ऑनलाईनची सुविधा ऑफलाईन, शेतकऱ्यांना मदत मिळणार तरी कशी ?
अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या (Farmer) पायाखालची जमिनच सरकलेली आहे. उत्पादनातून नाही किमान आता सरकारी (Government) मदतीतून तरी सावरता येईल असा आशावाद शेतकऱ्यांना आहे. परंतु, नुकसान भरपाईची मदत पदरात पाडून घेण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेली नियमावली पाहता ही मदतही पदरी पडते की नाही अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे.
लातुर : अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या (Farmer) पायाखालची जमिनच सरकलेली आहे. उत्पादनातून नाही किमान आता सरकारी (Government) मदतीतून तरी सावरता येईल असा आशावाद शेतकऱ्यांना आहे. परंतु, नुकसान भरपाईची मदत पदरात पाडून घेण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेली नियमावली पाहता ही मदतही पदरी पडते की नाही अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. पिक नुकसानीची माहिती भरण्यासाठी देण्यात आलेले ‘क्रॅप इंन्शुरन्स’ अॅपच कार्यरत नाही. त्यामुळे नुकसानीची माहिती भरावी कधी आणि भरपाई मिळणार कधी असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत. (Online facility offline, how can farmers get help?)
खरिपातील पिके जोमात असतानाच पावसाने ओढ दिली होती. तेव्हापासूनच खरिपाचे उत्पादन घटणार असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु, गेल्या आठवड्याभरापासून सुरु असलेल्या पावसामुळे उत्पादनात घटच नाही तर संपूर्ण खरिपच आढवा झाला आहे. पिक विमा रक्कम अदा केलेल्या शेतकऱ्यांचे डोळे आता शासनाच्या मदतीकडे लागले आहेत. याकरिता प्रशासनाकडून नियमावली घालून देण्यात आली आहे. पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांनी आता नुकसान झालेल्या पिकांची माहिती ही ‘क्रॅप इंन्शुरन्स’ या अॅपवर भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अॅप बद्दल ग्रामीण भागात जनजागृती करण्यात आलेली नाही. शिवाय ही किचकट प्रक्रिया शेतकऱ्यांना अवगत नाही. अनेक शेतकऱ्यांकडे अत्याधुनिक मोबाईल नसल्याने ही माहिती भरायची कशी असा सवाल उपस्थित होत आहे. (Online facility offline, how can farmers get help?)
मनुष्यबळ नसल्यानेच शेतकऱ्यांचा ‘बळी’
पिक रक्कम कंपनीला जमा झाली की शेतकऱ्यांकडे ना कृषी विभागाचे लक्ष राहते ना विमा कंपनीचे. अतिवृष्टीमुळे सर्रास शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पंचनामे किंवा पिकांची पाहणी करण्यासाठी कंपनीकडे मनुष्यबळ नाही. आता नु्कसानीनंतर हे अॅप वापरणाऱ्यांची संख्या देखील वाढली असावी. त्यामुळे अधिकतर हे अॅप कार्यरत होत नाही. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे तर हे अशा प्रकारचे अॅपच नसल्याने अडचणी वाढत आहेत.
नोंदणी केली तरी अडचणी कायमच
सोयाबीन ऐन बहरात असतानाच उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यात अधिकचा पाऊस झाला होता. शेतजमिन ही चिबडली होती. त्यामुळे सोयाबीन पिक पाण्यात होते त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी ऑनलाईनद्वारे तक्रारी नोंदविल्या होत्या मात्र, ना विमा कंपनीकडून त्याची पाहणी झाली ना कृषी अधिकारी बांधवर फिरकले.
खरिपाचे नुकसान समोर आहे, सरसकट मदत द्यावी
गेल्या आठवडाभरापासून खरिपाचे होत असलेले नुकसान हे सर्वांसमोर आहे. या प्रणालीत योग्य माहिती भरली गेली नाही तर विमा कंपनी ही शेतकऱ्यांनाच दोषी ठरवेल. त्यामुळे सरसकट मंडळानुसार झालेला पाऊस नोंदी घेवून नुकसान भरपाई देण्याची मागणी नेकनूरचे शेतकरी संजय शिंदे यांनी केली आहे. Online facility offline, how can farmers get help?
संबंधित बातम्या :
पाझर तलाव फुटला अन् एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं
रब्बी हंगामासाठी अनुदानावर बियाणं मिळवायचंय, कृषी विभागाचं अर्ज करण्याचं आवाहन