Governor of Maharashtra : सेंद्रीय शेतीतूनच शेतकऱ्यांची समृध्दी, आत्मनिर्भतेसाठी राज्यपालांचा शेतकऱ्यांना सल्ला
केंद्र सरकारच्या पुढाकारातून का होईना आता सेंद्रीय शेती क्षेत्रात वाढ होत आहे. उत्पादन क्षेत्रात वाढ झाली तरी त्याला योग्य बाजारपेठ मिळणे गरजेचे आहे.त्याच अनुशंगाने इस्कॉन 'हरी बोल'उपक्रम सुरु करण्यात यावा असा आशावाद राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केला आहे. सेंद्रीय शेती ही नैसर्गिक शेती आहे. त्यामध्ये रासायनिक खतांचा वापर केला जात नाही.
मुंबई : शेती व्यवसयात पुन्हा (Organic Farm) सेंद्रीय शेती पध्दत रुजणे महत्वाचे झाले आहे. (Central Government) केंद्र सरकार याकरिता पुढाकार घेत असून आता लहान-मोठ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सेंद्रीय शेतीबाबत जनजागृती केली जात आहे. सेंद्रीय शेतीचा अवलंब केला तरच राज्यातील शेतकरी समृध्द होईल शिवाय हाच आत्मनिर्भरतेचा सर्वोत्तम पर्याय असल्याचे प्रतिपादन (Governor) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. सेंद्रीय शेती ही जमिनीच्या आरोग्यासाठी चांगली आहे शिवाय शेतीतील उत्पादने मनुष्याच्या आरोग्यासाठी चांगली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे आता दिल्लीपासून गल्लीपर्यंत सेंद्रीय शेतीचे महत्व पटवून देऊन या पध्दतीने शेती क्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न राहणार आहे.
सेंद्रीय उत्पादकांना बाजारपेठ मिळणार
केंद्र सरकारच्या पुढाकारातून का होईना आता सेंद्रीय शेती क्षेत्रात वाढ होत आहे. उत्पादन क्षेत्रात वाढ झाली तरी त्याला योग्य बाजारपेठ मिळणे गरजेचे आहे.त्याच अनुशंगाने इस्कॉन ‘हरी बोल’उपक्रम सुरु करण्यात यावा असा आशावाद राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केला आहे. सेंद्रीय शेती ही नैसर्गिक शेती आहे. त्यामध्ये रासायनिक खतांचा वापर केला जात नाही. त्यामुळे नागरिकांना दर्जात्मक अन्नधान्य मिळणार आहे. अन्नधान्याच्या बाबतीत भारत देश हा स्वंयपूर्ण झालाच आहे पण आता आरोग्याच्या अनुशंगाने चांगल्या अन्नधान्यासाठी गरज आहे सेंद्रीय शेतीची.
सेंद्रीय उत्पादनामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना
जुहू येथील इस्कॉन सभागृहात राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीमध्ये ‘सेंद्रिय उत्पादनांच्या माध्यमातून शाश्वत शेतीला तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना’या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला चांगला दर मिळणार आहे. शेतकरी उत्पादन तर वाढवेल पण आवश्यक असलेली बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
राज्यपालांच्या हस्ते इस्कॉन मंदिरात आरती
सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होण्यास मदत होईल, जैव विविधता टिकेल तसेच मृदा आरोग्य चांगले राहील असे सांगून नागरिकांनी सेंद्रिय शेतीतील अन्नधान्य, दुग्ध उत्पादने, मध आदी जिन्नस खरेदी करून शेतकऱ्यांना मदत करावी असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले. तर इस्कॉन मंदिराला भेट देऊन रासबिहारी भगवान यांची आरती केली. यावेळी इस्कॉनचे अध्यक्ष गोपाल कृष्ण गोस्वामी महाराज, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे व्यवस्थापकीय संचालक आशिष चौहान, मायापुर येथील इस्कॉन मंदिराचे विश्वस्त ब्रज विलास दास प्रभू, गौरांग दास, याचनीत पुष्करणा, टी सी उपरेती, गोपाळ उपरेती आदी उपस्थित होते.