ऑनलाईन की ऑफलाईन ? शेतकरी संभ्रमात, अधिकारी निर्धास्त

नुकसान झाल्याची तक्रार शेतकऱ्यांना नोंदिवणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, ऑनलाईन की ऑफलाईन ही नवी अडचण समोर आली आहे. आतापर्यंत केवळ ऑनलाईन तक्रार नोंदिवण्याचे सांगितले जात होते पण आता ऑफलाईनचाही पर्याय खुला असल्याचे सांगण्यात आल्यने शेतकऱ्यांच्या मनामध्ये गोंधळ झाली आहे.

ऑनलाईन की ऑफलाईन ? शेतकरी संभ्रमात, अधिकारी निर्धास्त
पिक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची बॅंकेसमोर गर्दी (संग्रहीत छायाचित्र)
Follow us
| Updated on: Sep 10, 2021 | 11:52 AM

लातुर : आस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. यातच प्रशासनाची बदलती धोरणं यामुळे शेतकऱ्यांच्या चितेंत भर पडलीय. पावसाने नुकसान होताच वेध लागले आहेत ते नुकसान भरपाईचे. नुकसान झाल्याची तक्रार शेतकऱ्यांना नोंदिवणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, ऑनलाईन की ऑफलाईन ही नवी अडचण समोर आली आहे. आतापर्यंत केवळ ऑनलाईन तक्रार नोंदिवण्याचे सांगितले जात होते पण आता ऑफलाईनचाही पर्याय खुला असल्याचे सांगण्यात आल्यने शेतकऱ्यांच्या मनामध्ये गोंधळ झाली आहे.

दोन दिवसापासून पावसाने उघडीप दिल्यानंतरही शेतकऱ्यांच्या मनातील घालमेल कायम आहे. नुकसानभरपाई मिळवण्यासाठी नेमके काय करावे हे अद्यापही (Farmer Confused) शेतकऱ्यांना उमजलेले नाही. पावसाने खरिपातील सर्वच पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानभरपईसाठी ऑनलाईन तक्रार करण्याचा घाट प्रशासनाने घातला होता. आता पुन्हा या नियमात बदल करुन शेतकऱ्यांना ऑफलाईनही तक्रार नोंदिवता येत असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता तालुक्याच्या ठिकाणच्या विमा कंपनीच्या बाहेर शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे. (Crop Insurance) पिक नुकसानीबद्दलचा अहवाल हा विमा कंपनीकडे सादर करुन पुढील प्रक्रिया होणार आहे.

प्रशासनाच्या निर्णयात बदल

पिकाच्या नुकसानीसंदर्भात ‘क्रॅप इंन्शुरन्स’ या अॅपवर शेतकऱ्यांनी माहिती भरणे आवश्यक आहे. मात्र, ही किचकट प्रक्रिया शेतकऱ्यांना अडचणीची होऊ लागल्याने यामध्ये बदल करण्यात आला आहे. अनेक शेतकऱ्यांकडे अत्याधुनिक मोबाईल नाहीत तर ज्यांच्याकडे आहेत त्यांना सर्व माहिती भरणे अशक्य असल्याने हा निणर्य घेण्यात आला आहे.

तक्रार नोंदविण्यास वाढीव मुदत देण्याची मागणी

नुकसान झाल्यानंतर केवळ 72 तासाच्या आतमध्ये शेतकऱ्यांना तक्रार नोंदवावी लागत आहे. मात्र, सध्याची शेती कामे तसेच स्थानिक पातळीवरील अडचणी लक्षात घेता ही मुदत वाढवून देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

पिक विमा कार्यालयाच्या बाहेर रांगा

नुकसानीनंतर केवळ 72 तासांच्या आतमध्ये शेतकऱ्यांना माहिती भरणे आवश्यक आहे. ‘क्रॅप इंन्शुरन्स’ अॅपची प्रक्रिया ही अवघड असल्याने अनेक शेतकरी पिक विमा कंपनाचे कार्यालय जवळ करीत आहेत. याठिकाणीही शेतकऱ्यांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे.

शेतकऱ्यांची पळापळ, अधिकारी मात्र निर्धास्त

पिक नुकसानीनंतर ऑनलाईन तक्रार नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ऑनलाईनद्वारे तक्रार नोंदीचे प्रमाणही कमी आहे. गुरूवारपासून ऑफलाईनही तक्रार नोंदिवली जात आहे. याकरिता शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या कार्यालयात जावे लागते. परंतु, या कार्यालयात कर्मचारीच हजर नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडत आहे.

कृषी विभागानेच केलेले पंचनामे ग्राह्य धरुण मदत मिळावी

ऑनलाईन तक्रार आणि त्यानंतर पंचनामे करण्यासाठी अधिकारी शेतावर येणार ही सर्व प्रक्रीया वेळखाऊ आहे. शेतकरी अडचणीत असल्याने कृषी विभागाने केलेलच पंचनामे ग्राह्य धरुण मदत देण्याची मागणी शेतकरी अमोल तांदळे यांनी केली आहे. (online-or-offline-kharif-damaged-farmers-are-confused-for-pik-vima-officials-unperturbed)

इतरही बातम्या:

Ganesh Chaturthi 2021 | गणपतीसमोर या मंत्रांचा जप करा, मनातील सर्व मनोकामना होतील पूर्ण

गप्पांच्या ओघात शाहीर शेखने जाहीर केली अंकिता लोखंडेची ‘ती’ खाजगी गोष्ट, ऐकून चाहतेही झाले उत्सुक!

शिवसैनिक मंत्र्यांकडून माजी शिवसैनिक छगन भुजबळ यांची तोंडभरुन स्तुती, म्हणाले, ‘त्यांनी चुकीचं कामच केलं नव्हतं’

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.