Cabbage : केशरी रंगाचा कोबी ; 10 हजाराचा खर्च अन् 80 हजाराचे उत्पादन, उत्पन्न वाढीचा उत्तम मार्ग

कमी खर्चामध्ये अधिकचे उत्पन्न घेण्यासाठी शेतकरी हे सातत्याने वेगवेगळे प्रयोग करीत आहेत. हे प्रयोग सर्वत्रच सुरु असतात पण सध्या बिहारमध्ये चर्चा आहे ती केशरी कोबीची. येथील चपराण जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने ब्रासिका ओलेरेसिया या कंपनीच्या वाणाची लागवड केली आहे. यामध्ये केशरी रंगाची कोबी ही सर्वोत्तम ठरलेली आहे. हा कॅनेडियन वंशाची भाजी आहे.

Cabbage : केशरी रंगाचा कोबी ; 10 हजाराचा खर्च अन् 80 हजाराचे उत्पादन, उत्पन्न वाढीचा उत्तम मार्ग
नारंगी कोबी
Follow us
| Updated on: Jan 25, 2022 | 4:24 PM

मुंबई : कमी खर्चामध्ये अधिकचे (increase in yield) उत्पन्न घेण्यासाठी शेतकरी हे सातत्याने वेगवेगळे प्रयोग करीत आहेत. हे प्रयोग सर्वत्रच सुरु असतात पण सध्या बिहारमध्ये चर्चा आहे ती केशरी कोबीची. येथील चपराण जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने ब्रासिका ओलेरेसिया या कंपनीच्या वाणाची लागवड केली आहे. यामध्ये (Orange cabbage) केशरी रंगाची कोबी ही सर्वोत्तम ठरलेली आहे. हा कॅनेडियन वंशाची भाजी आहे. ज्यामध्ये पोषणतत्वे चांगली असल्याने याला अधिकचा दरही मिळत आहे. माध्यमांच्या अहवालानुसार येथील चपरणा जिल्ह्यातील शेतकरी नवनवीन प्रयोग राबवून उत्पादनात वाढ तर करीत आहेतच पण परदेशातील भाज्यांची लागवड करुन आपले वेगळेपण सिध्द करीत आहेत. येथील अधिकत्तर शेतकरी सध्या (Canada) कॅनडातील कोबीची चव चाखत आहेत. देशातील अनेक शेतकरी हे आधुनिक पध्दतीने विदेशी पालेभाज्यांची लागवड करुन कितीतरी अधिक पटीने नफा कमावत आहे. त्यापैकीच हा केशरी कोबी असून लागवड आणि जोपासण्यावर 10 हजार खर्च केले तर त्यामधून 80 हजार रुपये हे पदरी पडणार आहेत. अशा पध्दतीने उत्पादन घेण्यास सुरवातही झाली आहे.

केशरी कोबीतून उत्पादकता अधिक

शेती व्यवसयामध्ये केवळ पारंपरिक शेतीलाच महत्व नाही तर काळाच्या ओघात बदलही गरजेचे आहेत. बिहारमधील समूता गावात राहणारे आनंद हे पहिल्यापासूनच आधुनिक शेतीचा प्रयोग करीत आहेत. यावेळी संत्रा कोबी, बागणी कोबी आणि स्ट्रॉबेरीची लागवड करून ते पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहेत. मखाना आणि मत्स्यव्यवसायातून त्यांना वर्षाकाठी लाखो रुपये उत्पन्न मिळत आहे. आनंद सिंग हे कॅनडाच्या केशरी रंगाच्या कोबीच्या जातीची लागवड करीत आहेत. जगातील विविध देशांमध्ये वेगवेगळ्या नावांनी तो ओळखला जातो. शिवाय उत्पादनावर केलेल्या खर्चाच्या तुलनेत 7 ते 8 पटीने उत्पन्न मिळते असल्याचे त्यांचे म्हणने आहे.

खर्च 10 हजाराचा अन् उत्पादन 80 हजाराचे

स्थानिक बाजारात केशरी आणि जांभळ्या कोबीचा भाव 50 ते 60 रुपये किलो असून स्टेफ्री 260 रुपये किलो आहे असे शेतकऱ्याने सांगितले आहे. एक एकरात लागवड केल्यास 10 ते 12000 रुपये खर्च येतो तर उत्पन्न 70 ते 80 हजार रुपये मिळत असल्याचे शेतकऱ्याचे म्हणने आहे. शिवाय त्यांनी अशा पध्दतीच्या कोबी लागवडीची माहिती ही फेसबूक पेजवर मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आनंद यांनी ऑनलाइनद्वारे बियाणे मागवून शेतात केशरी कोबीची लागवड केली.

काय आहे कृषी तज्ञांचा सल्ला?

केंद्रीय विद्यापीठातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ. एस. के. सिंह सांगतात की, केशरी कोबी ही मूळ जात ही कॅनडाची आहे. या जातीची अनेक वैशिष्ट्ये आहेत. यात ‘अ’ जीवनसत्व असते. यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते तर व्हिटॅमिन सी देखील यामध्ये मुबलकप्रमाणात असते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि व्हिटॅमिन सी देखील मुबलक प्रमाणात असते. यापूर्वी ब्रिटन आणि फ्रान्समध्ये याचे उत्पादन होत असे. यात सर्व प्रकारची जीवनसत्वे असतात.

संबंधित बातम्या :

Budget 2022 : कृषी क्षेत्राच्या नजरेतून अर्थसंकल्प ; सरकारच्या भूमिकेवरच सर्वकाही अवलंबून..!

सोयाबीनच्या दराचा परिणाम आवकवर, शेतकऱ्यांचा निर्णय फायद्याचा का नुकसानीचा?

Budget 2022 : नैसर्गिक आणि जैविक शेतीसंदर्भात अर्थसंकल्पात मोठ्या घोषणेची शक्यता, नरेंद्र मोदींचेही केमिकल फ्री शेतीचं आवाहन

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.