शेतकऱ्यांशी दुजाभाव, 64 साखर कारखानदारांची दिवाळी कडवट

थकीत 'एफआरपी' रकमेचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत राहिलेला आहे. एवढ्या दिवस शेतकरी, शेतकरी संघटना ह्या थकीत रकमेसाठी आंदोलन मोर्चे काढत होते. मात्र, शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशाबाबत दुजाभाव करणाऱ्या राज्यातील तब्बल 64 साखर कारखादारांची दिवाळीच कडवट होईल असा निर्णय साखर आयुक्तांनी घेतलेला आहे.

शेतकऱ्यांशी दुजाभाव, 64 साखर कारखानदारांची दिवाळी कडवट
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 01, 2021 | 10:54 AM

मुंबई : थकीत ‘एफआरपी’ (Outstanding FRP Amount) रकमेचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत राहिलेला आहे. एवढ्या दिवस शेतकरी, शेतकरी संघटना ह्या थकीत रकमेसाठी आंदोलन मोर्चे काढत होते. मात्र, शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशाबाबत दुजाभाव करणाऱ्या राज्यातील तब्बल 64 साखर कारखादारांची दिवाळीच कडवट होईल असा निर्णय साखर आयुक्तांनी घेतलेला आहे. एफआरपी रक्कम थकीत ठेवणाऱ्या ( Sugar Factories) कारखान्यांचे परवानेच साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी रोखलेले आहेत. त्यामुळे हंगाम सुरु होऊन 15 कालावधी लोटला तरी राज्यातील 64 कारखान्यांची धुराडी ही अद्यापही बंदच आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही साखर कारखाने सुरु होण्याबाबत मंत्री मंडळाची बैठक पार पडल्यापासून चर्चा होती ती थकीत एफआरपी रकमेची. मात्र, अनेक साखर कारखान्याच्या संचालकांनी याबाबत तत्परता दाखवली नाही. तर काहींनी केवळ आश्वासनांची खैरात केली. मात्र, साखर आयुक्तांनी बैठकीत झालेल्या निर्णयावर ठाम राहत अखेर त्या 64 थकीत एफआरपी असलेल्या कारखान्यांना परवानगीच दिलेली नाही. त्यामुळे आता तरी काही प्रमाणात रक्कम शेतकऱ्यांच्या पदरात पडेल असे चित्र निर्माण झाले आहे.

27 कारखान्यांची धुराडी पेटली

सप्टेंबर महिन्यात मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्यातील साखर कारखाने हे 15 ऑक्टोंबर पासून सुरु होणार याबाबत निर्णय झाला होता. मात्र, कारखाने सुरु होण्यापूर्वी संबंधित साखर कारखान्याने शेतकऱ्यांची थकीत एफआरपी रक्कम अदा करण्याचा मुद्दा साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी उपस्थित केला होता. कारण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातून थकीत एफआरपी बाबत अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यानुसार जे साखर कारखाने ही रक्कम अदा करतील त्यांनाच परवानगी देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला होता. अखेर साखर आयुक्त यांनी याची अंमलबजावणी केली असून सध्या 27 साखर कारखाने हे सुरु झाले आहेत. यामध्ये 14 हे सहकारी आहेत तर 13 कारखाने हे खासगी मालकीचे आहेत.

यंदा उतारा मात्र कमी प्रमाणात

सहाकार आणि खासगी क्षेत्रातील अशा 27 कारखान्यांचे गाळप हे सुरु झाले आहे. त्या अनुशंगाने या कारखान्यात 6 लाख टनापेक्षा अधिकच्या ऊसाची खरेदी झाली आहे. मात्र, साखरेचे उत्पादन केवळ 3 लाख 86 हजार क्विंटल झाले असल्याने यंदा साखरेचा उतारा कमी असल्याचे सांगितले जात आहे. मध्यंतरी पावसाचे वाढलेले प्रमाण व ऐन बहरात असताना पावसाने दिलेली उघडीप याचा परिणाम साखरेच्या उतारावर झालेला आहे. अद्यापही संपूर्ण क्षमतेने साखर कारखाने हे सुरु झालेले नाहीत भविष्यात उतारावर फरक पडणार असल्याचे सांगितले जात आहे.

थकबाकी वसुलीनंतरच पेटणार धुराडी

शेतकऱ्यांच्या हक्काच्या रकमेबाबत आता राज्य सरकारसह साखर आयुक्त गंभीर झाल्याचे चित्र आहे. बैठकी दरम्यान झालेल्या निर्णायाची पूर्तता आता साखर आयुक्त शेखर गायकवाड हे करीत आहेत. त्यामुळेच मध्यंतरी देशात रेकॅार्डब्रेक एफआरपी ची वसुली ही राज्यात झाली होती. मात्र, 64 साखर कारखान्यांकडे थकबाकी कायम असल्याने त्यांनी परवानगी नाकारलेली आहे तर 130 साखर कारखान्यांना परवानगी देण्यात आली असून प्रत्यक्षात 27 कारखान्यांचे गाळप हे सुरु झाले आहे. उर्वरीत कारखान्यांनाही परवानगी देण्यात येणार मात्र ती एफआरपी रक्कम कशी अदा करतात यावर अवलंबून आहे. (Permission of 64 factories that owed FRP amount to farmers suspended, sugar commissioner decides)

संबंधित बातम्या :

ऊस बिलातून वीज बील वसुलीचा निर्णय जुनाच, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचं स्पष्टीकरण

तुम्हाला माहिती आहे का पिकांची अंदाजित उत्पादकता कशी ठरवली जाते? जाणून घ्या

शेत रस्ता दाव्यात आता स्थळदर्शक छायाचित्रे, जिओ टॅगिंग बंधनकारक; नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे आदेश

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.