फळलागवडी दरम्यानच डाळिंब उत्पादकांना फटका, पावसानंतर किडीचा प्रादुर्भाव

ढगाळ वातावरणामुळे डाळिंब बागेवर तेलकट डाग, कुजवा आणि पिन होल बोअरर (खोड कीड) याचा मोठा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे उत्पादनात तर घट होणार आहेच शिवाय योग्य फवारणी न केल्यास बागायतदारांचे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. विशेष: सांगली भागातील 70 हजार हेक्टरावरील नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

फळलागवडी दरम्यानच डाळिंब उत्पादकांना फटका, पावसानंतर किडीचा प्रादुर्भाव
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 04, 2021 | 1:25 PM

सांगली : पावसामुळे केवळ खरीपातील पिकांचेच नुकसान तर फळ बागायतदार यांनाही फटका बसलेला आहे. पावसाने फळबागांची मध्यंतरी पडझड झाली होती तर आता ढगाळ वातावरणामुळे डाळिंब बागेवर तेलकट डाग, कुजवा आणि पिन होल बोअरर (खोड कीड) याचा मोठा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे उत्पादनात तर घट होणार आहेच शिवाय योग्य फवारणी न केल्यास बागायतदारांचे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. विशेष: सांगली भागातील 70 हजार हेक्टरावरील नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. कमी पावसाच्या भागात डाळिंबाची लागवड ही केली जाते यंदा मात्र, राज्यात सर्वत्रच पावसाने थैमान घातल्याने फळपिकाचे देखील नुकसान झाले आहे.

राज्यात डाळिंबाचा मृग बहार मोठ्या प्रमाणात घेतला जातो. या बहरात घेतलेल्या फळपिकाची काढणी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना राज्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे सांगली भागातील डाळिंबाची पडझडही झाली होती तर आता कीडीचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. दोन वर्षांपासून डाळिंब उत्पादक शेतकरी नैसर्गिक आपत्तीच्या संकटाशी दोन हात करून बागा फुलवत आहेत. गेल्या वर्षी डाळिंबाचे उत्पादन कमी तरी डाळिंबास उच्चांकी दर मिळाला होता. परंतु उत्पादन घटल्याने घातलेला खर्चदेखील निघाला नव्हता.

त्यातच अतिवृष्टीमुळे मगृ बहरातील डाळिंबाचे मोठे नुकसान झाले होते. अनेक शेतकऱ्यांनी पुन्हा आंबिया बहर धरला होता. त्यातून झालेले नुकसान भरून काढता येईल, अशी आशा होती. परंतु पिन बोअरर होलचा प्रादुर्भाव झाला. पावसाने तेलकट रोग आला. अशी संकटांची मालिका शेतकऱ्यांसमोर आली. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात ओढावला आहे. राज्यासह देशात मृग बहरावरच डाळिंब उत्पादकांची मदार असते.

अधिकतर लागवड या मृगामध्येच केली जाते. शिवाय आता नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान, फळ लागवड होते पण किडीमुळे बागा ह्या धोक्यात आल्या आहेत. सध्याच्या वातावरणामुळे तेलकट रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने उत्पादन घटणार आहे. शिवाय अतिपावसाने फळबागामध्ये पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे कुजवा ही वाढत असल्याने फळ बागायतदार हे चिंतेत आहेत.

महाराष्ट्रातील डाळिंबाला अधिकचा धोका

राज्यात मृग बहरातील डाळिंबाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. सांगली जिल्ह्यात फळबागा जास्त प्रमाणात आहेत. शिवाय या भागात आता अत्याधुनिक शीतगृहाची सोय केल्याने फळबागायत दारांना दिलासा मिळाला होता. मात्र, निसर्गाच्या लहरीपणाचा फटका तब्बल 80 ते 90 हजार हेक्टरावरील शेतकऱ्यांना बसलेला आहे. आगामी महिन्यापासून फळ लागवडीला सुरवात होते मात्र, सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

राजस्थान, गुजरातमध्ये बागा चांगल्या

पोषक वातावरणामुळे गेल्या काही वर्षांत राजस्थान आणि गुजरात या दोन राज्यांत डाळिंबाचे क्षेत्र वाढले आहे. या भागात कमी पाऊस झाल्याने या दोन्हीही राज्यांत डाळिंबाचे पीक बरे आहे. या दोन्ही राज्यांत ३० हजार हेक्टर डाळिंबाचे क्षेत्र असून, यंदा २० हजार हेक्टरवरील मगृ बहर आहे. या दोन्ही राज्यांत दरवर्षी फूल सेटिंग चांगले असल्याने पीक चांगले येईल, असा अंदाज संघाने व्यक्त केला आहे.

डाळिंबास पोषक वातावरण

राज्यात अहमदनगर, पुणे, सांगली, सोलापूर, वाशिम या जिल्‍हयात डाळिंबाची लागवड केली जाते. महाराष्ट्रात डाळिंबाचे सरासरी क्षेत्र हे 73027 एवढे आहे. तर डाळिंबाच्या पिकास थंड व कोरडे हवामान हे पोषक मानले जाते. उन्हाळ्यातील कडक ऊन तसेच हिवाळ्यातील थंडी ही डाळिंब वाढीस पोषक आहे. फळलागवडीच्या दरम्यान ऊन आणि कोरडे हवामान असल्यास फळांची चांगल्या प्रकारे वाढ होते.

अशा प्रकारे करा रोगावर नियंत्रण

अधिकच्या पावसामुळे फळबागेत पाणी साचून राहिल्याने खोडास लहान छिद्र पाडणारे भूंगे तयार होतात. त्यामुळे खोडावर चारशे ग्रॅम गेरु अ 2.5 मिलि लिंडेन किंवा 5 मिलि क्‍लोरोपायरीफॉस अ 2.5 ग्रम्‍ ब्‍लायटॉक्‍स एक लिटर पाण्‍यात मिसळून त्‍या द्रावणाचा खोडास मुलामा दयावा. त्‍याच प्रमाणे मुळावर लिंडेन ( 2.5 मिलि ) किंवा / क्‍लेारोप्‍लायरोफॉस (5 मिलि ) ब्‍लायटॉक्‍स 2.5 ग्रॅम घेवून प्रतिझाड पाच लिटर द्रावण खोडाच्‍या शेजारी मुळांना पोहोचेल असे दयावे लागणार आहे. तर साचलेले पाणी फळबागेच्या बाहेर काढून देण्याचे नियोजन हे शेतकऱ्यांना करावे लागणार आहे. (Pest infestation, decline in production, orchards in Sangli at risk while pomegranate is in the water)

संबंधित बातम्या :

20 हजार कोटी रुपये अदा केले, मात्र 500 कोटींमुळे अर्धवट राहिली ‘महाविकास आघाडी’ची पीक कर्जमाफी

डिजिटल सातबारा उतारा काढायचा कसा? शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांसाठी महत्वाची बातमी..

‘लक्षात असू द्या’ कोऱ्या कागदावर सह्या म्हणजे फसवणूक, आ. माधवराव पाटलांकडून विमा कंपन्यांच्या कारभाराची पोलखोल

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.