पूर्वसूचना करुनही पंचनामे प्रलंबित, शेतकऱ्यांनो ‘ही’ काळजी घ्या तरच मिळेल नुकसानभरपाई
खरीपातील पिकांची काढणी झालेली आहे. त्यामुळे पंचनामे करण्याचा निर्णय झाला तरी कशाचे पंचनामे केली जाणार आणि नुकसानीची टक्केवारी कशी ठरवली जाणार हे न सुटणारे कोडे आहे. एकट्या परभणी जिल्ह्यात 1 लाख 25 हजार पंचनामे हे प्रलंबित आहेत. त्यामुळे दिवाळीपूर्वी मदत तरी कशी मिळणार हा प्रश्न आहे.
परभणी : पीक नुकसानीनंतर 72 तासात आणि त्यानंतर लागलीच पंचनामे ही अट (insurance company) पीक विमा कंपनीने घालून दिलेली आहे. मात्र, आता पावसाने उघडीप देऊन दहा दिवसाचा कालावधी लोटलेला आहे. (Crop panchnamas pending) शेतकऱ्यांनी नुकसानीच्या पूर्वसूचनाही सादर केल्या आहेत. मात्र, आजही अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पंचनामे हे पूर्ण झालेले नाहीत. सर्वेक्षण प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांना मदत मिळणार तरी कशी आणि आता पीक काढणीनंतर कशाचे पंचानामे होणार हा खरा प्रश्न आहे. खरीपातील पिकांची काढणी झालेली आहे. त्यामुळे पंचनामे करण्याचा निर्णय झाला तरी कशाचे पंचनामे केली जाणार आणि नुकसानीची टक्केवारी कशी ठरवली जाणार हे न सुटणारे कोडे आहे. एकट्या परभणी जिल्ह्यात 1 लाख 25 हजार पंचनामे हे प्रलंबित आहेत. त्यामुळे दिवाळीपूर्वी मदत तरी कशी मिळणार हा प्रश्न आहे.
शेतकऱ्यांनी पूर्वसूचना दाखल केल्यातरच पंचनामे केले जातील अशी भूमिका विमा कंपन्यांनी सुरवातीच्या काळात घेतलेली होती. मात्र,अधिकचे नुकसान आणि सरकारचा रेटा यामुळे सरसकट पंचनामे करण्यास सुरवात झाली होती. परभणी जिल्ह्यातून 3 लाख 11 हजार 773 पूर्वसूचना ह्या विमा कंपन्यांकडे दाखल झालेल्या आहेत. मात्र, त्यापैकी 1 लाख 82 हजार 295 शेतकऱ्यांच्या पूर्वसूचनांवर पंचनामे झालेले आहेत. अद्यापही 1 लाख 25 हजार शेतकऱ्यांचे पंचनामे हे बाकी आहेत. त्यामुळे या प्रलंबित शेतकऱ्यांना मदत कोणत्या निकषावर देण्यात येणार हा प्रश्ह कायम आहे.
विमा प्रतिनीधींची टाळाटाळ
मुळात शेतकऱ्यांना मदत मिळावी ही विमा कंपन्यांची भावनाच नाही. त्यामुळेच तब्बल 5 हजारहून अधिक शेतकऱ्यांचे हे नुकसानच झाले नसल्याचे सांगत पूर्वसूचनांकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. मात्र, यामध्ये जिल्हाधिकारी यांनी हस्तक्षेप केल्याने शेतकऱ्यांच्या पूर्वसूचनांचा विचार करण्यात आला होता. एकट्या परभणी जिल्ह्यात निम्म्याहून अधिक पूर्वसूचनांचे पंचनामे करण्याचे बाकी आहे. तर गेल्या काही दिवसांपासून ही प्रक्रीयाच बंद झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दिवाळीपूर्वी मदतीचे आश्वासन
राज्यकृषी मंत्री दादा भुसे यांनी विमा कंपन्यांना दिवाळीपूर्वी किमान 25 टक्के नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे पंचनामेच पूर्ण झाले नाहीत त्या शेतकऱ्यांना मदत मिळणार तरी कशी असा सवाल उपस्थित होत आहे. 25 टक्के प्रमाणे त्यांनी 3 हजार कोटी रुपये वितरीत करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, एकट्या परभणी जिल्ह्यात 1 लाख 25 हजार शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचेच बाकी राहिलेले आहेत.
शेतकऱ्यांनी काय करावे?
मध्यंतरी नांदेडचे आमदार माधवराव पाटील यांनी शेतकऱ्यांना कोऱ्या कागदावर सह्या न करण्याचे अवाहन केले होते. विमा प्रतिनीधी हे कोऱ्या कागदावर शेतकऱ्यांकडून सह्या घेतात आणि त्यांच्या सोईनुसार नुकसानीची आकडेवारी ठरवतात. त्यामुळेच त्यांनी हे अवाहन शेतकऱ्यांना केले होते. आता शेतकऱ्यांना मदत हवी असेल तर पूर्वसूचना केल्याचा अर्ज किंवा मोबाईलद्वारे केलेली प्रक्रीया ही दाखवावी लागणार आहे. पूर्वसूचना केल्याचे प्रुफ शेतकऱ्यांकडे असेल तरच त्यांना मदत मिळू शकते असे एका कृषी अधिकाऱ्याने सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विमा भरलेली पावती, नुकसानीचा दाव्याची प्रत ठेवणे आवश्यक राहणार आहे. (Panchnama pending despite prior notice, will farmers get compensation?)
संबंधित बातम्या :
पेरणी यंत्र एक अन् फायदे अनेक, वेळेची बचत शिवाय उत्पादनात वाढ
‘आयवीएफ’ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पहिल्यांदाच म्हशीची गर्भधारणा, गोंडस पारडूला जम्न
विक्रमी दर देणाऱ्या हिंगोली बाजार समितीमध्ये सोयाबीनची आता काय अवस्था ?