पिवळ्या हळदीला करपा रोगाचा डाग, उत्पादनात घट, काय दर आहेत हिंगोलीच्या बाजारपेठेत?

कारभारात तत्परता यामुळे मराठवाड्यातील हिंगोलीतील संत नामदेव हळद बाजाराला एक वेगळेच महत्व आहे. हंगामाच्या सुरवातीला हळदीची मोठ्या प्रमाणात आवक सुरु झाली होती. पण मध्यंतरीच्या वातावरणामुळे हळद या पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याने त्याचा परिणाम आता उत्पादनावर होतोय. येथील बाजारपेठेत परराज्यातूनही हळदीची आवक होते.

पिवळ्या हळदीला करपा रोगाचा डाग, उत्पादनात घट, काय दर आहेत हिंगोलीच्या बाजारपेठेत?
हळद काढणीला सुरवात झाली असून यंदा उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे वाढीव दराची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.
Follow us
| Updated on: Dec 22, 2021 | 4:13 PM

हिंगोली : कारभारात तत्परता यामुळे मराठवाड्यातील हिंगोलीतील संत नामदेव हळद बाजाराला एक वेगळेच महत्व आहे. हंगामाच्या सुरवातीला (Turmeric production) हळदीची मोठ्या प्रमाणात आवक सुरु झाली होती. पण मध्यंतरीच्या (Cloudy Climate) ढगाळ वातावरणामुळे हळद या पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याने त्याचा परिणाम आता उत्पादनावर होतोय. येथील बाजारपेठेत (inflow from Other states) परराज्यातूनही हळदीची आवक होते. मात्र, गेल्या काही दिवसापासून वसमतच्या बाजारपेठेतही आवक घटली असून पीक अंतिम टप्प्यात असतानाच करप्याच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनावर परिणाम होणार आहे. सध्या समाधानकारक दर असला तरी अधिकच्या दराची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.

हळदीला प्रति क्विंटल 9 हजार 600 रुपये दर

हिंगोली जिल्ह्यातील बाजारपेठामध्ये मोठ्या प्रमाणात हळदीची आवक असते. शिवाय शेतकऱ्यांना वजन काटा झाला की पैसे हातामध्ये दिले जातात. त्यामुळे परजिल्हा आणि परराज्यातूनही आवक सुरु असते. यंदा मात्र, करपा आणि वातावरणातील बदलामुळे उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे भविष्यात दर वाढतील असा अंदाज आहे. पण सध्या 9 हजार 600 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. शेतकऱ्यांना अपेक्षा आहे ती 15 हजार रुपये दर मिळावा अशी.

करपा रोगाचा प्रादुर्भाव प्रत्येक पिकावर

खरीपासह रब्बी हंगामातील पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव हा कायम राहिलेला आहे. यापूर्वी केवळ कांदा या पिकावर करपा रोगाचा अधिकचा प्रादुर्भाव होत होता. मात्र, यंदा ढगाळ वातावरणामुळे पिकांपेक्षा कीडीला पोषक वातावरण होते. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. हंगामाच्या सुरवातीला आवक झालेल्या हळदीवर याचा परिणाम नव्हता पण आता नव्याने दाखल होणाऱ्या हळदीवर परिणाम जाणवत असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

यामुळे हिंगोलीच्या हळदीला आहे मागणी

मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यातून हळदीची आवक येथे होते. येथील व्यवहार चोख असल्यामुळे शेतकऱ्यांचा कलही याच बाजारपेठेकडे अधिक आहे. शिवाय येथील हळदीमध्ये कुकुरमीन या घटकाचे प्रमाण अधिक असल्याने सांगली, सातारा या भागातून मोठी मागणी आहे. यामध्ये सौंदर्य प्रसाधने तयार करण्याचे घटक असल्याने कंपन्यामध्ये मोठी मागणी आहे. शिवाय यंदा पोषक वातावरणामुळे उत्पादनात वाढ झाली असल्याने आवकही वाढली आहे.

संबंधित बातमी :

सोयाबीनचे दर स्थिर, आवकमध्ये मात्र चढ-उतार, शेतकऱ्यांची होतेय द्वीधा मनस्थिती

दुष्काळात तेरावा : ‘ओमिक्रॉन’चा परिणाम फळबाग लागवडीवरही, शेतकरी साधणार का मंदीत संधी?

Marathwada | दरात उच्चांक मोडणाऱ्या मोसंबीची यंदा मराठवाड्यात काय अवस्था ? शेतकरी म्हणतात…

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.