Basmati Rice: बासमती तांदळाच्या निर्यातीचा मार्ग मोकळा, कृषी शास्त्रज्ञांची संशोधन आले कामी..!
शेतीमालाची निर्यात होण्यासाठी ते प्रमाणित असणे गरजेचे असते. तरच त्याच्या मागणीत आणि निर्यातीमध्ये वाढ होणार आहे. मात्र, वाढत्या किटकनाशकामुळे बासमती तांदळाच्या निर्यातीवर परिणाम झाला होता. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. पण आता कृषी शास्त्रज्ञांनी असा काय उपाय काढला आहे की भविष्यात केव्हाच वाढत्या किटकनाशकाचा परिणाम हा निर्यातीवर होणार नाही. पुसा येथील भारतीय कृषी संशोधन समितीने रोगराईच होणार नाही अशा तीन जाती विकसित केल्या आहेत.
मुंबई : शेतीमालाची निर्यात होण्यासाठी तो प्रमाणित असणे गरजेचे असते. तरच त्याच्या मागणीत आणि निर्यातीमध्ये वाढ होणार आहे. मात्र, वाढत्या किटकनाशकामुळे (Basmati Rice) बासमती तांदळाच्या (Rice Export) निर्यातीवर परिणाम झाला होता. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. पण आता कृषी शास्त्रज्ञांनी असा काय उपाय काढला आहे की भविष्यात केव्हाच वाढत्या किटकनाशकाचा परिणाम हा निर्यातीवर होणार नाही. पुसा येथील (Indian Council of Agricultural Research) भारतीय कृषी संशोधन समितीने रोगराईच होणार नाही अशा तीन जाती विकसित केल्या आहेत. सध्या रसायनमुक्त अशाच शेतीमालाला मागणी आहे. अशाच पध्दतीचा हा बासमती तांदूळ राहणार आहे. एवढेच नाही तर युरोपियन युनियनने आयात केलेल्या अन्नधान्यातील कीटकनाशकांचे प्रमाण आधीच ठरवून दिलेल्या मानकांपेक्षा कमी केले होते. त्यामुळे निर्यातीमध्ये वाढ होणार आहे. पुसा संस्थेमध्ये सर्वाधिक काम हे बासमती तांदळाच्या वावाणावर केले जाते. आयएआरआय पुसाने बासमती 1509 ते 1847 मध्ये सुधारणा केली आहे. त्याचप्रमाणे 1121 ते 1885 व 1401 या वाणामध्ये सुधारणा करून 1886 नावाचे नवीन वाण तयार केले आहे. हे तिन्ही रोगप्रतिबंधक आहेत. त्यामुळे कीटकनाशकांची गरज भासणार नसल्याचे डॉ. रितेश शर्मा यांनी सांगितले आहे.
नवीन वाण कोणत्या रोगांपासून मुक्त आहेत?
कृषी शास्त्रज्ञ डॉ. शर्मा म्हणाले की, पुसा बासमतीच्या तीन नवीन जातीमध्ये बॅक्टेरियाच्या पानांच्या प्रकाशात म्हणजेच जीवाणू झोलासामध्ये सापडणार नाहीत. त्यामुळे एकतर फुगीर किंवा ब्लास्ट रोग होणार नाही. ब्लास्ट रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायसायक्लेझोलची भर पडली तर त्यामुळे निर्यातीत अडचण निर्माण झाली. पण आता ही समस्या मिटलेली आहे. या नव्या वाणांमुळे आता निर्यात वाढेल. या आजारांमुळे शेतकरी दुकानदारांच्या जाळ्यात येऊन कीटकनाशके टाकत असत आता ती समस्या ही संपलेली आहे.
बासमती तांदळाला ‘या’ रोगाची संभावना
तांदळामध्ये बासमती तांदूळ हा वेगळाच ब्रॅंण्ड आहे.असे असले तरी तेवढ्याच प्रमाणात या पिकावर रोगराईचा प्रादुर्भाव आहे. ज्यासाठी शेतकरी कीटकनाशकांचा वापर करून नियंत्रण ठेवतात. असे असले तरी पानांमध्ये डोळ्यांसारखे डाग तयार होतात. त्याची वाढ होते आणि पाने जळतात. तर बॅक्टेरियाच्या पानांच्या आतील भागामध्ये प्रवेश करुन बासमती तांदळाच्या पिकाचे वरपासून अगदी खालपर्यंत पाने ही करपून टाकतात. याशिवाय म्यान ब्लाइट नावाचा आजारही होतो, ज्यामध्ये खोडामध्ये चॉकलेटी रंगाचे डाग तयार होतात. हे डाग अधिक वाढतात आणि त्याचा परिणाम हा उत्पादनावर होतो.
कीटकनाशकाची पातळी ही ठरलेलीच
पिकांना किटकनाशकाची किमान अवशेष पातळी ही निश्चित करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत कीटकनाशकांचा कमीत कमी वापर करण्याचे सरकारचे धोरण आहे. कीटकनाशकाचे प्रमाण अधिक असल्यास त्याचा परिणाम थेट तांदळाच्या दर्जावर होतो. भविष्यात याचाच परिणामामुळे गुणवत्तेवर परिणाम होत असल्याने निर्यातीस अडचणी निर्माण होतात. भातशेतीमध्ये गरजेपेक्षा जास्त युरिया टाकत नसाल आणि पाण्याचं व्यवस्थापन योग्य असेल तर औषध लावण्याची गरजच उरणार नसल्याचे मत कृषितज्ञ असं शर्मा यांचं म्हणणं आहे. चला जाणून घेऊयात बासमती तांदळाची निर्यात भारतातून दरवर्षी सुमारे 32 हजार कोटी रुपये इतकी होते.
बासमती तांदळामध्ये नेमकी अडचण काय?
कृषी तज्ज्ञांच्या मते, युरोपियन युनियनच्या ऑडिट रिपोर्टमध्ये बासमती तांदळात 19.9 टक्के कीटकनाशकांचं प्रमाण असल्याचा दावा करण्यात आला होता. 1 हजार 128 नमुन्यांपैकी 45 नमुन्यांमध्ये कीटकनाशकांचे अवशेष निर्धारित मानकांपेक्षा अधिक असल्याचे आढळले होते. त्यामुळे बासमतीच्या निर्यातीव परिणाम होतो.परंतु, आता नव्या वाणांमुळे सरकार आणि शेतकरी या दोघांचाही मार्ग सुकर झाला आहे. युरोपियन युनियन, अमेरिकेसह अनेक देशांनी ट्रायसायक्लेझोल आणि आयसोप्रोथिओलेन सारख्या कीटकनाशकांसाठी प्रति किलो जास्तीत जास्त 0.01 मिलीग्रामची अवशेष मर्यादा निश्चित केली आहे.
संबंधित बातम्या:
Drone Farming : ड्रोन शेतीमध्ये सुविधांपेक्षा अडचणी अधिक, शेतकऱ्यांसमोर काय आहेत अडचणी?
Onion Rate: कांदा दारचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर, 3 एकरावरील उभ्या पिकावर फिरवला नांगर