांद्याची निवड करता येते. निवड केलेले कांदे लावल्यामुळे दरवर्षी नवीन पिढी सुधारत जाते. रब्बी हंगामाचे कांदे साठवून ठेवावे लागतात, त्यामुळे साठवण खर्च वाढतो. मात्र वाढीव उत्पादनामुळे हा खर्च नगण्य वाटतो.

हंगामानुसार लागणाऱ्या जातींचे बिजोत्पादन

खरिपातील जातींचे बिजोत्पादन खरिपातील जातींचे कंद ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात तयार होतात. या कांद्याची महिनाभर साठवणूक केल्यानंतर डिसेंबर महिन्यात कांदे बिजोत्पादनासाठी लावले जातात. त्यापासून एप्रिल-मे महिन्यात बी तयार होते. खरीप कांद्याचे कंद उत्पादन व बिजोत्पादन एकाच वर्षात पूर्ण करावे लागते. लागवडीचे वेळापत्रक योग्य प्रकारे पाळले तरच खरीप कांद्याचे बिजोत्पादन चांगले येते. खरीप कांद्याचे बी मे महिन्यात तयार होऊन पॅकिंग करून त्याच महिन्यात विकले जाणे आवश्यक असते. अन्यथा बी पुढच्या खरीप हंगामात विकावे लागते. साठवणीत बियांची उगवण क्षमता कमी होते. शिवाय वर्षभर भांडवल देखील गुंतून राहते ठेवावे लागते.

रब्बी हंगामातील जातींचे बिजोत्पादन

रब्बी हंगामातील जातींची रोपे नोव्हेंबर -डिसेंबर महिन्यात लावली जातात. एप्रिल – मे महिन्यात कांदे काढून वाळवून ते कांदा चाळीत साठवले जातात. ऑक्टोबर महिन्यात चाळीतील कांदे निवडून बिजोत्पादनासाठी वापरले जातात. या प्रक्रियेत कांद्याची साठवण हा गुणधर्म आपोआप प्रत्येक पिढीत जोपासला जातो. कांदे रंगाने व आकारानुसार निवडले जात असल्याने पुढील उत्पादन अधिक चांगली निवडली जाते. कांद्यांना जवळ जवळ 5 ते 6 महिने विश्रांती मिळत असल्यामुळे फुलांचे बी मोठ्या प्रमाणात निघतात.

संबंधित बातम्या :

शेतकरी उत्पादक कंपन्यांचा असा ‘हा’ फायदा, शेतीमालाची विक्री अन् मोबदला एकाच जागी

रिलायन्स विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांविरोधात पहिला गुन्हा परभणीत, बुलढाण्यात काय होणार?

शेती व्यवसयात सौरकृषी पंपाचे महत्व, योग्य नियोजनामुळे उत्पादनातही वाढ

Non Stop LIVE Update
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.