Grape : निसर्गाच्या लहरीपणावर मात करुनही द्राक्ष उत्पादक अडचणीतच, निर्यातीवरही परिणाम..!
अतिवृष्टी, अवकाळी, ढगाळ वातावरण हे कमी म्हणून की काय रोगराईचा प्रादुर्भाव या सर्व संकटावर शेतकऱ्यांनी मात करुन द्राक्षाचे पीक पदरात पाडून घेतले. त्यामुळे आता संकट टळले असे तुम्हाला वाटत असेल पण, तसे नाही. शेतकऱ्यांच्या समस्या अजूनही कायमच आहेत. द्राक्ष बागा ऐन बहरात असताना झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 26 हजार एकरावरील बागांचे नुकसान झाले होते.
नाशिक : अतिवृष्टी, अवकाळी, ढगाळ वातावरण हे कमी म्हणून की काय रोगराईचा प्रादुर्भाव या सर्व संकटावर शेतकऱ्यांनी मात करुन (Grape Production) द्राक्ष पदरात पाडून घेतले. त्यामुळे आता संकट टळले असे तुम्हाला वाटत असेल पण, तसे नाही. शेतकऱ्यांच्या समस्या अजूनही कायमच आहेत. (Vineyard) द्राक्ष बागा ऐन बहरात असताना झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 26 हजार एकरावरील (Grape Damage) बागांचे नुकसान झाले होते. त्याच्या झळा अजून कायम आहेत. द्राक्ष काढणीस तयार झाले आहे मात्र, दर्जा चांगला नसल्याने मागणी नाही. परिणामी गतवर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांना किलोमागे 10 रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे पिकांच्या संरक्षणासाठी अधिकचा खर्च करुनही शेवटी पदरी काय ? हा सवाल कायम आहेच. हंगामाची सुरवात तर अशी झाली आहे भविष्यात काय होईल याची धास्ती द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आहे.
बे-भाव कंमतीमध्ये द्राक्षाची मागणी
द्राक्ष हे हंगामी पीक आहे. त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागताच जी द्राक्षे बाजार पेठेत दाखल होतात. त्याला अधिकची मागणी असते. यंदा मात्र, तसे चित्र नाही. मालाची मागणी करतानाच व्यापारी हे दर पाडून मागत आहेत. दर्जात्मक द्राक्ष नाहीत बाऊ झाला आहे. अवकाळीनंतर वाढलेल्या थंडीमुळे द्राक्षाला रंग चढलेला नाही तर फुगवण व साखर उतारण्याच्या वेळी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. आता ही सर्व प्रक्रिया पार पडली तर व्यापाऱ्यांकडून केवळ 15 ते 20 रुपये किलोने मागणी होत आहे. त्यामुळे उत्पादनावर खर्च अधिकचे अन् उत्पन्न कमी अशी अवस्था झाली आहे.
काय आहेत सध्याचे फडावरचे वास्तव?
सध्या द्राक्षाची तोडणी अंतिम टप्प्यात आहे. उत्पादनावर झालेला खर्च आणि वर्षभराची मेहनत पाहता स्थानिक पातळीवर विक्री केली जाणाऱ्या द्राक्षाला 18ते 20 रुपये किलोचा दर मिळत आहे. तर निर्यात केले जाणारे द्राक्ष हे वेगळ्या दर्जाचे असतात. निर्यातक्षम द्राक्षाला सध्या 50 ते 75 रुपये किलोचा दर आहे. तर शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की, स्थानिक पातळीवर 30 ते 50 दर अपेक्षित आहे तर निर्यात होणाऱ्या द्राक्षाला 60 ते 85 रुपये किलोचा दर मिळावा ही अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. आतापर्यंत उत्पादनात घट होऊ नये म्हणून शेतकऱ्यांना नियोजन करावे लागले होते पण दराचे काय करावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
हंगामातील सध्याची काय आहे स्थिती?
निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात झालेली घट ही वाढीव दरातून निघेल असा आशावाद शेतकऱ्यांना होता.सध्या द्राक्षाची मागणी असली तरी सफेद द्राक्षापेक्षा रंग चढलेल्या द्राक्षाला ग्राहक अधिक पसंती देत आहेत. द्राक्षाची गुणवत्ता चांगली असली तरच निर्यातीचा मार्ग खुला आहे. अन्यथा कमी दरात स्थानिक पातळीवरच द्राक्ष विक्री करण्याची नामुष्की ओढावत आहे. गतवर्षीच्या तुलनेत किलोमागे 10 रुपयांनी कमी दर मिळत आहे.
संबंधित बातम्या :
युट्यूब पाहून अफू पिकवला, पोलिसांची थेट बांधावरच धाड; वाळकी शिवारात नेमके काय घडले?
शेतकऱ्यांसाठी महत्वाचे : पिकांवरील रोगांचे मूळ कारण काय? जाणून घ्या उपाययोजनाही
Beed : केज कृषी उत्पन्न बाजार समतीवर अखेर प्रशासक, कारणही क्षुल्लक