केळीमध्येही बुरशीजन्य रोग, वेळीच काळजी घ्या अन्यथा उत्पादनावर परिणाम
आता या केळीमध्येही बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. नव्यानेच दिसून येत असलेल्या या रोगामुळे केळी उत्पादकांमध्ये घबराहटीचे वातावरण आहे. सध्या हा रोग देशातील केवळ केरळ आणि गुजरातमध्ये आढळून आला आहे. वातावरणातील बदलामुळे याचा प्रादुर्भाव झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तण्यात आला आहे.
मुंबई : केळी (Banana) हे बारमाही असणारे फळ आहे. शिवाय याची लागवड ही प्रत्येक राज्यामध्ये केली जाते. मात्र आता या केळीमध्येही बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव (outbreak of disease) दिसून येत आहे. नव्यानेच दिसून येत असलेल्या या रोगामुळे केळी उत्पादकांमध्ये घबराहटीचे वातावरण आहे. सध्या हा रोग देशातील केवळ केरळ आणि गुजरातमध्ये आढळून आला आहे. वातावरणातील बदलामुळे याचा प्रादुर्भाव झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तण्यात आला आहे. यामुळे केळीची पाने, खोड ही पोखरली जातात. त्यामुळे योग्य काळजी घेणे हाच यावरचा पर्याय आहे. याविषयी पुसा येथील डॅा. राजेंद्र प्रसाद यांनी योग्य ते मार्गदर्शन केले असून त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
उत्तरप्रदेश येथील गाझीपूर येथे सुमारे 50 हेक्टरावरील केळीवर या बुरशीजन्य रोगाची लागण झाली आहे. त्यामुळे 50 टक्के नुकसान होण्याचा अंदाज आहे. यामुळे केळी उत्पादकांमध्ये निराशेचे वातावरण आहे. केळी बहरात असतानाच या रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे केळी ही विद्रुप दिसते परिणामी बाजारात कवडीमोल दराने विक्री करावी लागत आहे. शिवाय ग्राहक किंवा व्यापारी याची खरेदी देखील करीत नाहीत. विशेष: अतिवृष्टी आणि वातावरणात आर्द्रता असल्यास या रोगाची लागण होते. शिवाय शेतामध्ये पाणी साचून राहिल्यास याचा धोका अधिक वाढतो. दाट केळीच्या बागेत हा रोग लागलीच जाणवतो. या नव्या रोगाबद्दल अद्याप तरी काही उपाय नसून काही नियमांचे पालन हेच उत्पादकांच्या हातामध्ये आहे.
अशी घ्या काळजी
डॉ. एस. के. सिंग यांच्या मते, केळीची लागवड ही नेहमीच विशिष्ट अंतरावर करायला हवी. तसेच केळीच्या मुख्य खोडाच्या बाजूने बाहेर साल, खोड हे वेळोवेळी कापने आवश्यक आहे. शिवाय बाग अधिक घट्ट होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. अन्यथा बागेतील दाटपणा बागेतील आर्द्रता मोठ्या प्रमाणात वाढवतो त्यामुळे रोगाचे प्रमाण वाढते. वेळोवेळी वाढलेली आणि रोगग्रस्त पाने कापून बागेच्या बाहेर टाकून द्यावीत. त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव इतर झाडांना होणार नाही. पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करणे क्रमप्राप्त आहे. आवश्यकतेनुसार जास्त झालेले पाणी बाहेर काढता येणार आहे.
असे करा व्यवस्थापन
या आजाराचे व्यवस्थापन करण्यासाठी 1 ग्रॅम नॅटिवो/कॅप्रियो/ऑपेरा 1 ग्रॅम बुरशीनाशक हे 1लिटर पाण्यात विरघळवा आणि गुद्दा पूर्णपणे काढून टाकल्यानंतर 15 दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारणी करा. त्या भागात रोगाची तीव्रता जास्त असेल त्या भागात 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात 2 ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराइड (कॉपर ऑक्सिक्लोराइड) किंवा मॅन्कोझेब (मॅन्कोझेब) फवारणी केल्यास त्या रोगाचा प्रादुर्भाव हा कमी होणार आहे. (Outbreak of fungal disease on bananas too, impact on production)
संबंधित बातम्या :
नागपूरी संत्री सातासमुद्रापार, मोसंबीच्या निर्यातीचाही मार्ग मोकळा