Organic Farming: सेंद्रीय पध्दतीने पिकवलेला टोमॅटो 400 रुपये किलो अन् वर्षभर उत्पादन

तुम्ही कधी 400 रुपये किलोचे टोमॅटो खाल्ले आहेत का? किंवा चेरी आणि द्राक्षांसारख्या चवीचे टोमॅटो चाखले आहेत का? हो हे शक्य आहे पण ते सेंद्रीय शेतीमधून. नैसर्गिक शेतीमधूनच हे शक्य असून आता ही पध्दत वाढत आहे. मध्य प्रदेशातील जबलपूर (मध्य प्रदेश) येथील एका पॉलिहाऊसमध्ये बारा महिन्यांसाठी 400 रुपये किलोला विकले जाणारे टोमॅटो तयार होतात, त्यालापरदेशातही मोठी मागणी आहे.

Organic Farming: सेंद्रीय पध्दतीने पिकवलेला टोमॅटो 400 रुपये किलो अन् वर्षभर उत्पादन
चेरी टोमॅटो
Follow us
| Updated on: Jan 17, 2022 | 7:30 AM

मुंबई : बदलत्या शेती पध्दतीमुळे उत्पादनात आणि उत्पन्नातही खूप मोठा बदल होत आहे. एकीकडे (The Vagaries of Nature) निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे तर दुसरीकडे योग्य नियोजनाने शेती केली जात आहे. अशाच नियोजनबध्द (Farming) शेतीचे उदाहरण आपण पाहणार आहोत. तुम्ही कधी 400 रुपये किलोचे (Tomato) टोमॅटो खाल्ले आहेत का? किंवा चेरी आणि द्राक्षांसारख्या चवीचे टोमॅटो चाखले आहेत का? हो हे शक्य आहे पण ते सेंद्रीय शेतीमधून. नैसर्गिक शेतीमधूनच हे शक्य असून आता ही पध्दत वाढत आहे. मध्य प्रदेशातील जबलपूर मध्य प्रदेशयेथील एका पॉलिहाऊसमध्ये बारा महिन्यांसाठी 400 रुपये किलोला विकले जाणारे टोमॅटो तयार होतात, त्यालापरदेशातही मोठी मागणी आहे. हे टोमॅटो पाहिले तर तुम्हाला विश्वास बसणार नाही चेरीसारख्या दिसणाऱ्या या टोमॅटोची किंमत सुमारे 400 रुपये किलो आहे. यामध्ये आणखीन एक समाधानाची बाब म्हणजे वर्षभर या टोमॅटोचे उत्पादन हे सुरुच असते.

अधिकचा दर अन् वर्षभर उत्पन्न

जबलपूरमध्ये अंबिका पटेल नावाच्या शेतकऱ्याने टोमॅटोचे नवे वाण विकसीत केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते मध्य प्रदेशातील अनेक शहरांनाही पुरवठा करत आहेत. केवळ आहे म्हणून वाणाचा पुरवठा नाही तर यासाठी त्यांनी अनेक दिवल परीश्रम घेऊन वाण सुधारले आहे. त्यापैकीच हा चेरीसारखा दिसणारा छोटा टोमॅटो सर्वात उपयुक्त असल्याचे त्यांना आढळले. त्यामुळेच हा टोमॅटो स्वदेशी तंत्रज्ञानापासून बनवलेला असून यामधूनच उच्च जीवनसत्व मिळतात. या विविध फायद्यामुळे या टोमॅटोची मागणी वाढत आहे. भर पावसाळ्यातही याच्या उत्पादनामध्ये खंड पडत नाही कारण, पावसाळ्याच्या दिवशी पॉलिहाऊसच्या माध्यमातून उत्पादन घेता येते. याचे उत्पादन खंडीत झाले तर मागणीत प्रचंड वाढ होते.

पॅकिंगची पध्दतही निराळीच

या चेरी पध्दतीचे टोमॅटोचे केवळ दिसणे आणि चवच वेगळी आहे असे नाही तर याची पॅकिंग सिस्टमही वेगळीच आहे. अगदी खास पद्धतीने पॅक केले जाते. हे द्राक्षासारखे बॉक्समध्ये पॅक करुन आणि खूप काळजीपूर्वक ठेवावे लागेल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे चेरी टोमॅटो वाढवणे किंवा लागवड करणे हे कठीण काम नाही तर त्याची योग्य पध्दतीने वाहतूक करणे महत्वाचे आहे. ट्रे किंवा कोणत्याही खड्ड्यात त्याला तडे जाऊ नयेत याबाबतीत योग्य ती काळजी घ्यावी लागते. पुरेशा आर्द्रतेसाठी ठिबकसिंचन किंवा स्प्रिंक्लरच्या माध्यामातून हे जोपासले जाऊ शकते. याची चांगली गोष्ट म्हणजे आकाराने लहान असल्यामुळे मोठ्या टोमॅटोच्या तुलनेत ते आंबट असतात तर व्हिटॅमिनचे प्रमाण जास्त असल्याचेही अंबिका पटेल यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

Pomegranate Cultivation : डाळिंब क्षेत्राची राज्यात घट परराज्यात वाढ, काय आहेत कारणे?

स्वप्न सत्यात, महिन्याभरापूर्वीच निर्णय आता मंजुरीही, मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी काय आहे खुशखबर..!

Smart Marathwada: पीक लागवड ते शेतीमालाच्या निर्यातीचा मान मराठवाड्यातील 76 शेतकरी उत्पादक कंपन्यांना, वाचा सविस्तर

Non Stop LIVE Update
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.