ज्याच्यावर भिस्त ‘ते’ खरिपातील पिकही धोक्यात, शेतकऱ्यांनो अशी घ्या काळजी

खरिपातील केवळ तूर पिक वावरात आहे. अंतिम टप्प्यात तूर असतानाच ढगाळ वातावरणामुळे किडीचा प्रादुर्भाव हा वाढत आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे तर मराठवाड्यात पावसानेही हजेरी लावलेली आहे. त्यामुळे तूरीवर मर, मारुका यासारख्या अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे.

ज्याच्यावर भिस्त 'ते' खरिपातील पिकही धोक्यात, शेतकऱ्यांनो अशी घ्या काळजी
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 18, 2021 | 4:09 PM

लातूर : हंगामच्या सुरवातीपासूनच (Kharif season) खरीप हंगामावरील पिकांवर संकटाची मालिका ही सुरु झाली होती. आता खरिपातील केवळ ( toor crop) तूर पिक वावरात आहे. अंतिम टप्प्यात तूर असतानाच ढगाळ वातावरणामुळे किडीचा प्रादुर्भाव हा वाढत आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे तर मराठवाड्यात पावसानेही हजेरी लावलेली आहे. त्यामुळे तूरीवर मर, मारुका यासारख्या अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे.

खरीप हंगामात सोयाबीनचे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तर तूर ऐन बहरात असल्याने या पिकाला पावसाचा फटका बसलेला नव्हता. त्यामुळे या पिकातून शेतकऱ्यांना वाढीव उत्पादनाची अपेक्षा आहे. मात्र, बदलेल्या वातावरणामुळे रोगराईचा प्रादुर्भाव होत असून तूर ही जागेवरच वाळून जात आहे. हे पिक जोपासण्यासाठी शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्ची केले आहेत पण आता निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

काय आहे धोका?

वातावरणातील बदलामुळे तुरीवर पाने गुंडाळणारी अळी आदी संकट बाल्यावस्थेत आहे. आता ढगाळ वातावरणामुळे फूलगळ, शेंगा पोखरणारी अळी, शेंगमाशी आदीचा प्रादूर्भाव होण्याची शक्‍यता राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद व जालनाच्या तज्ज्ञांनी व्यक्‍त केली. अळीचा तुरळक प्रादूर्भाव दिसत असला तरी निरीक्षण कायम ठेवावे. ढगाळ वातावरण व पावसाचा आणखी काही दिवस अंदाज आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यात असलेल्या या पिकावर देखील किडीचा प्रादुर्भाव जाणवत असल्याने उत्पादनात घट होण्याचा धोका आहे.

मराठवाड्यात शेंग पोसण्याच्या अवस्थेत पिक

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत तुरीच्या सरासरी 4 लाख 97 हजार 599 हेक्‍टर क्षेत्राच्या तुलनेत 4 लाख 91 हजार 485 हेक्‍टरवर पेरणी झाली. मध्यंतरीच्या अतिवृष्टीचा सर्वाधिक परिणाम हा सोयाबीन पिकावर झाला होता. त्या दरम्यान, तूर हे पिक बहरात होते. त्यामुळे याला अधिकचा धोका झाला नाही पण आता अंतिम टप्प्यात असताना वाढत्या किडीच्या प्रादुर्भाव निर्माण झाला आहे. मात्र, तूर पिक हे शेंग पोसण्याच्या अवस्थेत आहे. ढगाळ वातावरण असेत कायम राहिले तर धोका वाढू शकतो.

असे करा व्यवस्थापन, अन्यथा उत्पादनात घट

मारुका अळीच्या व्यवस्थापनासाठी जिथे तूर पीक फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहेत. तेथे सर्वेक्षण करून शेतात 20 ते 25 ठिकाणी प्रती मीटर ओळीच्या अंतरात दिसून आल्यास किटकनाशकांची फवारणी करावी लागणार आहे. * फ्लूबेंडामाइड 20 डब्ल्यूजी 6 ग्रॅम किंवा थायोडीकार्ब 75 डब्ल्यू.पी 20 ग्रॅम किंवा नोवलुरोन 5.25 इंडोक्झाकार्ब 4.50 एससी 16 मिली यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची प्रती 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ही फवारणी पॉवरस्प्रेने फवारणी करावी. दुसरऱ्या फवारणीच्या वेळेस कीटकनाशकाची मात्रा ही तिप्पट करावी. गरज भासल्यास पुन्हा 15 दिवसांनी दुसरी फवारणी करावी. दुसऱ्या फवारणीच्या वेळेस कीटकनाशकांची अदलाबदल करावी. उपरोक्त किटकनाशकांसोबत इतर कीटकणशके, बुरशीनाशके, संप्रेरके, खते, अन्नद्रव्ये इत्यादी मिसळू नये.

संबंधित बातम्या :

कारखानदारांचा अजब दावा, म्हणे, शेतकऱ्यांच्या काळजीपोटीच विनापरवाना पेटवली कारखान्याची धुराडी

एकदा लागवड अन् वर्षभर कमाई, खरीप-रब्बी हंगामात घेता येणारे पिक

Special Story! सोयाबीन दरवाढीच्या पडद्यामागची गोष्ट, शेतकऱ्यांनी दाखवले एकीचे ‘बळ’

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.