अडचणीत असलेल्या खरिपातील पिकांना ‘तरच’ मिळेल नवसंजीवनी..!
दुबार पेरणी, खुंटलेली वाढ, करप्या रोग, ऊंट अळी यासारख्या किडींचा प्रादुर्भाव रोखण्यात शेतकरी मेटाकुटीला आला आहे. यातच आता बुरशीजन्य रोग डोके वर काढत आहे. आता पिक पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाचा सल्ल्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
बीड : पेरणीपासून ते काढणीपर्यंत खरिपावरील Farmer in trouble संकट कायम आहे. अगदी पिक अंतिम टप्प्यात असतानाही संकटाची मालिका ही सुरुच आहे. आता अधिकच्या पावसामुळे खरिपातील पिकांना बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागलाय. दुबार पेरणी, खुंटलेली वाढ, करप्या रोग, ऊंट अळी यासारख्या किडींचा प्रादुर्भाव रोखण्यात शेतकरी मेटाकुटीला आला आहे. यातच आता बुरशीजन्य रोग डोके वर काढत आहे. आता पिक पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाचा सल्ल्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. (Only then will kharif crops be rejuvenated, farmers need to implement) मुसळधार पाऊस आणि गेल्या चार दिवसांपासून यामध्ये असलेले सातत्य यामुळे पिक असलेल्या शेतामध्ये पाणी साचून राहत आहे. त्यामुळे बुरशीजन्य रोगाचा धोका निर्माण झाला आहे. संभाव्य धोका लक्षात घेता आता कृषी विभागाचे अधिकारी हे शेतकऱ्यांना शेतामधून पावसाचे पाणी बाहेर काढण्याचा सल्ला देत आहेत. जेणेकरुन पिकांचे संरक्षण होऊन उत्पादनातून चार पैसे शेतकऱ्यांच्या पदरी पडतील. याकरिता बीड आणि उस्मानाबाद कृषी विभागाकडून जनजागृती केली जात आहे. पावसामुळे वावरात पाणी साचून राहिले आहे. या पाण्याचा निचरा होऊन पोषक वातावरण निर्माण होईल. मराठवाड्यात यंदा सोयाबीनचा अधिकचा पेरा झाला आहे. त्यामुळे जास्तीच्या उत्पादनाची शेतकऱ्यांना अपेक्षा होती परंतू, अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांचे सर्व नियोजन कोडमले आहे. यामधून सावरण्यासाठी कृषी विभागाने सुचविलेल्या उपाययोजनांची अमंलबजावणी करण्याचे अवाहन बीडचे जिल्हा कृषी अधीक्षक बाबासाहेब जेजुरकर यांनी केले आहे. (Only then will kharif crops be rejuvenated, farmers need to implement)
अशी घ्या सोयाबीन या पिकाची काळजी
सोयाबीन हे खरिपातील मुख्य पिक आहे. गतवर्षी यामधून शेतकऱ्यांना हजारोंचा फायदा झाला होता. मात्र, ऐन काढणीच्या प्रसंगी अधिकचा पाऊस झाल्याने सोयाबीनची पाने पिवळी पडू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी बुरशीची लक्षणे आढळून येताच 1) एका बुरूशनाशकाच्या प्रति 10 लीटर पाणी या प्रमाणात मात्रा घेऊन फवारणी करण्यात यावी. शिवाय, टेब्युकोनीझोल 12.5 मिली किंवा टेब्युकोनीझोल व सल्फर 25 ग्रॉम किंवा ईसी 10 मिलीचा वापर करावा.
तुरीचे संरक्षण
तुरीच्या पिकांमध्ये मर रोग आढळून येण्याची संभावना निर्माण झाली आहे. त्यामुळे मरगळलेली रोपं बाहेर फेकूण देणं हाच उत्तम पर्याय आहे. वेळेत ही झाडे बाहेर काढण्यात यश मिळाले तर उत्पादनावर सकारात्मक परिणाम होणार आहे.
कापूस
आशा वातावरणात कापसाचे मूळ कुजनविण्याचा प्रयत्न आळीकडून केला जातो. याकरिता कॅापर आँक्सिक्लोराईड 25 ग्रँम व युरिया 200 ग्रँम त्याच बरोबर पंधरा पोटँश 100 ग्रॅम करीता लिटर पाणी याप्रमाणात देणे आवश्यक आहे.
कांद्याची पात पिवळी पडली तर
जास्त पावसामुळे आणि नत्राच्या कमतरतेमुळे कांद्याच्या पातीची पाने पिवळी पडतात. त्यामुळे 100 ग्रॅम युरिया प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणे आवश्यक आहे.
इतर बातम्या :
पावसाने पाणी पातळीत वाढ मात्र, खरिपातील पिकांसह ऊसाचे नुकसान
(Only then will kharif crops be rejuvenated, farmers need to implement)